एक आठवण वालीआप्पाची (१९/०४/२०२०)

 जवळजवळ तीस वर्षा अगोदरची हि आठवण शेअर करीत आहे. लग्न होऊन एक दोन मुलाचे बाप झालेलो होतो. तो दिवस रविवारचा होता. चौथा मिसा आटोपून मी घरी येत होतो. साधारण दहा वाजलेले होते. मी सोदाड पर्यंत पोहचलो तेव्हा श्रमदिपच्या ओट्यावर जाॅनअण्णा, फरशाआप्पा, व वालीआप्पा, काहीतरी बोलत ऊभे होते. मी तेथे गेलो. तेव्हा समजले कि रात्री वालीआप्पाच्या गळ्याखाली मासलीचा काटा अडकला होता. रात्रभर झोप तर नाहीच पण सकाळीही तो फार इरीटेट करत होता. सुक्या भाताचा घास, पिकलेली केळी खाणे वगैरे उपाय रात्रीच झालेले होते पण व्यर्थ. म्हणून कोणत्यातरी डाॅक्टर कडे जायचा विचार चालला होता. जाॅनअण्णाने हर्षा पाटील डाॅक्टराकडे जायला सांगितले. त्या वेळेला डाॅ हर्षा पाटीलाने चाळपेठला जस्ट नवीन हाॅस्पिटल चालू केले होते. व ते डाॅक्टर जाॅन अण्णाचे जवळचे मित्र होते. ते एक नवीन पण चांगले डाॅक्टर होते. ते सर्जन होते.पण माझे मन मला सांगत होते कि हा असा काटा काय प्रथमच गेलाआहे काय? ह्या पूर्वी असे कोणाचे काटे अडकले नाहीत काय? तेव्हा कुठे आपल्या कडे असे हाॅस्पिटल्स होते. लोक जवळ्च्या साध्या डाॅक्टर कडेच जात होते ना? मग अशा छोट्या गोष्टी साठी हर्षा पाटलाच्या मोठ्या हाॅस्पिटल मध्ये का? मला त्या वेळेला आगाशिच्या पंड्या डाॅक्टरांची आठवण झाली. (मला स्वत:ला पंड्या डाॅक्टर बद्दल एक चांगला अनुभव आला होता) म्हणून मी जाॅन अण्णाला सांगितले कि पंड्या डाॅक्टर कडे जायला काय हरकत आहे. तर जाॅन अण्णा बोलले कि ते डाॅक्टर BAMS. त्यांच्याकडे Instruments नसतात. हर्षा हा Surgeon आहे. त्याच्याकडे सर्व प्रकारची Instruments असतात. मी काहीच बोललो नाही. पण माझं मन मला परतपरत सांगत होतं कि वालीआप्पाने पंड्या डाॅक्टर कडेच जावे. शेवटी हर्षा डाॅक्टरकडे जाण्यासाठी वालीआप्पा गाडीवर बसले. लगेच मी धावलो आणि वालीआप्पाला सांगितलं एकटा नको जाऊस मी बरोबर येतो असं म्हणून मी वालीआप्पाच्या पाठी बसलो.


जाताना रस्त्यात वाली आप्पाला कायकाय सांगून पंड्या डाॅक्टरकडे जाण्यासाठी त्याचे मन वळवले व आमची स्वारी पंड्या डाॅक्टर कडे गेली. पंड्या डाॅक्टर कडे नेहमीच गर्दी. कमीतकमी तुम्हाला एक तास तरी बसावं लागेल. नंबर लावून आम्ही बाहेर तलावाच्या बाजुला गेलो. तेथे एक केळीवाला भैया बसला होता. आम्ही त्याच्या जवळून चार केळी घेतली. तीन केळी वाली आप्पाने खल्ली व एक मी, पण काटा काही उतरला नाही. अजून थोडंसं टाईमपास म्हणून आम्ही ईकडेतिकडे फिरलो. व आता नंबर येईल म्हणून दवाखान्यात गेलो. पाचच मिनीटात आमचा नंबर आला. डाॅक्टरांनी मधे बोलावलं. मी सुद्धा मधे गेलो. डाॅक्टरांनी ऊभ्या ऊभ्यानेच वालीआप्पाच्या तोंडात एक स्टीलची पट्टी घातली व तीनचार वेळा मागे पुढे केली. मग म्हणाले कसं वाटते? गेला की आहे? वाली आप्पा म्हणाले, गेला गेला, गेला वाटते. डाॅक्टरांनी बाहेर जाऊन बसायला सांगितले. पाच-सात मिनिटे गेली आणि वालीआप्पा मला बोलले कि काटा अजून टोचत आहे. चल आपण हर्षा डाॅक्टर कडे जाऊ. ऐकताच माझ्या तोंडचं एकदम पाणीच पळाले. माझी बाजू फसली असेच वाटले. आता काय करायचं ह्या विचारात असतानाच डाॅक्टर बाहेर आले. वालीआप्पला विचारलं कि काटा गेला काय? वालीआप्पाने नाही म्हटल्यावर डाॅक्टर त्याला परत मधे घेऊन गेले. मी थोडा नाराज झाल्यामुळे मी वालीआप्पा बरोबर आत गेलो नाही. मी बाहेर बसलेलो आहे तोच नेल्सन दादाची गाडी दवाखान्याच्या दरवाजाजवळ येऊन उभी राहिली. म्हणाला कि मी हर्षा डाॅक्टरच्या हाॅस्पिटल मधे फिरून आलो. तुम्ही तिथे नव्हतात. पण अण्णाने सांगितलं होतं कि ते हर्षा कडे नसतील तर पंड्या डाॅक्टर कडे जा पात्रीसने त्याला नक्कीच पंड्या कडे नेलं असेल. म्हणून मी ईकडे आलो. पण नशीब म्हणजे त्यांच वेळेला वालीआप्पा व पंड्या डाॅक्टर एक कागदाची पुडी घेऊन आमच्या बाजुला आले. पुडी उघडून त्यातील y शेपचा काटा आम्हास दाखवला. तिच पुडी मी नेल्सन कडे देऊन त्याला घरी पाठवले. नंतर वाली आप्पाने जाऊन डाॅक्टरांची फी पेड केली. वालीआप्पा बाहेर येऊन म्हणतो कसा कि पात्रीस फक्त दहा रुपयेच घेतले, किती स्वस्त डाॅक्टर.   


पण मी खुश होतो कारण माझा विजय झाला होता. मनांत जाॅन अण्णाची भीती होती ती निघून गेली होती. पंड्या डाॅक्टर वरील माझा विश्वास पुन्हा एकदा धृढ झाला होता. दुपारी साडेबारा वाजता मी व वालीआप्पा घरी आलो. 


----समाप्त---/

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013