“हॅलोविन” 19/10/2023

 काहीक अपवाद वगळता बहूतेक सर्वच देशामध्ये देव-धर्म पाळले जातात. तर थोड्याबहूत प्रमाणात कर्मकांडेही जोपासली जातात. ह्या कर्मकांडांत मोडणारा एक उत्सव म्हणजे “हॅलोविन”. सुमारे 6000 वर्षा पुर्वी हॅलोविनची प्रथा इंग्लंड आणि आयलॅंड मधून उदयास आली. युरोपियन देशांत साल्टीक जातीचे लोक हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्यांची अशी धारणा आहे कि हॅलोविनच्या दरम्यान मेलेल्या व्यक्तिंची आत्मे त्यांच्या कुटुबियांना भेटायला येतात. पुढे जसजसे हे आयरिश लोक जगाच्या विविध भागात पसरत गेले तसतसे हॅलोविन सेलेब्रेशन आपले रंग आणि रुप बदलत गेले. हा दिवस म्हणजे सर्व मृत संतांच्या आठवणीचा दिवस. पाच्शिमात्य देशात 31 October हा दिवस ‘हॅलोविन डे’ एक फिस्ट म्हणून पाळला जातो. हा उत्सव 31 Oct ते 2 Nov. पर्यंत असा तीन दिवस सिलेब्रेट केला जातो. ज्यु आणि मुसलमान लोक हि प्रथा पाळत नाहीत. काहीक लोकांची अशी समजूत आहे की त्या दिवशी मृत माणसांचे आत्मे पृथ्वीवर परत येतात. ह्या दिवसाला ते ‘सॅमहॅन’ दिवस म्हणूनही संबोधितात. भारतीय संस्कृती आणि परंपरेमधे पितृपक्ष पाळून पितरांचे स्मरण केले जाते. त्याच धर्तीवर ख्रिच्शन धर्मिय हॅलोविन पाळतात. भारतात क्वचितच काही लोक हॅलोविन दिवस पाळतात. पण अंधानुकरण समजा वा फॅशन म्हणून, अलीकडे भारतातही हा उत्सव साजरा करण्याकडे लोक वळत आहेत. सोशल मिडीया, हॅालीवूड सिनेमा, वेबसिरीज ह्यांच्या माध्यमातून भारतीयांच्या मनातही उत्सुकता वाढलेली आहे. सामान्य नागरीका पासुन ते बॅालीवूड सेलेब्रिटी सुद्धा ह्यात सहभागी होताना दिसत आहेत. व आता तर हे फॅड जगभर पसरत आहे. पाच्शिमात्य देशात अत्यंत विचित्र अशा भुता-खेताच्या वेशांत अनेकजण तयार होऊन हॅलोविन पार्टीमधे सहभागी होतात. बरेच लोक आपल्या घरांपुढे भुताखेतांचे स्केलेटन, अस्थिपंजर निरनिराळ्या रूपात व आकारात मांडणी करून काळ्या वेशभूशेने डेकॅारेट करून त्यावर लाईटचे फोकस मारून भितीदायक पण Attractive पद्दतीने spectacular असा देखावा निर्माण करतात. ॲारेंज कलरचे मोठे भोपळे (pumpkin) निरनिराळ्या व भयावह आकृतीत कापून त्यात दिवे सोडतात व दरवाजा समोर वा अंगणात ठेवतात. त्याला ते ‘जॅक -ओ-लॅंटर्न’ (Jack-O’-Lantern) असे म्हणतात. पाश्चिमात्य देशात ख्रिसमस नंतर हॅलोविन हा सर्वात मोठा कमर्शियल हॅालीडे असतो. अमेरीकेत मात्र ह्या दिवशी शाळेला व ॲाफीसला सुट्टी नसते. हॅलोविनच्या महिनाभर अगोदर पासुनच दुकाने वा ग्रॅासरी स्टोअर्स मधे हॅलोविन टॅाईस, पंपकीन, स्केलेटन , महाकाय मॅान्स्टर, मोठाले हवेने भरलेले भुताटकी फुगे, स्पायडर टॅाईस, भुताखेताचे कपडे इत्यादी हॅलोविन सामग्रिंनी गच्च भरून विक्रीस ठेवतात. संध्याकाळच्या वेळेस शाळकरी मुले आपला पाच-सात मुलांचा ग्रुप बनवून कॅालनीतील अलग अलग घरी अलग अलग भुत-पिशाच्चाच्या पोशाखात भेटी देतात. घर मालक त्यांचे स्वागत करून त्याना चॅाकलेट देतात. असे छोटेछोटे ग्रुप येतच असतात. कधीकधी काही लहान मुलं आपल्या आईवडीला सोबत येतात पण आईवडील बाहेर रस्त्यावरच उभे असतात (त्यात एक प्रोत्साहनाचा भाग असतो). प्रत्येक घरात अशी मुलं येतात ह्याची घरमालकाना कल्पना असतेच, म्हणून तेही आपल्या घरी चॅाकलेटचे पौच किंवा डबे अगोदरच आणून ठेवत असतात. “डे- कॅअर” मधे जाणाऱ्या लहान मुलासाठी आठवड्याचा ड्रेसकोड आखून दिलेला असतो, त्याप्रमाणे मुलं काळ्या रंगाचे भुत-पिशाच्चाचे कपडे घालून डे-कॅअर मध्ये जातात.

पाच्शात्य देशात व्हेलेंटाईन डे, वुमन्स डे, मदर्स डे, फादर्स डे, लेबर डे, पंपकिन पॅच, हॅलोविन, ख्रिसमस, 31st December असे अनेक फॅस्टीवल साजरे केले जातात. ह्या व्यतिरिक्त अमेरीकेत मेमोरीयल डे, 4th of July (Independence Day), Thanks giving, असे उत्सवही साजरे केले जातात.

तर मित्र हो, हॅलोविन हा असा एक आगळा वेगळा उत्साहाचा उत्साह आपणांस अनुभवायला मिळतो.


🙏🏿


इतिश्री


/////पॅट्रीक डिमेलो////

फलश्रुती

दोनतलाव-पिपरी


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013