“गुरूच्या गुरूला भावपूर्ण श्रद्धांजली”
“पूर्णविरामाचा क्षण , कुणास ठाऊक कधी राहील उभा !”
वसईच्या क्षितिजा वर लुकलुकणारा एक दैदिप्यमान तारा आज अनंतात विलीन झाला. एक तेजोसुर्य अस्तास गेला. नंदाखालची जनता हळहळली. अठ्ठयानव वर्षाचे वय लाभलेला हा वसईचा प्रतिभावंत काळाच्या पडद्या आड गेला. फक्त दोनच वर्षे आपली वयाची १०० वी पुर्ण करण्यास बाकी होते. लोकांची तशी इच्छाही होती. पण नियतीचा निर्णय ठरलेला असतो. त्याच प्रमाणे सारे काही घडत असते. सरांचा मृत्यु हा काही घात नव्हता. ते क्रमप्राप्तच होते. तरीही जणता दु:खी झाली. कारण ते व्यक्तीमत्वच तसं होतं. मध्यम उंची, सडपातळ देहयष्टी, हाडाचे शिक्षक, धार्मिक वृत्ती, सतप्रवृत्ती, गांधीवादाचा स्पर्श असलेले, असे हे अष्टपैलू व्यक्तीमत्व. जमीन वाटप व वादविवाद मिटवीण्यात हातखंडा असलेले, न्यायालयानेही मान्य करावेत असे निर्णय. योग्य व मान्य अशा न्यायदाना नंतर दोन्ही बाजूच्या पार्टींचे हातात हात मिळवून समेट घडवून दिल्या शिवाय आपले न्यायदान ते पुर्ण समजत नसत. शाळेत मराठी व भूगोल शिकविण्यात माहीर. त्यांचे ड्रॅाईंग चागले होते. हस्ताक्षर लक्षवेधी होते. “वाचाल तर वाचाल” हे त्यांचे ब्रिदवाक्य होते. आधुनिक विचाराचे वलय असलेलं एक सर्वमान्य व्यक्तिमत्व होतं. शाळेत कवीतेचे रसग्रहण कसे लिहावे हे फक्त आणि फक्त पॅाल सराकडूनच शिकावे. ते कवीमनाचे होते. ते उत्तम कवीता लिहीत. वृत्तपत्रे, मासिके, छोटेखानी अंक ह्यात त्यांचे लेख/कवीता प्रसिध्द होत. आपली कुपारी/कादोडी संस्कृती जतन करण्यासाठी ते विशेष लिखान करीत व त्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न असे. त्याची अनेक पुस्तके व कवीता संग्रह सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत. तर असे हे अनेक पुरस्काराने सन्मानीत केलेले एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवून लोकांच्या मनात घर करून न राहीले तरच नवल. “जगाच्या रंगमंचावर असे वापरा कि तुमची भुमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या पडल्या पाहीजेत” या उक्तीत पॅालसर कुठे कमी पडतील असे मला तरी वाटत नाही. मोठ्या माणसाची खासीयत अशी असते कि त्यांची आठवण ठेवावी लागत नसते तर ते आठवणीत घर करून राहतात. गुरूजी मधे अहंकार नव्हे तर नम्रता वास करीत होती. गरूजींना माणुसकीची झालर शोभून दिसत होती. दिव्याने जरी दिवटी, पणती, समई, कंदील पैकी कसलेही रुप धारण केले तरी उद्दीष्ट मात्र “ देह जळो, अन जग उजळो” हेच असते. वसईकरांच्या गळ्यात ताईत बनून घर करून राहीलेल्या पॅाल सरांचे उद्दीष्ट ही हेच असेल ना?
इश्वर पॅालसरांच्या आत्म्यास सद्गती देवो हिच मनोकामना. 💐
तो हसरा चेहरा,
नाही कुणाला दु:खवीले,
मनाचा तो भोळेपणा,
कधी नाही केला मोठेपणा,
उडूनी गेला अचानक प्राण,
पुनर्जन्म घ्यावा हिच आमची प्रार्थना.
💐भावपूर्ण श्रद्धांजली💐
🙏🏿
----समाप्त---/