गौरी (२५/०३/२०२०)
‘गौरी’ म्हणजे गणपतीची आई. म्हणजेच पार्वती. पावसाळ्याच्या दुस-या महीण्या नंतर भाद्रपद महीणा सुरू होतो. ह्याच महीण्यात गणपतीचा उत्सव सुरू होतो व गणपती पाठोपाठ गौरीचीही स्थापना होते. स्थापनेसाठी ह्या गौरी निरनिराळ्या ठिकाणाहून आणल्या जातात. रंगीबीरंगी साड्या परिधान केलेल्या, अतिशय देखण्या, सुंदर, गौरवर्णीय, अलंकारानी सजवलेल्या, उभ्या किंवा खुर्चीत बसलेल्या द्दृष्यात, व बॅण्ड किंवा ताश्यांच्या मिरवणुकीने स्थापणेसाठी घरी नेल्या जातात. ते द्दृष्य पाहण्यासाठी लोक दुतर्फा गर्दी करीत असतात. हा उत्सव तीन दिवसाचा असतो. पहिल्या दिवसाच्या स्थापने नंतर दुस-या दिवशी नैवद्द व पूजन आणि तिस-या दिवशी विसर्जन केले जाते.
तर मंडळी, अशीच एक गौरी, गौरी सोनार, नव्हे तर आता “गौरी सोनार-डिमेलो”आपल्या कळसु दमेल कुटंबियांची सून म्हणून गेली बारा वर्षे नांदत आहे. आपल्या राॅबीन दादाची बायको आणि बेजमबाबा व रोजान वहीणीची सून. हिन्दु धर्मातून आपल्या ख्रिश्चन कुटुंबात आलेली एकमेव मुलगी. तोंडावर मोनालिसाचं निष्कपट हास्य. दिसायला गोड, स्वभावाने गोड, बोलायला गोड, आवाजही गोड. मनमिळावू स्वभाव, मोजकं बोलनं आणि गृहीणीला शोभेल असे वागणे. अशा ह्या लाजवाब स्वभावाने तिने सर्वांची मने जिंकुन न घेतली तरच नवल. एका हिन्दु कुटुंबातून ख्रिश्चन कुटुंबात येताना बराच माणसिक ताण तिला सहन करावा लागला असेल. कुटुंबियांना व नातेवाईकांना समजावताना तिच्या नाकी नव आले असेल. पण आपल्या प्रेमळ स्वभावाने ते लिलया झेलून त्यांची समजुत सहजपणे काढण्यात ती यशस्वी ठरली असेल.
लग्नानंतर राॅबीन दादा बरोबर ती ॲास्ट्रेलियात गेली. तिथे तिला कन्या रत्नाचा (रिशा) लाभ झाला. व पुढे दोन जुळ्या मुलांना जन्म दिला ( ईवा आणि ईवॅन्स). म्हणता म्हणता ती तीन मुलांची माता झाली. त्यानंतर हे पंचकोणी कुटुंब आता मुंबईला राहात आहे. दर शनिवार- रविवार विरारला आपल्या घरी येतात. मुंबईतील आपल्या आईवडीलाच्या सेवेप्रमाणे घरीही ती आपल्या सासु-सास-यांची भरपुर सेवा करते. घरी आलेल्या पाहुण्यांचे व नातेवाईकांचे ती हसतमुखाने स्वागत करते. ती नेहमी हळू आवाजात बोलते. मुलावरती कधी चिढत नसते. मुलावर हात ऊगारने तर दूरच. तीन मुले असुन घरात मोठा आवाज नाही. ती घरात आहे किंवा नाही हे सुध्दा कळत नाही. आपल्या शेजा-या पाजा-याशी गोडी -गुलाबीत बोलुन असते. कळसुदमेल कुटुंबाची ती एक शान आहे. तर अशी सुस्वभावी, गुणसंपन्न सून लाभने हे बेजम-रोजानचे फर मोठे भाग्य आहे. थोडक्यात कळसुदमेलच्या कुटूंबरूपी नंदनवनात उमललेलं ते एक फुल आहे. “खिलते रहो, हसते रहो”।
गौरी, खरोखर तु आमचा अभिमान आहेस. ह्या परिवारात तु सुखी-समाधानी रहावीस तसेच तुझ्या हातुन कुटुंबाची सतत सेवा घडत रहावी हिच सदीच्छा. व त्याकरीता आम्हा थोरांचे आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. आयुष्यमान भव!
KEEP IT UP
----समाप्त---/