“स्व. अंतोन फिलीप रुमाव श्रद्धांजली” (२५/११/२०२१)

 दिनांक १३/११/२०२१ स्व. अंतोन फिलीप रुमाव अचानक आपल्याला सोडून गेले. त्यांचे झालेले दुर्दैवी निधन हा आपल्यासाठी एक असह्य धक्का होता. ह्या धक्यातून सावरणे सहजासहजी शक्य नव्हते. आणि त्याचे कारणही तसेच होते. ते म्हणजे अंतोन सोबतची आपली दिनांक २ मे २०१६ ते २३ मे २०१६ ही २१ दिवसाची युरोप टुर. ह्या २१ दिवसात आपले खाणे-पिणे रमणे, फिरणे, राहणे, झोपणे सर्व काही एका कुटूंबा प्रमाणे होते. अंतोनचा बऱ्याच जणांचा परीचय असला तरी असा कौटुंबिक अनुभव काही निराळाच होता. माणसाने माणसावर प्रेम कसे करावे याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अंतोन रुमाव. एक पहाडी व्यक्तिमत्व, गोरा -देखना -हसरा चेहरा, मनमिळावू स्वभाव. जिथे अंतोन तिथे हास्य हे एक समीकरणच तयार झाले होते. आपल्या २१ दिवसात युरोप मधे फिरताना बसमधे ॲस्टीलाच्या बाजुला वा एखाद्या सिटवर स्थिरावतच नव्हते. प्रत्येक सिटवर जाऊन सर्वांची आपुलकीने चौकशी करीत व हास्य निर्माण करूनच दुसऱ्या सिटवर जात. कोणाला कोल्ड्रिंक देणे, कोणाला ज्युस देणे, थंडी वाजत असल्यास हॅाट ड्रिंक्स सुद्दा देणे. “जेथे कमी तेथे आम्ही” ह्या उक्तीला पुरक असा अंतोन सर्वांना हवाहवासाच होता. आपली मुलगी कॅरोलीनावर तर त्याचा भारीच जीव. पप्पा अशी हाक आली की तो कॅरोलीना जवळ हजर व्हायचा. आपली युरोप टुर यशस्वी झाली त्यात अंतोनचा सिंहाचा वाटा होता. माणसं जोडने हा जणू अंतोनचा एक छंदच म्हणावा लागेल. अंतोन तु पैसा भरपूर कमावलास. जिवन प्रवासात तू हेलकावेही खाल्लेस पण तुझी खरी श्रीमंती माणसं जोडण्याच्या छंदातच होती. “गंजण्या पेक्षा झिजने केव्हाही चांगले” हे तुझ्याकडूनच शिकावे. तू मनाचा भोळा होतास. अंतोन तू क्रिकेट मधे अष्टपैलू होतास. तुझे फोर-सिक्सर चे फटके आम्ही विसरू शकत नाही. तू बॅडमिंटन सुद्धा अप्रतिम खेळायचास. अंतोन, तुझ्या ममतेत, तुझ्या भोळेपणात, मनाच्या मोठेपणात, तुझ्या हसण्यात, बोलण्यात, तुझ्या स्वभावात अतोनात श्रीमंती भरलेली होती.


स्व. अंतोन रुमाव ह्यांच्या बद्दल अजून एक आठवण ईथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे लुर्ड्स इथे हॅाटेलच्या रिसेप्शन हॅाल मधे असताना अंतोन रूमावची एक छोटी पर्स बॅग मिसिंग झाली. त्यात अंतोन रुमावचे काही मेडीसीन, तिकीटे व पैसेही होते. नंतर ती बॅग लुईस डिमेलोच्या नजरेस पडली. बॅग ताब्यात घेतल्यानंतर अंतोन रुमावने त्याची औषधे व तिकीटे व्यवस्थित आहेत असे सांगितले. पैसे मात्र किती होते ते अंतोनने अजून पर्यंत कळू दिले नाही. पण अंतोनचे बरेच पैसे असतील असे वाटते. सर्व जण हळहळले. पण टुरचा मुड कमी होऊ नये ह्या उदात्त हेतूने अंतोनने पैसे नव्हते असेच सांगितले व काही घडलेच नाही ह्या प्रमाणे तो ग्रुपवरती मजा करीत राहीला व टूरचा मुड बदलू दिला नाही. किती हा मनाचा मोठेपणा. ह्यावरून समजते कि अंतोन पैश्याचा नव्हे तर माणसाचा भुकेला होता.  


अंतोन खरंच सांगतो कि तुला श्रद्धांजली चे दोन शब्द लिहीताना आमचा पेन जागेवरच थांबतो. हात पुढे सरकतच नाही. अश्रु आवरत नाहीत. परंतू तु नेहमीच आमच्या मनांत व प्रार्थनेत आहेस. मृत्यूमुळे आयुष्य संपते, नाते संपत नाही.


“Our deepest condolences on the unrecoverable loss of Astrila and Rumao - Tuscano family”. 


  युरोप ग्रुप मे २०१६

----समाप्त---/

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013