राजेश-रिनाचा लग्नाचा 25 वा वर्धापन सोहळा -20/12/2023

 25 वर्षा पुर्वी राजेश व रिना हे जोडपं विवाहबद्ध झाले. आणि त्या दिवसापासून नांदान गावातील प्रसिद्ध सोज कुटुंबातील रिना व मेरभाट मधील मिनेज घराण्यातील राजेश ह्यांचा ऐन तारूण्यातील लक्ष्मी-नारायणाचा जोडा शोभून दिसायला लागला. आई प्रमाणे प्रेम करणारी व आई ह्या नावाने परीसरात प्रसिद्ध असलेली सासू लाभल्यानंतर रिनाला आकाश ठेंगणे वाटायला लागले. पुढे रिना-राजेशच्या जीवन वेलींवर दोन रत्न-फुले शोभायला लागली. रिना - राजेशचे कुटुंब एक चौकोणी कुटूंब झाले. राजेशने तोपर्यंत मेडिकल स्टोअर मधे चांगला जम बसवला होता. तर रिनाने आपल्या शिक्षकी पेशात पाय रोवले होते. मुले शिकत होती. पण नियतीने रिनाची परिक्षा घ्यायचे ठरवले. रिनाचा फार मोठा आधार असलेले तीचे तरूण असे बाबा अल्पशा आजारात देवाला प्रिय झाले. हा रिनासाठी पहिला धक्का होता. लग्ना नंतर अगदी बारा वर्षात आईप्रमाणे असलेल्या सासूचे अकाली निधन झाले. पुढे मेडिकल धंद्यातील स्पर्धेमुळे राजेशला आपले स्टोअर दुसऱ्याला चालविण्यास द्यावे लागले. त्यानंतर राजेशने कॅडबरी डिलरशीप मधे प्रवेश केला. त्यात तो चांगले यश कमावत होता. पण आपल्याच घरासमोर झालेल्या मोटरसायकल अपघाता मुळे राजेशला तोही व्यवसाय बंद करावा लागला. सारखा कौटुंबिक जबाबदारीचा भार रिनावर वाढत होता. राजेश झालेल्या अपघातातून रिकव्हर होत असतानाच औषधाच्या साईडइफेक्ट मुळे राजेशचे लिवर काम करेनासे झाले. असे एकामागोमाग एक धक्के रिनाचे जगणे त्रासदायक बनवत होते. राजेश खंगत चालला होता. आणि ईथेच रिनाची खरी कसोटी होती व तोच एक रिना-राजेशच्या जिवनातील टर्नींग पॅाईंट होता. रिना आलेल्या संकटांशी खंबीरपणे तोंड देण्यासाठी उभी राहीली. ह्यातून राजेश वाचेल असे कोणालाही वाटत नव्हते. राजेशला मी वाचवणारच हा एकच ध्येय समोर ठेवून रिना राजेशच्या आजाराशी झुंज देत राहीली. नवी मुंबईतील बेलापूर येथील लेडी डॅाक्टर आबा व डॅा. मिर्झा ह्यांच्या टिमच्या सतत संपर्कात राहून त्यांच्या अपॅाईंटमेंट घेऊन लिव्हर मिळविण्यात ती यशस्वी ठरली. ॲापरेशन सक्सेस झाले. आपल्या ध्येयपूर्ती पर्यंत ती पोहोचली. हाच तो तिच्या जिवनातील टर्निंग पॅाईंट. राजेश पुर्णपणे बरा झाला. केवळ रिनामुळेच राजेश वाचला. राजेश -रिनाला आपल्या वैवाहिक जिवनातील 25 वा (सिल्वरज्यूबीली) वर्धापन दिन साजरा करायचे भाग्य आज लाभले आहे. त्यांच्या आनंदात सहभागी होण्याच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत. देवाला धन्यवाद. राजेश-रिनाला दिर्घायुष्य लाभावे व पुढील आयुष्य निरोगी, पिसफुल आणि प्रॅास्पॅरिटीचे जावे हि प्रार्थना. राजेशला त्याच्या आजारपणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे मदत करणाऱ्या प्रत्येक जणांच्या ऋणांत राजेश-रिना राहू इच्छितात. आभारी.

             -🙏🏿-

 

//// पट्रीक डिमेलो ////

फलश्रुती , दोनतलाव- पिपरी


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013