“आठवण जिजीची” (०८/०६/२०२०)

 08/06/1932 हा जिजीचा जन्म दिन. तो बुधवारचा दिवस होता. 03/02/1948, दिवस मंगळवार, ह्या दिवशी जिंजीचे लग्न झाले. लग्नाला वय सोळा वर्षे ही पुर्ण नव्हते. दादा आणि ताई इंजिनीअर झाले तेव्हा ती फार खुश झाली. पुढे स्वप्न मोठी होत गेली. त्यानंतर मला एकदा ती म्हणाली कि आपल्या कुटूंबात कोण डाॅक्टर होऊ शकतो काय? मी म्हणालो का नाही. तर ती म्हणते की ते शिक्षण करायला फार हुशारी लागते, पैसा लागतो आणि डाॅक्टरची मुलंच डाॅक्टर होतात. पण मृत्युनंतर का होईना जिजीची ती इच्छा सुद्धा पुर्ण झाली. डाॅक्टर, डाॅक्टर सानी आल्मेडा.                 


16,October 2007 ह्या दिवशी जिजीला देवाज्ञा झाली. ती 75 वर्षे जगली. इथे मला जीजीची एक आठवण शेअर करावीसी वाटते :-


मी तिसरीत असेन. शाळेला गणपतीची सुट्टी होती. मी जिजीबरोबर कानभाटात गेलो होतो. कानभाटातील पासूबाबाच्या घरासमोर आपली छोटीसी जागा आहे. अगदी मेन रोडला लागून. त्या जागेत जिजीने तुळस लावली होती व दांडावर आणि कांडोळीवर गवतीचहा ( शापात्यो) लावला होता. तुळसही चांगली झाली होती व शापात्यो सुध्दा चांगला फोफावला होता. जिजी आणि मी तिथे असताना जिजीची अंगाळी गावातील एक चुलत बहीण (तेरशीमावशी) रस्त्यावरून घरी जात होती. ती थांबली. जिजीबरोबर तिच्या काही गप्पा झाल्या व म्हणाली कि ‘रोजे, तुळस मस्त जाले, गणपती हाय तॅ भाव पण बराॅ हायदॅ.’ ते मी बरोबर ऐकूण घेतलं . जिजी बोलली कि ‘भाव बराॅ हाय. मॅ पाल्यावाळ्याला दिले सुद्धा’. मावशी निघून गेली. थोड्या वेळाने तेथे तोरभाटातील बादलअंकल आले. त्याने जिजीला शापात्यो द्यायचा काय म्हणून विचारले. जिजीला त्याने काही पैसे सांगितले. जिजी त्याला म्हणाली एवढे कमी? काही वाढव. तेव्हा मावशीने सांगितलेल्या शब्दात मी त्याला सांगितले कि ‘गणपती हात त्याव भाव वाडलॅ हायदॅ’. तेव्हा बादल अंकल बोलले ‘हा हा गणपत्याकरता भाव वाढले. शापात्याव वगळ शा (चहा) करत्यात गा आण गणपत्यायी साॅंड वरती कराॅन त्यांमीनॅ कपे-कपे ओतीस्यात’. त्यावर जिजी फार हसली. मला काही समजले नाही पण मीही हसलो. बादलअंकलचा तो विनोद ब-याच वर्षांनी मला समजला. आता कुठे शापात्या बघीतल्या किंवा घरी चहासाठी शापात्या आणल्या कि मला बादल अंकल व त्याचा विनोद आठवतो व मी फार हसतो.😄😁😆



जिजीच्या आजच्या जन्म दिनी जिजीला शतश: प्रणाम 🙏🏿🙏🏿🙏🏿


----समाप्त---/

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013