स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३
हा आठवडा “कन्या आठवडा” म्हणून साजरा होत आहे. आणि ह्याच आठवड्यात ह्या कुमारी कन्येची प्राणज्योत अनंतात विलीन झाली. वडिल सोमाशेट व आई बेबी सह सहा बहीणी, एक भाऊ अशा संगीत, ताल, लय, रिदम (Rhythm) यांचा वास असलेल्या कुटुंबात ललिता हिचा जन्म झाला. रूपवान, गुणवान तरीपण लग्न न करण्याची सुप्त ईच्छा ती मनी बाळगून होती व बाबा-बेबीनेही ती हेरली होती. आपल्या पांच बहीणीच्या बाळंतपणांत ती सुद्धा बेबी बरोबर एका आईची भुमिका बजावत होती. म्हणूनच सर्व बहीणीला ती अतिप्रिय अशी दुसरी आई होती. कुटुंबात ती सर्वांची लाडकी होती. सोमाशेट तिला “बेटा” म्हणून हाक मारीत. आपल्या पाचही बहीणींची मुले तिला “लिया मावशी” अशी प्रेमळ हाक देत. सोमाशेटच्या शेवटच्या आजारपणात ललिताने केलेल्या सेवेला तोड नव्हती. आपल्या बेबीचीही (मम्मीची) तशीच सेवा करायची तिची इच्छा होती. पण नियतीला ते मंजूर नव्हते.
प्रेमळ स्वभाव, सर्वाशी अदबिने बोलणे, पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे, मुलाबाळंची विचारपूस करणे आणि येणाऱ्या पाहूण्यास न चुकता चहा टाकणे हे गुण तिच्यात उपजतच होते. जेव्हा कधी जाणं व्हायचं थोडीशी विचारपूस करून ती चहा टाकण्यास धावायची व बेबीने हाक दिल्यास तत्परतेने म्हणायची हो माहीत आहे आणि खरंच बिनसाखरेचा चहा नेमका पुढे यायचा. तेव्हा हा तिच्यातला हजरजबाबी पणा नेमका जाणवायचा. तसेच ललिता वृत्तीने धार्मिक होती. नाळे येथील पसायदान मधे शनिवारी संध्याकाळच्या मिसात तिचा हमखास सहभाग असायचा. आपल्या गोड आवाजात ती गायनात सहभागी होत असे. मिसातील एक वाचन हमखास तीचे असायचे.
“चार वर्षाचे मुल दिवसातून तिनशेवेळा हसते व एक प्रौढ माणूस पन्नास वेळा हसतो असे म्हणतात मग इथे चेहऱ्यावर सतत स्मित हास्य असणाऱ्या ललिता बद्दल काय म्हणावे?
ललिताचे जाणे तसे थोडे लवकरच झाले. पण हेही तेवढेच खरे आहे कि मृत्यु नेतो ते एक शरीर असते व मागे ठेवतो ती स्मृती असते. थोडक्यात “नियतीने आखलेल्या अटळ रेषा पुसता येत नाहीत”.
गुडघ्याचं ॲापरेशन हे केवळ निमित्त होऊन काहीक व्याधींनी शरीरात प्रवेश करून तिला जिवनाच्या अंतिम टप्प्यात नेले.
आणि तीने मृत्युला हसत-हसत कवटाळले.
“पुर्ण विरामाचा क्षण कुणास ठाऊक कधी राहील उभा !!”
“हे कुमारी कन्यके, हे ललिते, 👆🏿👆🏿हेच तुला भावपूर्ण श्रध्दांजलीचे दोन शब्द”
🌹🙏🏿🌹
////पॅट्रीक डिमेलो////
फलश्रुती
दोनतलाव-पिपरी