मंगळवार “आमशी पडाईतशी बाय” (२५ जून २०१९)

 जाम जुनी गोष्ट. मॅ लानाॅ हाॅताॅ. आेट्योरती कयतरी खॅळातोताॅ. इंधाळ्या दांडीआेरती कागुळाॅ बॅहाॅन जोरा-जोराय कावकाव करतोताॅ आन तोडीस हेपूट हालवीतोताॅ. मा बाजुला पिलदादय पिंड्योरती बेहलती. कागुळ्याई कावकाव आयकाॅन पिलदादय बोयली कॅ कुण पावना यासा हायदे. ता आयकाॅन माय कान एकदम कडक उबॅ रॅलॅ अण मॅ एकदम बोयलाॅ ‘कुण पावना यासा’. तिगाळा ती बोयली ‘नायना कागुळाॅ आॅडाॅ जाॅराजाॅराय काॅकातॅ मनजॅ नक्कीस कुणतरी यासा हाय’. आण माला उकांबॅ लागलॅ. मॅ एकहारकाॅ आतदारा क-या लागलाॅ आण वेहीतनॅ कुण येतॅगा ता बग्या लागलाॅ. 


आन मा मनांत हाॅता ताहास जाला. दिखली-दिखली, माला आमशी पडाईतशी बाय जरा लांबनॅस दिखली. मॅ जाॅ खुश जालाॅ कॅ ताॅडाॅ नाशासाॅस बाकी रॅलाॅ. सोरायी नजार जही बोस्क्योरती तही माई नजार बायश्या हातात कय दिखातॅगा तेआेरती. आमशी पडाईतशी बाय कत्तॅस खाली हाताय याशी नाय. कत्तॅ दोदाल, रॅवाळा, सामट्यो, खपश्यो, तर कत्तॅ धापट्यो, ढॅस्का, पाणगाॅ, तीखाट भाकर्यो तर कत्तॅ रमाकाडा बिस्कीट, सावळायो गोट्यो, पेपरमीटश्यो गोट्यो, लिबाय गोट्यो आहा निरनिराळा कय तरी खादो घॅवाॅन याशी. माला वॅंग्यात घॅआॅन माव वाटाॅ दिलाॅ गा मग मॅ पसार आेह्यासाॅ. तर अही आमशी पडाईतशी बाय मा ॲकट्याईस नाय तर आमश्या सगळ्या भावंडाई लाडकी. तहीस ती सगळ्या लानथाॅराई पण लाडकी. आमश्या कळसु दमॅल कुटुंबातसा तिला कुन बॅठ्या जायनाय आहा कत्तॅस आॅहॅनाय. तर अही आमशी पडाईतशी बाय ८६ वहराई जाले व अजुनी ठणठणीत हाय. दोन-अडीस वहरा पुडनॅ तिला एक सिवीअर अॅटॅक यॅआॅन गॅलाॅ आन तॅतनॅ ती वासली. त्यानंतर ती बारीकसारीक छाती दुखावामुळ्ये सात वॅळा डाक्टर दरी नीली. डाक्टरदरी निली गा डाक्टर पण आहातॅ(हसतात) आन विनोदानॅ जोज्याला हांगातॅ कॅ या बाईला जग्यासा हाय गा तुला तिला जगव्यासा हाय. आहा हांगात्यात की कुहण्यातरी प्राण्याला सात जीव आहात्यात, आमशा पडाईतशा बायशॅ आठ जीव जाल्यात.

अह्या आमशा पडाईतशा बायसाॅ मायारसाॅ गोतावळाॅ जरी बाॅठाॅ अहलाॅ तरी जाेज्या हारकाॅ पाॅर अान पिला हारकी सून

मनजॅ बायसा बाॅठा भाग्यस समज्यासा. 


----समाप्त---/

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013