मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023
आज 8 June. आजचा दिवस आम्हा फलश्रुती, बकुळ व प्रतिबिंब कुटुंबांचा आनंदोत्सवाचा दिवस. आज आमच्या मातोश्री
म्हणजेच आमची *जिजी* हिचा जयंती दिन. जिजीला भावपूर्ण आदरांजली. तसेच आज आमचे धाकटे बंधू मॅथ्यू यांचा 60th Birthday. म्हणजेच हिरक महोत्सव. साठ वर्षाचे वय झाल्या नंतर त्याला जेष्ठ नागरीक वा सिनीयर सिटीझन वा बुजूर्ग म्हणून संबोधिले जाते. पण जपानी डॅाक्टर वाड याच्या मते त्यांना बुजूर्ग न म्हणता “भाग्यवान” म्हणावे . मॅथ्यूच्या चेहऱ्यावरून त्याचे वय रिटायरमेंटचे वाटत नाही. मॅथ्यूचे वय जरी वाढले तरी मन मात्र तरूण आहे. आमचा मॅथ्यू एक साधा सरळ माणूस आहे. मागील एका बर्थडे पार्टीला त्याचे मित्र अजू पाटील मॅथ्यू बाबतीत म्हणाले होते “जे पोटात तेच ओठात”. राग,द्वेश, मद-मत्सर ह्या षड्रिपू पासून मॅथ्यू दुर आहे. मॅथ्यू म्हणजे आमच्या मुलांचे लाडके अण्णा. जत्रा असो, सर्कस असो, पिक्चर असो वा इतर करमणूकीचे कार्यक्रम अण्णा मुलांना नक्कीच घेऊन जाणार. अण्णाचे मुलावरील प्रेम व मुलांच अण्णावरील प्रेम हे अबाधित होतं व आजही आहे. अण्णाच्या बाबतीत मुलासोबतचा एक किस्सा नमूद करावासा वाटतो. अण्णांनी 2000 साली घर बांधायला घेतलं. पहीला स्लॅब झाला असेल, तेव्हा आमच्या अजान मुलांनी विचारायला सुरूवात केली कि अण्णा घराला नाव काय द्यायचं, तेव्हा अण्णा गमतीनं म्हणाले घराचं नाव “जेमतेम”. माझं मन धास्तावलं. माझे विचार चक्र सुरू झाले. दोनचार दिवस जाऊ दिले व अण्णाला विचारले ते जेमतेम का बोललास काही मदत वगैरे हवी का. अण्णा म्हणाले मी गमतीने म्हणालो. लागतील तेव्हा सांगेन. जीव भांड्यात पडला. अण्णाचा मित्रपरीवार फार मोठा. त्याच्या सर्व ग्रुप मधे तो हवाहवासा असाच आहे. आमच्या कुटुंबातील कोणत्याही कार्यक्रमाची धुरा आम्ही अण्णांवर सोपवीत असू व अण्णा ती लिलया पार पाडीत असत. पंधरा वर्षांपूर्वी विरार येथील एका महीलेला KEM हॅास्पिटल मधे रक्ताची गरज होती. मॅथ्यू काही कामानिमीत्त KEM मधे गेला होता. मॅथ्यूने लगेच रक्तदान केले. आता ती महीला कांदीवली येथे राहते व आज स्टेट गव्हर्नमेंट मधे मोठ्या हुद्यावर सिनीयर ॲाफीससर म्हणून काम करीत आहे. ति फॅमिली अजूनही मॅथ्यूच्या कॅान्टॅक्ट मधे असून जाव-येव चालू असतो. मॅथ्यू हा सतत रक्तदान करीत असतो. अडप्रसंगात असलेल्यांच्या मदतीला धावून जात असतो. असे अनेक छुपेगुण मॅथ्यू मधे दडलेले आहेत. तसाच तो दानशूरही आहे. निरनिराळ्या ठिकाणी तो त्याच्या ऐपती प्रमाणे दान करीत असतो. अशा माझ्या धाकट्या भावाबद्दल आजच्या ह्या मंगल व शुभ दिनी मी अधिक ते काय लिहावे. माझी आजची अनुपस्थिती त्यालाही नक्कीच जाणवत असणार ह्यात वाद नसावा. मॅथ्यू तुझे भावी आयुष्य यापुढेही बकुळ फुला सारखे सुगंधी व सुर्या सारखे तेजस्वी राहो.
तुझा भाऊ
पॅट्रीक
फलश्रुती