“आपली पडई बाय गेली” (०७/०६/२०२१)

 कळसुदमेल परिवाराची लाडकी बाय आज पडद्या आड गेली. टोकर झुज्या कुटुंबाच्या दुस-या पिढीतील शेवटचं रत्न आज हरपलं. बायला चांगलं 89 वर्षाचे आयुष्य लाभलं होतं तरी ती सर्वांना हवी होती. तिच्या जाण्याने कळसु दमेल परिवारात एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. बायला म्म्मी, आई, दादी, बय, आजी आदी पैकी एकही नाव सुट होत नाही. तिला फक्त बाय हेच नाव सुट होत होतं. कारण ती सर्वांचीच बाय होती. मुलांची बाय, नातवंडांची बाय, पतवंडाची बाय, माहेरच्यांची बाय, घरच्यांचीही बाय, नातेवाईकांची बाय तशीच गावक-यांचीही बाय होती. शेजोळ्या-पाजोळ्यांचीच नव्हे तर ती सर्वांचीच बाय होती. ती सर्वांवर प्रेम करायची म्हणून तिच्यावरही सर्व प्रेम करायचे. प्रेम, आस्था, आपुलकी, जिव्हाळा ह्याचा संगम म्हणजे बाय. आपली बाय हि कळसु दमेल कुटुंबातील सर्व लहान-थोर लेकींसाठी एक आदर्श होती. ती म्हणायची नाती टिकवण्यासाठी प्रथम आपले शब्द गोड व जपून वापरा. बाय शिकलेली नव्हती पण वर्तनूकीचे व माणूसकीचे धडे शिकवणारी उत्तम शिक्षिका होती. म्हणूनच ती सर्वांनाच हवीहवीशी व सर्वांचीच लाडकी होती. वयमानापरत्वे तिला जाणे भाग होतं व ती गेलीही पण जाताना प्रत्येकांच्या मनांत घर करून गेली. आपल्या घरच्या संपूर्ण कुटुंबियांचा तिला रास्त अभिमान वाटायचा. ती आपल्या सर्व जावांना मान देऊन होती. आपल्या घरच्या माणसाचा उल्लेख करताना सन्मानाने ‘आमसॅा मंबयसॅा बाबा, आमसॅा बोठॅा, आमसॅा मिंगेल, आमसॅा आलेस, आमसॅा गोंड्या अशा आपुलकीच्या शब्दाने करायची.


बायचा जन्म 7th January 1933. म्हणजेच आजच्या दिवशी बायचं वय 88 वर्षे व 5 महीणे. तसे बायला परमेश्वराने उदंड आयुष्य दिले. व त्या आयुष्याचं बायने सोने केले. बाय म्हणजे प्रेमाचं, संस्काराचं व धार्मिकतेचं रसायन होतं, देवाचं प्रतिरूप होतं. बाय म्हणायची “कोणा कडे जाताना आनंद घेऊन जा कारण दु:ख हे प्रत्येकाकडे असते. “ सुर्य मावळताना आकाशात लाली पसरवतो. बायही जाताना लाली पसरवून गेली. बाय व तीचे माहेर ह्यांचे एक उत्तम बॅांडींग होते, ते आज हरवले. 


मला आठवते ते म्हणजे अठ्ठावीस वर्षांपूर्वी मला जेव्हा तिसरी कन्या रत्न झाले तेव्हा बायच्या डोळ्यातून अश्रु आले. आता त्या अश्रुची फुले झालेली पाहून बाय समाधानी झाली. बाय तब्बेतीने एकदम निरोगी व धडधाकट होती. अगदी अलीकडेच पाच वर्षापूर्वी बायला सिव्हीयर अटॅक आला होता. त्यातून ती सहीसलामत वाचली. ह्यात तीचा लाडका मुलगा जोज्या व सुन पिला ह्यांचा सिंहाचा वाटा होता. बेबी-एलीस कुन्यात, मेरू- नानू, शैला-बेजम, सि. संगिता ह्यांच्याही सेवेला तोड नव्हती. म्हणूनतर बाय ह्या आजारावर मात करू शकली. 10 April 2021 आपल्या बेजमच्या अंत्यदर्शनाला ती आली होती. तीच बायची माहेरची शेवटची भेट. 


म्हणतात ना “ ज्ञानानंतर अहंकार जन्म घेत असेल तर ज्ञान हे विष आहे. परंतु ज्ञानानंतर नम्रता जन्म घेत असेल तर ज्ञान हे अमृत आहे”.

बायच्या जीवनाला माणुसकीची झालर होती म्हणून बायचे जीवन शोभून दिसले.

बाय पडई, कळसु दमेल परीवाराचा तुला अखेरचा सलाम/दंडवत/मुजरा. 🙏🏿💐🙏🏿 


----समाप्त---/

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013