“आदर्श” (२६/१२/२०२१)

 शकुंतला मॅडम, नुकतेच एक वाचनात आलेले वाक्य “आयुष्यात स्वत:वरच समाजाचे लक्ष केंद्रीत राहील अशी चुकून सुद्धा अपेक्षा करू नका.” You are really deserve for that. तुम्ही फार हुशार आहात. तुमच्याकडे ज्ञानांचे व शब्दांचे भंडार आहे. तुमच्यात समयसुचकता हा गुण ओतपोत भरलेला आहे. तुमच्या लिखानाला धार आहे तसेच सहजताही आहे. म्हणून ग्रुपवरती तुम्ही सर्वांचे मन जिंकून आहात. खरच ग्रुपवरील सर्वांचे तुम्ही Undeclared आदर्श आहात. थोडक्यात तुम्ही अष्टपैलू व्यक्तीमत्वाच्या आहात. तुम्ही स्वत:ची पाठ स्वत: थोपटून न घेणाऱ्या पैकी आहात. तुमचे पाय जमीनीवरच आहेत. तुमचं कौतुक करावं तितकं थोडेच आहे. म्हणूनच तुम्ही आमचा अभिमान आहात. हिरकणी, माऊली, ध्येयवेडी, ह्या सर्व उपाद्द्या तुम्हाला कमीच पडतील. म्हणून योगेश हा तुमच्याहून काही कमी असेल तरच नवल. योगेश हा उच्च शिक्षीत, L & T ह्या उच्च कंपनीत उच्च पदस्थ आहे. सायकल भ्रमंतीचा छंद जोपासून निरनिराळे विक्रम पादाक्रांत करण्यात यशस्वी होत आहे. हे एका ध्येयवेडीचच यश म्हणावं लागेल. भावना मॅडम सदर माहीती तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचवली त्याबद्दल तुमचे आभार. तसेच योगेश, शकुंतला मॅडम व संपूर्ण पाटील कुटुंबीयांचे अभिनंदन.


योगेश, तुझी नवीन ध्येय/धोरणे परिपूर्ण होवोत हि सदिच्छा व आशिर्वाद .🙏🏿🙏🏿🙏🏿


----समाप्त---/

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013