१२/०५/२०२३ “एक भला माणूस

 आपल्या आब्राहम नाक्यावर एक फ्रुट सेलर आहे. जरी नाव माहीत नसले तरी आपण बहुतेक सर्वजण त्याला ओळखतो. एकदम भोळा माणूस. मोकळ्या हाताचा, उदार, शांत स्वभावाचा, पापभीरू, प्रामाणिक, प्रेमळ व सर्वांना हवा-हवासा वाटणारा आहे. आपण सर्वांनीच अनुभवले असेल कि फळे देताना काटा पाडून देतो व कधी कधी एखादे फ्रुट जास्तही देत असतो. एखादे फळ मागितल्यास प्रेमाणे देतो. कोणी फळ उचलल्यास तो हसतो पण चिडत नाही. अधिक चौकशी अंती समजले कि तो धार्मिक वृत्तीचा असून पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत स्वत:ला त्याने झोकून दिले आहे. रोज दुपारी एक ते तीन ह्या वेळेत आपल्या गावी फोनवरून २५ ते ३० माणसाच्या समुहास प्रार्थनेद्वारे मार्गदर्शन करीत असतो व दर 15 दिवसांनी एकदा 400 ते 500 माणसांच्या ग्रुप करीता तो प्रार्थनेचे आयोजन करीत असतो. 

   त्याच्याशी थोडंसं बोलत असताना माझी क्युरीयोसीटी वाढत गेली त्यात कळले की त्याच्या जीवनात एक ट्रॅजेडी घडली व तेव्हापासून आयुष्याचा टर्निंग पॅाईंट सुरू झाला.  

     ह्या माणसाचं नाव 

“लालबाबू रामप्रसाद महतो”. हा माणूस बिहार मधील सितामडी जिल्ह्यातील बाजपट्टी गावात राहतो. वय 40 वर्षे आहे. आई -वडिल, व दोन भाऊ आहेत. मोठा भाऊ शाम नालासोपाऱ्यात रिक्षा चालवतो. तर छोटा भाऊ सुनील घरी शेती काम करून आईवडिलांना मदत करतो.  

     लालबाबू लहानपणापासून थोडा आजारीच होता. 2008 साली लग्न झाले. व हळूहळू आजार बळावू लागला. शरीर कृश होऊ लागले. आई वडील त्याला दिल्लीला घेऊन गेले. अगदी मृत्यूशैयेवर होता. T B चे निदान झाले. आईवडिलांनी 3 लाख रुपयास जागा विकून उपचार केले. पैशाची बरबादी झाली. ओळखीतल्या डॅा ने सांगितले कि सहा महीण्याच्या आत मरणार. पैसा तर संपला आता काय? इथे मेला तर सुनेच्या माहेरील लोक लग्नात दिलेल्या दिड लाख रुपयांच्या हुंड्यासाठी तगादा लावून हैराण करतील म्हणून एके रात्री बाबूलालचे वडील त्याला गुपचुप घेऊन नालासोपाऱ्यातील भावा कडे ठेवून आले. उद्देश हा कि नालासोपाऱ्यात आहे असे कोणाला कळणार नाही . कुठे गेला हे माहीत नाही असे सांगायचे. म्हणजे मेला तरी गुलदस्त्यात राहील व दहेजचे पैसे देने वाचतील.  

       नालासोपाऱ्यात भावाकडे फक्त आठ दिवस राहीलो. राहात असताना मनात विचार येऊ लागले की माझ्या मुळे आईवडिलांना त्रास, भावाला त्रास, बायकोला त्रास व स्वत:लाही त्रास. आठव्या दिवशी ट्रेन खाली जीव द्यायचा विचार पक्का केला. शरीरात त्राण नव्हता. प्राण फक्त नावापुरताच शिल्लक होता. रात्रीचे बारा वाजले. भाऊ झोपल्याची खात्री करून सर्वशक्तीनिशी बळ एकवटून उठलो. चालताना आधार म्हणून कोपऱ्यातील काठी घेतली व रेल्वे ट्रॅक कडे निघालो तो आत्महत्येसाठी. अतिशय हलाखीमुळे रात्री 12 वाजता निघालेला बाबूलाल मोठ्या कष्टाने पहाटे तीन वाजता ट्रॅकपाशी पोहोचला. तीन वेळा झोकून द्यायचा प्रयत्न केला पण तिन्ही वेळेला एक अद्भूत शक्ती त्याला मागे ओढत असल्याचा भास होत होता. तो पर्यंत सकाळचे सहा वाजले होते. प्रातर्वीधी साठी आलेल्या एका माणसाने हटकले. व जीव का देत आहेस म्हणून विचारणा केली. बाबूलालने इत्तंभूत हकीकत त्याला कथन केली. आणि इथेच बाबूलालच्या खऱ्या आयुष्याचा टर्निंगपॅाईंट दडलेला होता.  

     त्या इसमाचा नाव होते राजेश. राजेशने त्याला आपल्या बरोबर घेऊन भुईगावात मर्ती प्रार्थना केंद्रात आणले. सकाळी सहाच्या टाईमात निघालेले ते दोघे दुपारी दोन वाजता प्रार्थना केंद्रात पोहोचले. प्रार्थना चालू होती. बाबूलालला काहीच बोध होत नव्हता. तीन वाजता मर्ती प्रार्थना स्थळी आले. आणि अचानक पणे बाबूलालचा तोल जाऊ लागला. बाबूलाल जमीनीवर पडू-उठू लागले. आणि त्या वेळेपासुन बाबूलालला आपण व्यधीमुक्त झाल्याचा साक्षात्कार झाला. त्या पुर्वी बाबूलालच्या पोटात अन्न अथवा पाणी सुद्धा स्थिरावत नव्हतं. पण त्या दिवशी बाबूलालने मात्र तीन प्लेट जेवन घेतले व सहा ग्लास पाणी प्यायले. व त्या दिवसापासून बाबू लालने स्वत:ला प्रार्थनेत झोकून दिले. व प्रार्थनेच्या बळावर बाबूलाल बरा झाला. अशक्तपणामुळे ताकतीची कोमे होत नव्हती. म्हणून बाबूलाल राजेशला घराच्या पेंटींग कामात मदत करू लागला. राजेश बाबूलालला थोडा चहापाणी खर्च द्यायचा. एके दिवशी नंदाखाली हॅास्पिटलच्या बाजुला एका घराचे पेंटींगचे काम चालू होते. त्या घरात बाबूलाल राहात असे. एक वेळ अशी आली की काम बंद असल्यामुळे पैसा नाही. खायला अन्न नाही. भुक अनावर झाली होती. आब्राहम नाक्यावर आल्यावर त्याला एक जेन्ट्स पर्स मिळाली. त्यात शंभरची नोट मिळाली. तीस रुपयात जेवन उरकले. घरी आल्यावर पर्स निट उघडून पाहीली असता त्यात त्याला अजून तीन हजार रुपये मिळाले. प्रयत्न करूनही कोणी पर्सवाला गवसला नाही. त्या पैशात बाबूलालने छोटासा भाजीपाला विक्रीचा धंदा सुरू केला. धंद्याचं स्वरूप वाढू लागले. 2017 ते 2019 दोनतलाव येथे रस्त्यावर फळवीक्रीत जम बसला. पण करोनामुळे तेथून गाशा गुंडाळावा लागला. नंतर 2020 ते आजतागायत आब्राहम नाक्यावर बाबूलालच्या धंद्याची वाढ होत राहीली. गाबाबूलालच्या मागे पैसा धावू लागला. आज बाबूलाल कडे एक स्वत:चं घर , एक टेंपो, एक रिक्षा व एक टुव्हीलर आहे. धंद्यात चांगला जम बसवून बाबूलाल आपल्या आईवडीलाला व बायकोला भेटायला गावी गेला. तीथे एकदा रस्त्यावरून जाताना एका शेतात एक बाई काम करताना दिसली. ती फार अशक्त व आजारी होती व सारखी दयार्द बुद्धीने बाबूलालकडे पहात होती. तिला प्रार्थनेची गरज आहे हे बाबूलालने ओळखले. बाबूलाल तिच्या जवळ गेले तिच्या परवानगीने तिच्यासाठी प्रार्थना केली. आठ दिवसांनी त्या बाईचा बाबूरावला फोन आला कि ती व तिचे संपूर्ण कुटुंब रोगमुक्त झाले. त्यानंतर त्या बाईने आजुबाजूच्यांना सांगून त्याना बाबूलालच्या प्रार्थनेचे सामर्थ्य समजावले. व तेव्हापासून बाबूलालची प्रार्थना चालू झाली.    

आपल्या कमाईतील काही भाग तो दान करीत असतो. आज बाबूलाल कडे एक टेंपो, एक रिक्षा, एक टुव्हीलर व राहायला स्वत:चे असे घर आहे. बाबूलालला एक नऊ वर्षाचा मुलगा आहे. त्याच्या प्रार्थनेत हिलींग पॅावर असल्याचा अनुभव आल्यामुळे त्याला बरेच लोक आपल्यासाठी प्रार्थना करायला सांगतात. तो घरी येऊनही प्रार्थना करतो. भुईगावच्या ह्या 

प्रार्थना संघात गेल्यास पैसे मिळतात हे त्याला मान्य नाही. फक्त आणि फक्त पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावरच त्याचा विश्वास आहे हे त्याच्या बोलण्या वरून जाणवले.


             🙏🏿


शब्दांकन 


  /////पॅट्रीक डिमेलो///

   दोनतलाव -पिपरी


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013