आपली काश्मीर सहल (०४/११/२०२१)
आज ०४/११/२०२१, आजचा विव्ह पॅाईंट ‘गुलमार्ग’. सकाळचा ब्रेकफास्ट आटोपून 08.50am गुलमार्ग कडे प्रयाण. गुलमार्ग म्हणजे काशमीरचे हार्ट . काशमीरला जाऊन गुलमार्ग न पाहणे असे कधी होत नाही. गुलमार्गची गंडोला राईड म्हणजेच केबल-कार किंवा वायर रोप हे एक मोठे आकर्षण आहे. स्टॅंड पासुन गंडोलाच्या पायथ्यापर्यंतचे अंतर केवळ दिड कि.मी. आहे. काही लोक चालत जातात, काही लोक मजेपोटी जीपने तर काही लोक तट्टू् म्हणजेच लहान घोड्यावरून जातात. ह्यालाच पोनी राईडींग म्हणतात. ह्या गंडोलाच्या पायथ्या पर्यंतची उंची साडे सात हजार फुट आहे, गंडोलाच्या 1st phase ची उंची साडे अकरा हजार फुट आहे, तर 2nd phase ची उंची साडे चौदा हजार फुट आहे. नोव्हेंबर मधे थंडीचे प्रमाण वाढत वाढत जात असल्यामुळे व स्नो पडत असल्यामुळे तसेच उंच असल्यामुळे हवा विरळ होऊन हवेत ॲाक्सीजनचे प्रमाण कमी कमी होते. जिव घेण्या थंडीपासुन बचाव करण्यासाठी भाड्याने जॅकेट व गमशूज घ्यावेच लागतात. काहीकांना गंडोला पायथ्याशीच धाप लागते. 1st phase ला तर भल्याभल्यांना धाप लागते. 2nd phase ला सामान्य माणूस जाऊ शकत नाही. ज्यांना जायचे आहे त्यांना स्तत:च्या रिस्कवर पाठवले जाते. हि रिस्क केवळ बॅाडी बिल्डरच घेतात. मी ॲाक्सीजन कमी पडत असल्यामुळे गंडोला पायथ्याशीच थांबलो. बाकी सर्वजण 1st phase पर्यंतच गेले. 2nd phase वर जाण्याचं कोणीही धाडस केलं नाही.
तर असे हे चालेंजींग गुलमार्ग गंडोला राईड आपल्यासाठी एक नवीन अनोखा अनुभव होता. कुडकुडत्या थंडीत गंडोला राईड करून साधारण चार बाजता आपण “येम्बरझल “ ह्या हॅाटेल & रेस्टॅारंट वरती लंच साठी आलो. गरमागरम सुप पिऊन शरीर थोडं वॅार्म करून घेतलं. नंतर झनझनीत गरमागरम नॅानव्हेज जेवन तयार होते. भरपूर थंडी होती. भुकही जोरदार लागली होती जेवन छान बनवलं होतं. सर्वांनी यथेच्छ ताव मारला. जेवन आटोपल्यानंतर आपण सर्वजण हॅाटेल मिलादवर आलो. आंघोळी वगैरे आटोपून साडेनऊ वाजता आपण डिनर घेऊन सर्वजण रूमवर झोपण्यास गेलो. आज हॅाटेल मिलाद वरी ही आपली शेवटची रात्र होती. उद्या सकाळी चेकआऊट करून आपल्याला पेहलगाम कडे निघायचं होतं.
—-------------------------------------------
आज ०५/११/२०२१, शुक्रवार. काश्मीर मधील आजचा चौथा दिवस. ठरल्याप्रमाणे हॅाटेल मिलाद वरती आपण तीसरी रात्र वस्तीकरून सकाळच्या नाश्त्यानंतर साडेनऊ वाजता आपले पेहलगाम कडे प्रयाण.
पेहलगामला जाताना वाटेत “Zamindar Kesar Village” ह्या दुकानातून आपण केसर, अक्रोड, बदाम, पिस्ता, कावाचहा पावडर, जलदारू, ॲप्रीकॅाट वगैरेची खरेदी केली. व पुढे रस्त्यात बॅट कारखाण्यात जाऊन त्यांच्याच शोरूम मधे मुलांसाटी बॅट खरेदी केल्या. ह्या बॅट खरेदीत आपले अनुभवी सहप्रवासी अजीत रॅाड्रीग्ज ह्यांची फार मदत झाली. तसेच बाजुच्या दुकानातून महीलांनी स्ट्रोल, दुपट्टे, ड्रेस खरेदी केले. व नंतर परत एका फॅक्टरी शॅाप जवळ बस थांबवून काही जणांनी टोप्या, स्वेटर, दुपट्टे, स्कार्फ , आणि जॅकेट खरेदी केले. व त्या नंतर आपण एका रेस्टॅारंट कम हॅाटेल वर लंच साठी पोहोचलो. तेथे आपला दुसरा ग्रुप आपल्या अगोदर येऊन लंच घेत होता. त्यांचे लंच आटोपल्यावर ते पुढच्या प्रवासाला निघाले व आपण लंच साठी बसलो. लंच नंतर आपण हॅाटेलच्या बाजूलाच असलेल्या ॲपल बागेत फेरफटका मारून आपणही पेहलगाम येथील “Royalton Hotel” कडे निघालो. थंडी जबरदस्त होती. हॅाटेलवर पाणीही गरम नव्हते. रूम हिटरही नव्हते. सात वाजता बाथरूम मधे पाणी थोड्याप्रमाणात गरम आले. काहीकांनी तशातच आंघोळी आटोपल्या तर काहीकांनी आंघोळीच्या गोळ्या घेतल्या. थंडीपासुन बचावासाठी कॅम्पफायर करण्यात आले. सर्वजण गोलाकार शेपमध्ये खुर्च्यावर बसून शेक घेऊ लागले. सुप देण्यात आला. चिकन चिली, फ्रायपीस सुद्धा फिरवण्यात येत होते. रॅाबीनने केलेल्या सोई नुसार बाजूलाच काऊंटर वरती व्हीस्की-बियरची व्यवस्था सुद्धा होती. काहीक जनांनी स्वत:जवळील रम, ब्रॅंडी, तर गोट्या डायसने खास होममेड ग्रेपवाईनही काढली होती. वाईन फार छान होती. शेकोटीभोवती मिनल मेंडीस, लुजान रॅाड्रीगज, फ्रेडी कोलासो व ईतर हौशी कलाकारांनी हिंदी गाणे व कोळी लग्नगीते म्हणून तर काहीकांनी उत्स्फुर्त डान्स करून कॅम्पफायरची शोभा वाढवली. कॅंम्फायरचा आनंद उपभोगत असतानाच काहीजणांनी तिथेच विक्रीसाठी आलेल्या अक्रोड विक्रेत्याकडून अक्रोड विकत घेतले. नंतर सर्वजण डिनर साठी डायनिंग हॅालमधे जमलो. व्हेज-नॅानव्हेज डिनरनंतर जो-तो आपआपल्या रूम वर झोपण्यासाठी रवाना झाले. कारण सकाळी उठून ब्रेकफास्ट नंतर आपल्याला “Sight seeing “ साठी निघायचं होतं.
Good Night
—-------------------------------------------
आजचा दिवस शुक्रवार, ता. ०६/११/२०२१. काश्मीर मधील आपला सहावा दिवस. सकाळच्या नाश्तयानंतर ठिक ९.३० वाजता आपण आरू वॅली पाहण्यास निघालो. आरू वॅली हे जम्मुकाश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील एक फेमस टुरिस्ट प्लेस असून पेहलगाम पासून १२ किमी दुर आहे. ह्याची सुंदरता लिडर नदीच्या प्रवाहा मुळे शोभून दिसते. निसर्गरम्य हिरवी कुरणे, लेक आणि उंतउंच बर्फाछादीत पर्वत सर्व काही मन लुभवणारे होते. शुटींग साठी फेमस अशा ह्या ठिकाणात फोटोग्राफी कोण करणार नाही. पर्यटक घोड्यावर बसून फेरफटका मारायची संधी सोडत नव्हते. आपण हि मजा १०.५० ते १२.०० पर्यंत लुटत होतो. त्यानंतर १२.३० च्या सुमारास बेताब वॅलीला पोहोचलो. १९८३ साली सनी देओल व अमृतासिंग ह्याच्या सुपरहिट फिल्म “बेताब” ची शुटींग ईथे झाली होती. त्यावरून ह्या व्हलीला “बेताब व्हॅली” म्हणून संबोधीले जाऊ लागले. चौफेर उंच देवदार वृक्ष आणि पाईन फॅारेस्ट मुळे ह्या व्हॅलीची शोभा अप्रतीम अशीच आहे. नयनरम्य बर्फाच्छादीत कुरणे उंचउंच झाडे, बर्फाच्छादीत हिमालयीन पर्वतांच्या रांगा, अशा मनप्रसन्न वातावरणातून सहजासहजी निघायची ईच्छाच होत नव्हती. भुक तर लागलेली होतीच. दुपारी ३.०० वाजता आपण हॅाटेल रॅायल्टन वरती पोहोचलो. गरमागरम सुप व व्हेज-नॅानव्हेज लंच उरकून सर्व जण विश्रांती साठी आपआपल्या रूमवर गेले. संध्याकाळी ६.३० वाजता कॅम्पफायर प्रोग्राम वीथ वाईन, हॅाट, बिअर व साथसाथ चकना व त्यानंतर ९.०० वाजता डिनर उरकून सर्व जण लवकरच रुमवर झोपायला गेले कारण दुसऱ्यादिवशी ब्रेकफास्ट नंतर पुन्हा श्रीनगर कडे निघायचं होतं.