आपली “चेरी ब्लाॅसम जपान टूर फेब्रुवारी २०२०” (०५/०४/२०२०)
मित्रहो, आपली 19 Feb. to 27 Feb जपान चेरी ब्लाॅसम टूर राॅबीन भाटी तर्फे आयोजीत करण्यात आली होती. पण निघण्यापूर्वी ह्या टूरला कोरोना वायरस चे ग्रहण लागले होते. तेव्हा फक्त सुरूवात झाली होती. आपल्या सर्वांच्या मनांत धाकधुक होतीच. राॅबीनने जपानस्थित टूर ॲारगॅनायजर मनिष सराबरोबर लावलेल्या मिटींग मधे थोडसं शंकानिरसन झालं व एकदाचं जाणं निश्चित झालं. ह्या टूर मध्ये राॅबीन तर्फे आपण म्हणजे परेरा सर व सांतान सांबोडी, शिसीन मिनेज धोबीतलाव, लुजान वाघोली, सुकीबाय, ग्रसी, पॅट्रीक व वेरोनिका, सेबेस्टीयन (गोट्या) व फुलानबाय, शिलूसर व मर्षानबाय (सर्व दोनतलाव), मॅन्यूअल व आग्नेस घोसाळी तसेच वसईवरून मार्था व मारीया ह्या नरोन्हा भगीणी असे आपण एकूण सोळाजण होतो. बाकी मनिष सरातर्फे मुंबई व मुंबई बाहेरील मिळून एकूण सोळा जण होते.
19 Feb, आपण पाच-पाचचा ग्रुप बनवून व्हॅनने संध्याकाळी ३.३० वाजता मुंबई एयरपोर्टला हजर झालो. मुंबई एयरपोर्ट वरून ठिक 8.00pm वाजता आपण जपान एयरवेजच्या Flight NH 830 ने जपानला निघालो व 20 Feb. ला सकाळी 7.20 am (Japan time) टोकीयोच्या नरीटा एयरपोर्ट ला उतरलो. बॅगा कलेक्ट करून एक तासात एयरपोर्ट च्या बाहेर आलो. चहा-काॅफी घेऊन आपण आपल्याला घ्यायला आलेल्या बस No. 230-80-08 मध्ये आपण स्थानापन्न झालो. बस मधे मिस. किकी हि गाईड आपल्या स्वागतास हजर होती. ठिक 9.15am आपण रेंकोजी टेंपलकडे निघालो. 10.45 to 11.20am पर्यंत आपण रेंकोजी टेंपल म्हणजेच सुभाषचंद्र बोस मेमोरीयल येथे होतो. आपल्या दर्दैवाने त्या दिवशी ते टेंपल बंद होते.
‘रेंकोजी टेंपल’ हे जपान मधील टोकीयो शहरात असलेले एक जुणं व लहान बौद्ध मंदीर. हे मंदीर 425 वर्षा पूर्वी म्हणजेच 1594 मधे बांधण्यात आलेल व सुंदर कलाकुसरीने सजवलेले हे मंदीर प्रेक्षणिय आहे. एका मान्यतेनुसार ह्या मंदीरात ॲागस्ट 1945 मधे नेताजीचे अस्थिकलश सुरक्षित ठेवून जपण्यात आलेली आहे. जपानी लोक दरवर्षी 18 ॲागस्टला नेताजीचा बलिदान दिवस म्हणून साजरा करतात.
तर अशा ह्या टेंपल समोरील नेताजी सुभाषचंद्रबोसच्या पुतळ्या समोर व ईतर फुलझाडा समोर फोटो घेऊन आपण बसने असकूसा टेंपल कडे निघालो.
रेंकोजी टेंपल जवळील फोटोग्राफी आटोपून 11.20 am चा दरम्यान आपण बसमधून ‘असकुसा’ टेंपल पहावयास निघालो. साधारण 11.50 am ला आपली बस शिबूया क्राॅसिंग जवळ पोहोचली. ‘शिबूया’ हे जपान मधील एक फेमस रेल्वे स्टेशन असून ह्या स्टेशन वरून सरासरी 2.4 millions माणसे येजा करीत असतात. ह्या स्टेशन बाहेर पादचा-या करीता भव्य क्राॅसिंग असुन ते शिबूया क्राॅसिंग म्हणून ओळखले जाते. ह्या क्राॅसिंग वरून एकीच वेळी 2500 लोक क्राॅसिंग करू शकतात. शिबूया हे भरपूर क्लब, बार व रेस्टोरन्ट करीता फेमस आहे. ह्या स्टेशनच्या Exit 8 च्या बाहेर हॅचीको नावाच्या एका कुत्र्याचा ब्राॅंजचा स्टॅच्यू आहे म्हणून ह्याला हॅचीको एक्सीट म्हणून सद्धा आोळखले जाते. ह्या हॅचीको कुत्र्या संदर्भात अशी गोष्ट आहे की हा कुत्रा 1920 पासुन रोज आपला मालक प्रोफेसर युनो (Ueno) ह्याला स्टेशनवर सोडण्यासाठी व संध्याकाळी घेण्यासाठी येत असे. ह्या त्याच्या कृत्यामुळे तो सर्वांच्या पाहण्यात येत होता. पण वर्षभरानंतर एक दिवस प्रोफेसर संध्याकाळी परतले नाहीत. ब्रेनहॅमरेज मुळे त्याचा देहांत झाला होता. मालक वारल्यानंतर सुद्धा पुढे सतत नऊ वर्षे हा हॅचीको रोज संध्याकाळी स्टेशनवर जाऊन आपल्या मालकाची वाट पहात असे. हि स्टोरी प्रोफेसरांच्या एका माजी विद्दयार्थ्याने ऊजेडात आणली आणि हॅचीको म्हणजे एक ईतिहासातील रहस्य ठरलं. 1934 साली हॅचीकोचा एक ब्राॅंज पुतळा उभा राहिला . पुढे एक वर्षानंतर हॅचीको कॅन्सर रोगामुळे मरण पावला. “हॅचीको अमर रहे”।
हा शिबूया क्राॅसिंग आपण बस मधूनच पाहून पुढे दुपारी 12.30 pm वाजता आपण ‘असकुसा’ टेंपलला पोहोचलो.
‘असकुसा टेंपल हे जपान मधील टोकीयो शहरातील असकुसा येथील सर्वात जुणे बौध्द मंदीर आहे. हे मंदीर सेंसोजी कॅनाॅन मंदीर ह्या नावानेही ओळखले जाते. हे मंदीर दयेची देवता गुनाईन हिंला समर्पित केलेले आहे. ह्या मंदीराला दरवर्षी तीस मिलीयनहून जास्त लोक भेट देतात. ह्या मंदीरा बाबत अशी कथा सांगितली जाते कि दोन मच्छीमार भावांना सुमिदा नदी मधे आपल्या जाळ्यात एक कॅनाॅन ची मुर्ती सापडली होती. कॅनाॅन म्हणजे दयेची देवता म्हणजेच Goddess of mercy. गावांच्या मुख्याने आपल्या राहत्या घरात त्या मुर्तीची स्थापना केली व तेव्हापासुन त्या धराचे मंदीरात रूपांतर झाले. ह्या मंदीराच्या बाजुला पाच मजली पॅगोडा, शिंतो मंदीर व समोर दोनशे मिटर लांबीचा शाॅपींग स्ट्रीट असून रस्त्याच्या दोन्ही बाजुने दुकाने आहेत. ह्या दुकानात असकुसा परिसरातील लोकंनी बनवलेले ट्रॅडीशनल स्नॅक्स व इतर कलाकुसरीच्या वस्तू व फोल्डींग फॅन, छत्र्या वगैरे मिळतात. देवीचे दर्शन झाल्या नंतर मंदीर परिसरांत फोटो काढून आपण मार्केट मध्ये फेरफटका मारला. गेटजवळ एक भला मोठा लॅनटन ( कंदील दिवा) पाहून तिथे ग्रुप फोटो काढले.
असकुसा टेंपल नंतर साधारण 2.15 pm ला आपण लंच करण्यासाठी मोती रेस्टाॅरंट ह्या Indian रेस्टाॅरंट गेलो. भुक फार लागली होती. सर्वांना आपआपल्या आवडीच्या व्हेज-नाॅनव्हेज मेनूवर ताव मारून आपली क्षुधा शमविली. खरोखरच जेवन उत्तम होतं. भोजन आटोपल्यानंतर आपण 3.30pm वाजता “टोकीयो टाॅवर” पाहायला आलो. हा टाॅवर पाहण्यासाठी आपल्याला 3.30 to 4.30pm म्हणजे तब्बल एक तास देण्यास आला होता. टोकीयो शहराच्या मध्यभागी ऊभारण्सात आलेला 333mtr उंची असलेला हा सेल्फ सपोर्टेड स्टील मनोरा. हा मनोरा आयफेल टाॅवर पेक्षाही 13 मीटरने उंच आहे. ह्या टाॅवरचे काम June 1957 ला स्टार्ट होऊन December 1958 ला पब्लीकसाठी खुला करण्यात आला. ह्या टाॅवरला 15 मजले असून टाॅप फ्लोअर 250 mtr उंचीवर आहे.ह्या टाॅवर वरून सर्व बाजूंचा नजारा व सीन पाहून आपण थक्क झालो. त्यानंतर 5.00pm वाजता आपण रेनबो ब्रीज पाहण्यासाठी आलो. 498 mtr लांबीचा व 49 mtr रूंदी व 126 mtr उंच असलेला हा ब्रीज नाॅर्थ टोकीयो बे क्राॅस करून शिबूरा पेर व ओदायबा हि ठिकाणं जोडली गेली आहेत. हा ब्रीजचे बांधकाम 1987 मधे सुरू झाले व 1993 मधे पूर्ण झाले. हा ब्रीज पाहून झाल्यानंतर चहा घेऊन आपण Toyota show room पाहायला आलो. निरनिराळ्या गाड्या पाहून झाल्यावर आपण परचेसींग साठी माॅलमधे गेलो. परचेसींग झाल्यावर 6.45 pm च्या दरम्यान आपण डिनरसाठी एका इंडीयन रेस्टाॅरन्टला गेलो. डिनर आटोपल्या नंतर आपण वस्ती साठी 9.00pm ला हाॅटेल vISTA वर पोहोचलो. रूमच्या चाव्या घेऊन जो तो आपआपल्या रूमवर निघून गेले.
शुक्रवार , 21 Feb. 2020 हा आपला जपान मधील दुसरा दिवस. काल रात्री आपण हाॅटेल व्हिस्टा ह्या 3 Star हाॅटेल वरती वस्तीला होतो. आज आपल्याला सकाळी 6.00 am चा वेकअप काॅल होता. 7.30 am to 8.30am ला आपण हाॅटेलवर ब्रेकफास्ट आटोपून पुढच्या प्रवासा साठी बस मधे आलो. 9.30 am ला बस निघाली. आज सर्वजण जाम खुष होते. कारणीही तसेच होते.आपल्या टूरचे नाव ‘चेरी ब्लाॅसम’ टूर असे होते. चेरी ब्लाॅसम म्हणजे नक्की काय ह्याचा ऊलगडा आज होणार होता व तो खराखुराexperience आपण अनुभवणार होतो. कवाझू येथील पिंक फुलांनी बहरलेल्या 8000 झाडात कवाझू रीवरच्या बाजूने आपण फिरणार होतो. जपान मधे फेब्रुवारी ते एप्रिल हा सिझन चेरी ब्लाॅसमचा सिझन असतो. जपानी लोक त्याला झकुरा म्हणतात. हे फुल जपानचे राष्ट्रीय फुल आहे. तसेच हा सिझन National festival म्हणून साजरा केला जातो. तर हे जपानचे अलौकीक सौंदर्य पाहायला आपण निघालो होतो. बस मधे गाईड Miss किकी, मनिष सर व राॅबीन सर हे आपआपल्या परीने चेरी ब्लाॅसमचे वर्णन करीत होते. सहलीचा एक दिवस ॲालरेडी भरल्यामुळे बहुतेकांची तशी थोडी थोडी ओळख झाली होती त्यामुळे सर्वजण मनाने फ्रि (मोकळे) झाले होते. मॅन्यूअल(मॅनी) व आग्नेस हे जोडपं सर्वांशीच फ्रि होतं. बसमधे दोन अडीच तासाचा प्रवास करायचा होता. मॅनीने काही हिंदी गाणे बोलले. आपल्या वसईचे काही जोक शेअर केले. आपल्या कुपारी समाजाचे काही किस्से ऐकविले. लुजान वाघोलीकरने सुद्धा आपल्या गोड आवाजात काही हिंदी गाणे ऐकविले. सांतान परेराने बालपणी आपल्या भावाच्या(तोमास) बाबतीत शालेय जीवनातील किस्से सुनावले. वंदना मॅडमने सुद्धा ऊत्स्फूर्त भाग घेऊन हिंदी गाणे गाईले. खूपच खूप मजा आली. साधारण दुपारी 12.45 pm वाजता आपण कवाझू चेरी ब्लाॅसम एरियात पोहोचलो. समोरचा नजारा पाहून सर्वांची तहान -भुक हरपली. सर्वजण त्या बहरलेल्या झाडात फिरून मनमुराद आनंद लुटायला लागले व आपआपसात ग्रुपने फोटो घेण्यात मग्न झाले. एक स्वर्गीय आनंदच जणू अनुभवीत होतो. नंदनवन ह्यापेक्षा निराळे असेल काय?साधारण 1.45 pm वाजता ॲार्डर केलेले जेवण आले. भुक तर लागलेलीच होतीच. चेरी ब्लाॅसमच्या नजा-यांत एका लाॅनवरती जेवन वाढायला सुरूवात झाली. झाकण खोलताच खमखमित वास यायला लागला. सर्वांनाी आपआपल्या आवडी प्रमाणे व्हेज - नाॅनव्हेज वरती ताव मारून आपली क्षुधा शमवीली. जेवनानंतर आईस्क्रीम सर्व करण्यात आले. अगदी तृप्तचतृप्त झालो. चेरीब्लाॅसमचा हा आनंद अविस्मरणीय असाच होता.
साधारण 3.45pm वाजता आपण स्ट्राॅबेरी पिकींग चा अनुभव घेण्यासाठी निघालो. 5.15pm ला आपण स्ट्राॅबेरी पिकींग मळ्यात आलो. पिकलेल्या स्ट्राॅबेरी स्वताच्या हाताने खुडून क्रिम लावून खाण्याची मजा काही औरच. सगळ्यांनी अगदी मनमुराद व पोट भरेपर्यंत स्ट्राॅबेरीज खाल्ल्या. सर्वांसाठी हा एक नवीनच अनुभव होता. त्यानंतर 6.20pm वाजता आपण बसने डिनरसाठी निघालो व 7.00pm ला ‘गोटेंबा इंडीया’ रेस्टाॅरन्ट ला पोहोचलो. चमचमीत डिनर आटोपून 7.35 pm वाजता आपण तेथून निघालो व वस्ती साठी हाॅटेल क्लॅड (Clad) वर अवघ्या दहा मिनीटात (7.45pm) पोहोचलो. आपआपल्या रूमच्या चाव्या घेऊन व राॅबीन सरांचे उद्या साठीचे इंस्ट्रक्शन ऐकूण जो तो आपल्या रूमवर गेले.
शनिवार, 22 Feb. 2020, आपला तिसरा दिवस. हाॅटेल CLAD वर सकाळचा ब्रेकफास्ट आटोपून 9.20am दरम्यान आपण हाकोणे ‘रोप वे’ एन्जाॅय करण्यासाठी निघालो. जोराची हवा व तुफान असल्यामुळे आपला रोप वे चा प्रोग्राम होऊ शकला नाही. पण तुफान कसं असते त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतला. चालता येऊ न शकणा-या वादळातून कसेबसे एकमेकाना सावरत आपण एकदाचे टेकडीवरील शाॅपींग सेंटर मधे पोहचलो. थंडीमुळे सर्वजण कुडकुडत होतो. तिथे सर्वांना काॅफी-चहा देण्यात आला. समोर सल्फर (गंधक) च्या डोंगरातून निघणार हिरवा सल्फरडायॲाक्साईड (वायू) आपले लक्ष वेधत होता. तेथून 11.00am ला तुफान शमल्यानंतर निघालो व 11.20 am ला मोटोहाकोणे येथे क्रुज वरती पोहोचलो. क्रुजवरती डेकवर जाऊन चहू बाजूंचा नजरेत भरणारा देखावा पाहून, फोटोग्राफी करून एक तास जलविहार करून आपण लंच साठी निघालो. हवेत फार थंडावा होता. शरीर गरम करण्यासाठी चालत्या बस मधे राॅबीन सरांनी सर्वांच्या तोंडात एक- एक झाकण रम घातली. एक निराळाच अनुभव! दुपारी 1.30 वाजताआपण गोटेंबा-शी-निवासी येथील इंडीयन रेस्टाॅरन्ट मधे पोहोचलो. 2.30pm ला लंच आटोपून 3.45pm पर्यंत ‘DIASO’ स्टोअर्स मधे परचेसींग करून बुलेट ट्रेनने ओसाकाला जाण्यासाठी आपण 4.15 pm ला मिशिमा (Mishima) स्टेशनवर आलो. स्टेशन वर दोन फास्ट बुलेट ट्रेन एकमेकांना अवघ्या पाच सेकंदात क्रॅास करताना पाहिल्या. ब-याच जणांनी फोटोही घेतले. एक रोमॅंटीक अनुभव! 5.46pm वाजता आपली बुलेट ट्रेन आली. राऊंड मध्ये फिरणा-या ३-३ माणसाच्या सीट वर आपण स्थानापन्न झालो 320 km ताशी धावणा-या ट्रेनचा experience काही वेगळाच होता. रात्री 8.00 वाजता आपण शिन-ओसाका स्टेशनवर उतरलो . 8.40 pm वाजता आपण इंडीयन रेस्टोरन्ट मधे चमचमीत व पोट भरून भोजन केलं. आणि त्यानंतर आपण वस्ती साठी हॉटेल OAKWOOD ला 9.30 pm ला पोहोचलो. रूमच्या चाव्या घेऊन व राॅबीन सरांचे दुस-या दिवसाच्या प्रोग्राम सबंधी instructions ऐकूण आपण आपआपल्या रूम वरती गेलो.
कालचा आपला बुलेट ट्रेनचा प्रवास फार मनोरंजक व विलोभनीय तर होताच पण ह्या प्रवासातील हमखास आठवणीची गोष्ट म्हणजे फुलानबायच्या खजुर वड्या. अतिशय गोड, चवदार, तुपट व मन न भरणा-या अशाच होत्या. आजही जिभेवरती ती चव तरळते. परत परत मागायला वाटत होते. पण लिमिटेड स्टाॅकचंही आपल्याला भान ठेवायचे होते. मनिष सर तर म्हणाले की मला वसईला ह्या खजूर वड्या साठी खास यावे लागेल. फुलानबाय खरोखर 🙏🏿🙏🏿🙏🏿.
23 Feb. 2020. आज रविवार, आपल्या टुरचा चौथा दिवस. हाॅटेल ओकवुड वर सकाळचा ब्रेकफास्ट आटोपून 9.20am ला आपण बसने काेयोटो मधील फुशीमी-कू येथील फुशीमी ईनारी तैशा (God of rice) हे मख्य देवस्थान बघण्यासाठी निघालो. हे ठिकाण समुद्र सपाटी पासुन 233 mtr उंचावर आहे. गेट वरती दाेन्ही बाजुला कोल्ह्याच्या मुर्ती आहेत. ह्या मंदीराकडे जयाला तोरील गेट चा मार्ग असून हा पाथ हजारो तोरील गेटने बनलेला आहे. हे देवस्थान पाहण्यासाठी आपल्याला 10.00 ते 11.30 am म्हणजे तब्बल दिड तास दिला होता. भरपूर फोटोग्राफी करून आपण Imperial पॅलेस पाहण्यासाठी गेलो. 11.50am to 1250pm आपण पॅलेस पाहीला. त्यानंतर 1.15 pm to 2.30pm आपण अजंठा ह्या इंडीयन रेस्टाॅरन्ट मधे लंच आटोपून गोल्डन टेंपल पाहण्यासाठी गेलो. हे एक झेन बुद्धीस्ट टेंपल असून त्या मंदीराला “गोल्डन पॅवीलीयन टेंपल” अथवा ‘किंकाकूजी टेंपल’ किंवा ‘ Deer Garden Temple’असेही संबोधीले जाते. ह्या मंदीराचे वरचे दोन मजले हे बाहेरून गोल्डन लिफ ने कव्हर केले आहेत. हे मंदीर 1950 साली एका धर्मांध साधुने जाळले होते व 1955 मधे मंदीराची पुनर्बांधनी करण्यात आली. हे मंदीर एका मोठ्या पाॅंड मधे बांधलेले आहे. हे मंदीर एक नॅशनल हेरिटेज म्हणून जतन करण्यात आले आहे. हे मंदीर पाहण्यासाठी देशपरदेशातून हजारो पर्यटक येत असतात. हे टेंपल बाहेरून पाहून, जमेल तसे फोटो काढून 4.00pm वाजता आपण बांबू फाॅरेस्ट पाहण्यासाठी निघालो. 4.30 ते 5.45pm पर्यंत आपण बांबू फाॅरेस्ट मधे सिनरी बघत फिरत होतो. विशिष्ट रचने मुळे आणि मेंटेनन्स मुळे हे फाॅरेस्ट पर्यटकांचे आकर्षण बनले होते. ठिक 6.25 pm वाजता तेथून निघून 7.15pm वाजता आपण डिनरसाठी हाॅटेल अशोका वर आलो. हाॅटेल प्रमाणे जेवनही उत्कृष्ट होते. डिनर आटोपून 8.30pm वाजता आपण पुन्हा हाॅटेल “OAKWOOD “ वरती वस्ती साठी पोहोचलो. नेहमी प्रमाणे चाव्या घेऊन व इंस्ट्रक्शन ऐकूण आपण आपआपल्या रूमवरती गेलो.
24 Feb. 2020, सोमवार, आजचा टुर वरील आपला पाचवा दिवस. ठरल्या प्रमाणे हाॅटेल OAKWOOD वर सकाळी 8.00 am ला नाश्ता करून 9.30 am वाजता आपण ‘ओसाका कॅसल’ पाहण्यासाठी निघालो. हा कॅसल 1583 साली बांधला असून पार्कची जागा मिळून एकूण 15 एकर जागा आहे. ह्या कॅसलला एकूण पाच मजले असून वर जाण्यासाठी लिफ्टची व्यवस्था आहे. चेरी ब्लाॅसम झाडामुळे सिझन मध्ये ह्या कॅसल ची शोधा अतिशय प्रेक्षणीय असते. जपान मधील एक फेमस व ऐतिहासिक असा हा कॅसल आहे. ह्या कॅसलचे वैशिष्टय म्हणजे ह्याला बाहेरून पाच मजले दिसत असले तरी आतून आठ मजले आहेत. तिकीटा साठी मोठी रांग तसेच आत लिफ्टसाठी रांग व आपल्याकडे असलेला वेळ ह्याची सांगड न बसल्यामुळे हा कॅसल आपण आतून पाहू शकलो नाही. ह्या कॅसलचे बाह्य कलात्मक सौंदर्य पाहून व फोटो काढून ठिक 10.45 am वाजता आपण तोडायजी टेंपल पाहिण्यासाठी निघालो. Tadoji temple हे एक ऐतिहासिक महत्व असलेले बुद्धीस्ट टेंपल आहे. बाजुला नारा डिअर पार्क असून पर्यटका जवळून काही खायाला मिळेल ह्या आशेवर ती कळपाने पर्यटकांत फिरत असतात. ह्या मंदीरात पंधरा मिटर उंच असा भगवान बुद्दाचा बसलेल्या पोज मधे ब्राॅझचा स्टॅचू आहे. 11.15 am पर्यंत आपण ह्या टेंपल एरियात व नारा पार्क मधे हरीणा सोबत फोटो घेत फिरत होतो. दुपारी दिडच्या सुमारास आपण जय रेस्टाॅरंट मधे लंच करीता पोहचलो. लंच आटोपून एक तासाने डोटोमबरी शाॅपिंग एरियात आपण 3.00 to 6.15 pm पर्यंत परचेसींग करीत होतो. तेथे काॅस्मेटीकआयटम, शूज, टुरिस्ट बॅगा, कपडे, बिस्किटे, गिफ्ट आयटम वगैरेची खरेदी करून 6.35 pm पर्यंत आपण महाराजा रेस्टाॅरंट मध्ये डिनर साठी पोहोचलो. 7.45 pm पर्यंत डिनर आटोपून परत एकदा वस्ती साठी हाॅटेल ओकवूड वरती 8.15 pm च्या सुमारास पोहोचलो. नेहमी प्रमाणे रूमच्या चाव्या घेऊन जो तो ज्याच्या त्याच्या रूम वरती गेले.
आज 26/2/2020, बुधवार. आजचा सातवा दिवस. सकाळी 9.00 पर्यंत ब्रेकफास्ट उरकून ग्रॅंड प्रिन्स हाॅटेलला बायबाय करून आपण हिरोशिमा sightseeing साठी निघालो. आपण 9.30am वाजता Atomic Bomb Dome ह्या स्पाॅट वरती पोहोचलो. हे स्थान म्हणजे हिरोशिमाचे Symbol असून जागतीक शांततेचे प्रार्थना स्थळ आहे. 6 August 1945 सकाळी 8.15 वाजता मानवी इतिहासातील पहीला ॲटोमीक बॅांब हिरोशिमा शहरावरती अमेरिकेने टाकला होता. ह्या बाँम्बचा ‘ॲटाॅमीक बाँम्ब डोमच्या’ बरोबर 600 मिटर उंचीवर स्फोट झाला होता. ह्या बिल्डींगच्या वरच्या स्टीलच्या डोममुळे आणि जाड भिंती मुळे बिल्डिंग संपूर्ण जमिनदोस्त होण्या पासुन वाचली. त्या वेळेला हि बिल्डिंग ‘ Hiroshima prefectural Industrial Promotion Hall’ म्हणून ओळखली जात होती. बाॅम्ब ब्लास्ट च्या वेळेला त्या बिल्डिंग मधील सर्व माणसे जागीच मरण पावली. केवळ स्टील डोम मुळे ही बिल्डिंग ॲटोमीक बाॅम्ब डोम म्हणून ओळखण्यात येऊ लागली. हिरेशिमाच्या लोकांच्या ईच्छे नुसार महायुध्दाची ट्रॅजीक आठवन म्हणून 1996 पासून हि बिल्डिंग वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून संबोधीली जाऊ लागली. अशा ह्या ऐतिहासिक बिल्डिंगचे सर्व ॲंगलनी फोटो घेऊन आपण मेमोरीअल पिस पार्क मधे गेलो. तिथे असलेली पिस बेल बहुतेकांनी वाजवून वर्ल्ड पिस साठी आपल्या भावना व्यक्त केल्या. हि बेल हिरोशिमात मरणपावलेल्या मुलाचे स्मारक होतं. फोटोग्राफी आटोपून आपण हिरोशिमा पिस मेमोरिअल म्युझीयम पाहण्यााठी आलो. बाॅम्बस्फोटात झालेला मानवी संहार पाहून आपण स्तंभीतच झालो. अंगावरील लक्तरे उडालेली लहानलहान मुले, स्रिया, तरूण , म्हातारे ह्याचे फोटो पाहून ह्रृदय हेलावून गेले. म्युझीयम पाहून 12.30 pm वाजता तेथून निघालो व 1.30 pm वाजता लंचसाठी आरती ह्या रेस्टाॅरंट वर आलो. लंच नंतर आपण आकाशी कैकियो ब्रीजला भेट दिली . साधारण पाचच्या सुमारास आऊटलेट माॅल मधे परचेसींग साठी आलो. जवळच असलेल्या DIASO स्टोअर मधे आपण शिल्लक अथवा बाकी राहीलेली परचेसींग पूर्ण केली. त्यानंतर 7.30 वाजता रेस्टाॅरंट ‘गेलाॅर्ड’ मध्ये डिनर आटोपून 8.00 pm ला हाॅटेल प्लाझा कोबे वर राहायला गेलो. जपान मधील हि आपली शेवटची रात्र होती. सकाळी चारचा आपला वेकअप काॅल असल्यामुळे जो तो लवकरच झोपायला रूमवरती निघून गेले.
आज गुरूवार फेब्रुवारीची 27 तारीख. शेड्यूल प्रमाणे जपान मधील आपल्या सात नाईट्स पूर्ण झाल्या. आजचा शेवटचा म्हणजेच टूरचा आपला आठवा म्हणजेच प्रतीचा दिवस. जपानचा मुळीच तसा कंटाळला आला नव्हता पण आता घराचीही ओढ होतीच. नागासाकी सोडून संपूर्ण जपान आपण कव्हर केला होता. तसे नागासाकी आपल्या टूर मधे समाविष्ट नव्हतेच. गाढ आणि साखर झोपेत असताना पहाटे चार वाजता वेकअप काॅल आला. सर्वजणांनी सकाळचे विधीआटोपून आंघोळी उरकल्या. बस मधून ठिक पाच वाजता हाॅटेल प्लाझा कोबे ला बायबाय करून Itami एयरपोर्टला निघालो. सकाळचा ब्रेकफास्ट आपणांस बसमध्येच देण्यात आला. परतीची वाट सुरू झाली. घरी जायच्या कल्पनेने सर्वजण सुखावले होते. आपण एक तासाने म्हणजे 6.00 वाजता इटामी एयरपोर्टला पोहोचलो. आता आपला पुढचा प्रवास इटामी to नरीटा एयरपोर्ट असा होता. 7.50 am वाजता आपल्या विमानाने नरीटा- टोकीयोला जाण्यासाठी उड्डान केले. 9.05 am वाजता आपण टोकीयोला पोहोचलो. आपल्याबरोबर असलेली अमेरीके वरून आलेली गुजराती फॅमिली अमेरिकेकडे जाणारे फ्लाईट पकडण्या साठी आपल्याला बायबाय - टाटा करून त्यांनी आपला निरोप घेतला. टोकीयो वरून आपण 11.10am च्या फ्लाईटने निघालो व मुंबई एयरपोर्टला संध्याकाळी 5.45pm (India Time) वाजता आपले विमान लॅंडींग झाले. विमानातून बाहेर आल्यानंतर आपण बेल्टवरून इमिग्रेशन काऊंटर कडे निघालो. इमिग्रेशन काऊंटर कडे जाण्याआधी आपली सर्वांची इंडीवीज्युअल करोना सबंधी कपाळावर मशीन लावून screening टेस्ट करण्यात आली. सर्वांचीच रिपोर्ट निगेटिव होता. Praise the Lord. तेथेच आपण विमानात भरलेला हेल्थ संबंधीचा सेल्फ रिपोर्टींग फार्म सबमीट केला.
इमिग्रेशन काऊंटर वरून आपल्या पासपोर्ट वर Arrival चा स्टॅंप घेऊन आपण बॅगा कलेक्ट करण्यासाठी बेल्ट वरती आलो. बॅगा कलेक्ट केल्यानंतर कस्टम चेकींग करून आपण बाहेर उतरलो. अहमदाबाद वरून आलेले मराठी कपल (ढोबळे) अहमदाबादला फ्लाईटने जाणार होते त्यांनीही आपला निरोप घेतला. अजूनही काहीक जणांची खरेदी बाकी होती त्यांनी ड्युटीफ्री मधून Drinks, wines व चाॅकलेट वगैरेची खरेदी केली. मला वाटते लुजान वाघोलीकरची बरीच खरेदी अजूनही बाकी राहिली असेल. साधारण आठच्या सुमारास राॅबीनने मागवलेल्या इनोव्हा गाड्या आल्या. रात्री साडेनऊच्या सुमारास आपण घरी पोहोचलो.
तर एकंदरीत अशी झाली आपली “जपान चेरी ब्लाॅसम टुर.”
जपानला जाताना आपण करोनाचं टेंशन घेऊन गेलो होतो. पण जपानला गेल्यानंतर आठ दिवस आपण करोनाला विसरूनच गेलो. जपान मधे फिरताना आपण बसमधे, हाॅटेलवर, रेस्टाॅरन्टवर, खरेदी शाॅपवर, माॅलवर प्रत्येकाने सॅनीटायजर व मास्क वापरून स्वतंत्र काळजी घेतली. जपान मुळातच इतकं स्वच्छ होतं कि तिथे अतीजास्त काळजी घ्यायची गरज वाटली नाही. टुर वरती राॅबीनसरातर्फे आपण वसईची सोळा माणसे तर मनिषसरातर्फे मुंबई, USA, अहमदाबाद , औरंगाबाद मिळून अठरा जण होते. म्हणजेच एकूण 34 tourists व मनिषसर, राॅबीनसर, आपली गाईड किकी आणि बसड्रायव्हर ही चार माणसे अशी आपण एकूण 38 लोक होते. ह्या सर्व 38 जणांचा कारवाॅं रोज सकाळी 8.30 ते संध्याकाळी 8.30 pm पर्यंत आठ दिवस जपान मधे फिरत होता. अगदी दोनच दिवसात बसमधे आपणा सर्वांची केमिस्ट्री जुळून आली. गुण्यागोविंदाने आपण एकत्र मिळून मिसळून फिरत होतो. मॅनी आणि आग्नेस ह्यांच्या मनमिळावू स्वभावामूळे तर USA, अहमदाबाद , औरंगाबाद व मुंबई आपल्या वसईशी समरस झाली. बसमधे गाईड किकी आपली जपान सबंधी माहिती इंग्रजी मधे देत होती. मनिष सर जपान मधे राहात असल्यामुळे ते सुद्धा आपला अनुभव शेअर करीत होते. USA वाल्यांनी पंचवीस वर्षा पूर्वी झालेल्या आपल्या मुलीच्या किडनॅप सबंधी थरारक माहीती/अनुभव शेअर केला. मॅनी व आग्नेसचे ड्युअल गीत, हिंदी गाणे व जोक्स ने संपूर्ण बस हसत ठेवली. पंडीत दांपत्यानेही सहभाग घेऊन गाणी बोलली. अहमदाबाद फॅमिलीनेही आपले काहीक अनुभव शेअर केले. डोंबिवली कपलनी सुद्धा भाग घेऊन गाणी बोलली. त्यांचा पाच वर्षाचा मुलगा सर्वांचे लक्ष वेधत होता. मॅनी, शिलूसर व गोट्या डायस ह्यानी त्या बाल कलाकाराबरोबर जादूचे खेळ शेअर केले. मर्षान बायने वसईची लग्नगीते व जोक्स सांगून करमणूक केली. परेरा मॅडम (सांतानबाई) ह्यांनी सुद्धा उत्स्फुर्त सहभाग घेऊन काही कवीता व जोक्स शेअर केले. लुजान वाघोलीकरने हिन्दी नगमे ऐकवून करमणूकीत भर घातली. वंदना मॅडम (ट्रॅकर)ह्यांनी देशभक्तीपर गाणे ऐकवली. तर औरंगाबादची सुप्रसिद्ध गाईका अलका मॅडम ह्यांनी आपल्या गोड व सुमधुर आवाजात लता मंगेशकरनी गाईलेली अनेक क्लासिकल हिन्ही गिते ऐकवीली. एकंदरीत सर्वांचाच सहभाग प्रशंसनीय होता. बसमधे आपण अमेरिका वासी डाॅक्टर मुलीचा बर्थडे साजरा केला तसेच अमेरिका वासी दांपत्याची वेडींग ॲनीव्हरसरी सुद्धा साजरा केली. ह्या सर्व हौशी कलाकारामुळेच आपली जपान टुर अपेक्षेहून अधिक सक्सेसफूल ठरली. जपानची स्वच्छता, जपानची नम्रता, जपानची शांतता, दिलदार पणा, गोड पण हळू आवाजात बोलणे, स्मित हास्य वगैरे सारखे अनुकरनीय गुण घेऊन आपण इंडीयात परतलो.
जपान विषयी थोडक्यात :-
मित्र हो आपण जपान देश पाहून आलो पण ह्या देशा विषयी थोड्या प्रमाणात आपल्याला माहीती असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने हा प्रयत्न. जपान हा देश आशिया खंडात येतो. पूर्व आशियातील प्रशांत महासागरात (Pacific Ocean) सहाहजार आठशे बावन्न बेटांनी बनलेला एक देश आहे. जपानी भाषेत जपानला “निहोन” किंवा “निप्पाेन” असं म्हणतात म्हणजेच उगवत्या सुर्याचा देश. तसेच जपान शब्दाचा अर्थ सुद्धा ‘सुर्य उगम’ असा आहे. जपान अति पूर्वे कडे वसलेला असल्या मुळेसुद्धा त्याला उगवत्या सुर्याचा देश म्हणतात. टोकीयो हि जपानची राजधानी असून ते जपान मधील सर्वात मोठे शहर आहे. जपानी लोकांचे आयुष्यमान जगात सर्वाधिक असून वयाची शंभरावी (century) पार केलेल्यांची संख्या लाखात आहे. जपानला चहूकडून समुद्र असल्यामुळे जपान बाजूच्या कोणत्याही देशाच्या भूमीशी संबंधीत नाही. जपानची 73% भूमी डोंगराळ वा खडकाळ आहे. बौद्ध धर्म हा जपानचा मुख्य धर्म असून जपान मधे 96% लोक बौद्ध धर्मीय आहेत. पूर्वी खेळणी, मातीची भांडी, कापड ह्या उद्योगात जपान पुढे होते. पण गेल्या काही दशकात जपानने औद्योगिक क्षेत्रात मोठी झेप घेऊन मोटारी,जहाजे, विजेवरील उपकरने, घड्याळे, कॅमेरा, संगणक व रोबो इत्यादी वस्तूच्या निर्मितीत आज जपान पुढे आहे. रेशीम किड्याचे पालन करून त्यापासून रेशीम व रेशीम कापड तयार करणे हा महत्वाचा व्यवसाय आहे. मोती काढण्याचा व्यवसायही येथे मोठ्या प्रमाणात चालतो. वेगात धावणारी जपानची बुलेट ट्रेन फार प्रसिद्ध आहे. या देशाला सर्व बाजूंनी समुद्र किणारा लाभल्यामुळे मासेमारी हाही महत्वाचा व्यवसाय झाला आहे. जपानी स्रियांच्या पारंपारीक पोषाखाला “ किमोनो” असे म्हणतात. पतंग उडवणे, सुमो कुस्ती, फुटबाॅल व बेसबाॅल हे जपानचे प्रमुख व लोकप्रिय खेळ आहेत. दुस-या महायुध्दात हिरोशिमा व नागासाकी शहरावर
अमेरिकेने बाॅंबस्फोट घडवून आणुन हि शहरे उध्वस्त केली होती. आता हिरेशीमा हे पर्यटन स्थळ झालेलं आहे. तर नागासाकी हे शहर सागरी व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. नारूहितो हे जपानचे सध्याचे Emperor आहेत तर शिंजो आबे हे प्रायमिनीस्टर आहेत.
----समाप्त---/