“आपली आग्नेसबाय. बारोडी.” (२९/०६/२०२०)
आज सोमवार, 29/ 06/2020. आज आपली लाडकी बाय(आग्नेसबाय) हिचा 69 वा वाढदिवस. बायला प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व तिच्या समोर नतमस्तक 🙏🏿🙏🏿🙏🏿 होतो. बायला लाडकी बाय संबोधण्याचा उद्धेश म्हणजे आगनेसबाय हि आमची एकुलती एक बहीण. आम्हा चार भावंडात ती मोठी. आम्ही सुद्धा तिचे फार लाडके होतो. ती आम्हावर फार प्रेम करत होती व आजही तितकेच प्रेम करीत आहे. आठवड्यातील आमच्या व्हिजीटची ती आतुरतेने वाट पहात असते. इवन दादा-बंधूचीही ती वाट पहात असते. 29/06/1951 ह्या दिवशी तिचा जन्म झाला. तो दिवस शुक्रवार होता. रविवार, 19 जानेवारी 1969 ह्या दिवशी तिचं लग्न झाले. त्यावेळी बाय फक्त साडे सतरा वर्षांची होती. आम्ही लहान असताना मस्ती केली तर बाय लगेच “बाबाला सांगते थांबा” म्हणून दम ध्यायची. आम्ही बाबाला भित होतो. पण बायने बाबांकडे आमची एकदाही तक्रार केली नाही. तर अशी आमची ही प्रेमळ बाय वयाची 69 वर्षे पूर्ण करून 70 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आम्ही फलश्रुती-बकुळ कुटुंबिय बायला भरपूर शुभेच्छा देऊन तीला दिर्घकाळ उदंड, निरोगी, व शांततामय जीवन लाभावे अशी प्रार्थना करीत आहोत.
----समाप्त---/