“मायकल समाधान, पिपरी” (२०/१२/२०२०)
मित्रहो, आज रविवार, २० डिसेंबर २०२०. आज आपले मायकल आप्पा आपल्या वयाची डायमंड ज्युबिली म्हणजेच हिरकमहोत्सव मधे पदार्पण करीत आहेत (20/12/1960 - 20/12/2020). मायकलला आज साठाव्या वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा. मायकल, “आप जिओ हजारो साल, सालके दिन हो पचास हजार”.
मायकलच्या ह्या साठ वर्षाच्य कालावधीचा आपण ईथे थोडक्यात आढावा घेऊ या. मायकलची लहानपणाची एक आठवण नमुद करावीशी वाटते ती म्हणजे तो जास्त नसला तरी थोडा हट्टी होता. त्याला चहाचा प्याला पूर्ण भरून लागायचा. शिमनीबायने किंवा तेवने त्याला चहा दिला व प्याला जर थोडासा रिकामी असला तर मायकल आप्पा मोठ्या आवाजात ओरडायचा “माला पॅलाॅ फुल भराॅन पाय” आणि ओतताना “अजून फुल,अजून फुल” असं ओरडायचा व प्याला संपूर्ण काठोकाठ भरून मागायचा. मायकलची हि आठवण अजूनही पेदरबाबा, जावड्याअण्णा व नातालबाय कधीकधी काढतात. आपलं शालेय जिवन, अभ्यासा बरोबरच आपल्या भावा सारखेच तेव व नानांना बागायत कामात मदत करून संसाराला हातभार लावण्याचं तसेच खेळण्या-बागडण्यात पण मजेत गेलं. 1980 साली SSC झाल्यानंतर 1981 साली बाॅम्बे ITI, बाॅम्बेसेंटर येथे एक वर्षाचा वेल्डरचा कोर्स केला,पण ते शिक्षण चालु असताना मायकलने अतोनात श्रम केले. सकाळी लवकर उठून पहिल्या गाडीने फुले घेऊन दादरला फुल मार्केटला जाणे व फुले विकून झाल्यानंतर ITI ला जाणे व रात्री ११ वाजता घरी पोहचणे व नंतर परत अभ्यास हा पाचवीला पुजलेला होताच. असं कष्टमय जीवन जात असताना वर्ष निघून गेले. कोर्स पूर्ण झाला. पण त्यावेळेस जाॅबची मारामारी असल्यामुळे मायकलने J V Patel लोअर परळ येथे आपली फॅकल्टी बदलून फिटरचा एक वर्षाचा कोर्स चालू केला.
कोर्स पूर्ण झाल्यानंतर मायकलने हिन्दुस्थान लिवर ह्या नामांकीत कंपणीत दोन वर्षांची ॲपरेन्टीसशीप केली. ॲपरेनटीस संपल्यानंतर कंपणीत कायम न केल्यामुळे मायकल जाॅबलेस झाला. पण थोड्याच दिवसात मायकलला निरलाॅन कंपणीत एक वर्षा करीता टेंपररी जाॅब मिळाला. एक वर्षानंतर स्पेशलस्टील कंपणीत त्याला सहामहीण्या करीता पुन्हा टेंपररी जाॅब मिळाला. नंतर पुढे जाॅबचे प्रश्नच निर्माण झाले. मायकल जाॅबलेस झाला. त्यानंतर पर्याय म्हणून मायकलने सायकल रिपेरींगचं दुकान चालू केले. दोन वर्षानंतर म्हणजे 1990 मधे मायकलने सायकल रिपेरींग सोडून ॲाटो रिपेरींग धंद्यात उडी घेतली. पहीली दोन वर्षे अटीतटीतच गेले. व त्यानंतर मायकलने बजाज ॲाटोची एजन्सी घेतली व इथूनच मायकलचा टर्नींग पाॅईंट सुरू झाला. मायकलचा धंद्यात ब-यापैकी जम बसला व मायकलला मागे वळून पाहण्याची गरजच भासली नाही. बजाज ची एजन्सी मिळवण्यात मायकलला बिशा-पांड्या ह्या आपल्या भावांची अतोनात मदत झाल्याची मायकल प्रांजळपणे कबुली देतो व त्यांचे अविस्मरणीय उपकारार्ची जान त्याला आहे व कायम राहील. ह्या यशात आपले आलेक्स कुण्यात व शिमनीबायच्या माॅरल आणि आर्थिक मदतीची जानही मायकल ठेवून आहे. पुढे त्याच्या जीवनात लाईफ पार्टनर म्हणून सुशिक्षीत व समजूतदार अशी मिनाक्षी आली. ब मायकलची भरभराट होत राहीली. पुढे आपल्या संसार वेलींवर मिशल व क्लिंट हि दोन सुंदर फुले उमलली. मुलीला ग्रॅज्यूअेट करून दोन वर्षापूर्वीच कातरवाडीतील दिन्याबस्त्याव ह्या नावदार घराण्यातील पॅटसन ह्या इंजिनीअर मुलाशी मोठ्या थाटात व धुमधडाक्यात लग्न लावून दिले. मुलगा क्लिंट हा अतिशय हुशार असून साॅफ्टवेअर मध्ये इंजिनीअरींगच्या फायनल इयर चा अभ्यास करीत आहे.
मायकल आम्हाला तुझा रास्त अभिमान आहे. We are proud of you. मायकल तुझ्या ह्या डायमंड ज्युबिली ॲनिवर्सरीला शुभेच्छा देताना मला नमुद करायला आवडेल ते म्हणजे “आयुष्यात कितीही मोठा हो, पण माणुसकी आणि नम्रपणा सोडू नको”. तुझ्यातला हा गुण असाच जपून ठेव.
“सुबह उठते ही चेहरेपर मुस्कान रहे
हर एक दुख से आप कोसो दुर रहे
महक उठे आपकी जिंदगी ऐसा
शुभदिन आपका आज रहे।”
व अजूनही एक
“उगता हुआ सूरज दुआ दे आपको,
खिलता हुआ फूल खुशबू दे आपको
हम तो कुछ भी देने के काबील नही,
देनेवाला हजार खुशिया दे आपको।”
🌹🎂🌺🎂🌸🎂💐
----समाप्त---/