डॅा. सानिया आल्मेडा, निर्मळ

 (डॅा. सानिया आल्मेडा ह्यांनी MBBS नंतर आता आपली MD डिग्री टॅाप रॅंकने मिळवली असून आपल्या समाजात व इतरत्र तिचे अभिनंदन होत आहे. डॅा. सानिया आल्मेडा हिचे आईवडील विल्सन व अनिता आल्मेडा ह्यांच्याशी वार्तालापातून डॅा. सानियाच्या ह्या प्रवासाबद्दल मिळालेली माहीती👇🏿👇🏿👇🏿)


        ——॰——


डॅा. सानिया हिचे शालेय शिक्षण सेंन्ट अॅन्थनी कॅान्व्हेन्ट स्कूल, वसई कोळीवाडा येथे झाले. सन 2011 साली इयत्ता 10 वी च्या परीक्षेत तीला 95% गुण मिळाले होते व चार विषयात तीने शाळेत प्रथम क्रमांक पटकावला होता. विशेष म्हणजे दोनतलाव येथील फ्रान्सीस डिमेलो सरांच्या सल्ल्या नुसार तीने कुठलाही क्लास न लावता हे यश संपादन केले. तिच्या शाळेतील आपल्याच परिसरातील परसांव गावातील ॲना मिस हिची ती आवडती विद्यार्थीन. ॲना मिसचे तसेच डिमेलो सरांचे तीला सतत विशेष मार्गदर्शन लाभले. 10 वी च्या यशानंतर तीने आर्कीटेक्ट व मेडिकल ह्या दोन पैकी एका क्षेत्रात करीयर करण्याचे ठरविले व त्यासाठी विविध सेमिनार मधे सहभाग घेऊन मार्गदर्शन घेतले. अखेरीस मेडिकल क्षेत्र निवडून ड्रॅाईंग व डिझाईनींग छंद म्हणून जोपासण्याचे ठरवले. (आजही ती फावल्या वेळेत अगदी सहज उत्तम ड्रॅाईंग काढते. तेव्हा असे वाटायचे की आपली लाईन तर चुकली नाही ना? ). त्यानूसार मेडिकल CET साठी ऊत्तम मार्गदर्शन मिळण्या करीता मुंबई ला जा- ये करण्याची मनाची तयारी केली व सोईचं व्हावे म्हणून वर्तक कॅालेजला सायन्स साठी प्रवेश घेतला. CET च्या अभ्यास क्रमावर भर देत असतानाच तीने 11 वी 12 वी चा अभ्यासही उत्तमरीत्या केला व 82% गुणांसह ऊत्तीर्ण झाली. CET ची तयारी चालू होती पण नेहमीप्रमाणे शासनाचं काही ठरत नव्हते. CET की NEET ? . तयारी तर CET ची केली व महाराष्ट्र शासनाने NEET ठरवली. दोन वर्षे केलेली तयारी वाया गेली. मुबईत सरकारी कॅालेजला प्रवेश मिळण्याची आशा पण मावळली. म्हणून CET दिली, NEET पण दिली आणि इतर विनाअनुदानीत कॅालेजच्या अॅडमीशन टेस्ट सुद्दा दिल्या. CET ला चांगला रॅंक आला पण NEET ला सुद्दा काही वाईट रॅंक नव्हता . त्यामुळे समुपदेशकाच्या सल्ला घेतला व त्यानूसार महाराष्ट्रातील विविध कॅालेजात फॅार्म भरले. नागपूर येथील दत्ता मेघे व कराड येथील कृष्णा इन्स्टीट्यूट ॲाफ मेडिकल सायन्स येथे एकाच दिवशी समुपदेशना साठी बोलाविले होते . आम्ही “कृष्णा “ ची निवड केली व त्यांनी “सानियाची “ ! जुलै 2013 मधे कृष्णा इन्स्टीट्यूट ॲाफ मेडिकल सायन्स(KIMS) , कराड येथे मेरीटनुसार ॲडमीशन मिळाले.


डिसेंबर 2017 मधे MBBS पुर्ण केले. 2018 ह्या वर्षी मुबईतील भाटीया हॅास्पीटल मधे इंटर्नशीप केली व प्रत्यक्ष क्लासला जाणे शक्य नसल्यामुळे , साथ-साथ ॲानलाईन मार्गदर्शन द्वारे PG NEET ची तयारी केली. जानेवारी 2019 मधे PG NEET ची परीक्षा दिली. ॲाल इंडीया च्या कोट्यामधून बेंगलोर येथील कैंपेगौंडा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स(KIMS) या वैद्यकीय प्रशिक्षण संस्थेत Anaesthesia (भुलशास्र) ह्या विषयात एम. डी. ( M.D.) करण्यासाठी मेरीटनूसार प्रवेश मिळावीला. तिथे तीन वर्षांचा अभ्यासक्रम पुर्ण करून कर्नाटक राज्याच्या Rajiv Gandhi University मधून M. D. (Anaesthesia) ही पदवी प्राप्त केली. कैंपेगौंडा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या वैद्यकीय प्रशिक्षण संस्थेत तीने प्रथम क्रमांक मीळवीला. PG ची प्रवेश प्रक्रिया अतिशय किचकट असते , वेगवेगळी कॅालेज, त्यांची गुणवत्ता , उपलब्ध जागा, हवे असलेले क्षेत्र ह्या सर्वांचा मेळ घालणे फार जीकरीचे काम असते, एखादी छोटासी चूक आयुष्याचे नुकसान करू शकते. अशावेळी समुपदेशकासोबत तीच्या मैत्रीनीचे वडील व वसईतील सुप्रशीध्द डॅा देशपांडे व कोल्हापूर येथील डॅा शाहा तसेच वसई येथील डॅा देवेंद्र पाटील ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. बॅंगलोर येथे प्रवेश घेण्याचे आणखी एक कारण म्हणजे तीचे मामा ॲाल्वीन व मामी स्वीडल लोपिस आगाशी- बारोडी हे बॅंगलोरलाच राहात होते. मामा मामींनी तीला ह्या प्रवासात कुटूंबाची कुठलीच उणीव भासू दीली नाही हे विशेष . ज्या वर्षी प्रवेश घेतला तेव्हा वयाने सर्वात लहान सानियाच होती. विशेष म्हणजे आजही त्या इन्स्टिट्यूट मधे पहिल्या ते तीसऱ्या वर्षात शिकत असलेल्या सर्वापेक्षाही ती वयाने लहान आहे. वयाने लहान व मुंबईची असल्यामुळे होस्टेल आणि हॅास्पीटल मधे सर्वांचे सहकार्य तीला मिळाले. आम्हाला आनंद आहे ती MD झाल्याचा, आम्हाला आनंद आहे तीने कॅालेजला टॅाप केल्याचा पण सर्वात जास्त आनंद आहे तीने 12 जुलै 2013 ते 11 जून 2022 अशी नऊ वर्षे घराबाहेर होस्टेलला काढून घरी आमच्या सोबत आल्याचा 😄




कळसु दमेल परिवारा सम्बन्धी माहीती 


कळसु दमेल परिवारा सम्बन्धी काही विशेष माहीती (०१/१०/२०१९)


   A) काही समान नावे

    मास्तरकाकाचे नाव अंतोन

        पांड्या समाधानचे नाव अंतोन

    बिबी काकयचे नाव नाताल

        नातालबायचे नाव नाताल

    ईजमाल दादयचे नाव ईजमाल

          सुकीबायचे नाव ईजमाल

    सी.शिशीनबायचे नाव सिसीलीया

           शिमनीबायचे नाव सिसीलीया

    सायमन वाडेकर

           सायमन सोदाड


  B) ह्यात पाच नावे झुज्या दमेल कुटुंबियाची आहेत व पाच नावे चिमा दमेल कुटुंबियाची आहेत.


  C) ह्यात आपल्या एकूण सहा ऊपकुटुंबात ईनूबाबा कुटुंब exception आहे म्हणजे ह्या कुटुंबातील व्यक्तीचं डबल

         नाव झालेले नाही. 


बरं, ही नावे डबल का झाली असावीत? त्यावेळी नावं कमी पडत होती काय? ऊलगडा होत नाही.


----समाप्त---/


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013