लुईस अण्णा, सोदाड (०१/११/२०१)
कळसु दमेल कुटुंबात २०१३ ते २०१४ ह्या दोन बर्षात आपले जोजेप आप्पा (वाडेकर), लुईस अण्णा व मी असे आम्ही तीघे भावंड सहा-सहा महीण्याच्या फरकाने नोकरीवरून एका पाठोपाठ एक असे रिटायर झालो. त्या नंतर टाईम पास व एक Exercise म्हणून रोज संध्याकाळी ५.३० नंतर आम्ही गावातील ईतर रिटायर मित्रा बरोबर ई्व्हनिंग वाॅक साठी समुद्रावर फिरायला जाऊ लागलो. दोन -तीन वर्षांनी लुईस अण्णाचे वास्तव्य दहिसर- बोरीवलीला शिफ्ट झाले. व त्या नंतर लुईस अण्णा फक्त शनिवार- रविवार आपल्या घरी यायचे. म्हणजे लुईसअण्णा आमच्या बरोबर वाॅकींग साठी आता फक्त शनिवार- रविवारीच असायचे. तेव्हा प्रत्येक शनिवार-रविवार आम्ही बघायचो कि वटार गावातून जाताना सत्तरी ओलांडलेला एक सामवेदी गृहस्थ त्याच्या वेशीवर लुईस अण्णाची वाट पाहत ऊभा असायचा. जवळ पोहोचल्यावर लुईस अण्णाला आलास कधी, वगैरे विचारून खबरबात घ्यायचा. तेव्हा लुईस अण्णा खिशातून वीस रूपयाची नोट काढून त्याला ध्यायचा. असा सततचा दिनक्रम पाहून आम्ही लुईस अण्णाला एकदा विचारले कि हे काय? व कशासाठी? तेव्हा लुईस अण्णा विनोदाने म्हणाले कि ह्या रस्त्यावरून जाताना मला ह्या गृहस्थाकडे रोड-टॅक्स जमा करावा लागतो. पुढे गेल्यानंतर लुईस अण्णाने सांगितले कि ह्या माणसाशी आमचा काैटुबिक संबंध आहे. घरी आला कि म्हणायचा कि संध्याकाळी पाच-सहा वाजता थोडी नवटाक मारायची इच्छा होते. कोणी काय दिले तर वेळ निघुन जाते व रात्री झोप बरी लागते. म्हणून आपुलकी पोटी मी त्याला २०-२५ रुपये देतो.
दुसरा अनुभव म्हणजे आम्ही वरली वरून जात असताना कधी कधी तीथे खोपटाच्या बाहेर खेळणारी पांच-सहा आदीवासी लहान मुले अण्णाच्या नावाने ओरडत येत व भुक लागली आहे वडापाव खायला पैसे दे. तेव्हा लुईस अण्णा मुलं मोजीत व त्या मुलांना पन्नास रुपये देत. मुलं लगेच वरलीच्या नाक्यावर वडापाव बनवणा-या बाईकडे धावत जात. आणि त्याच वेळेला लुईस अण्णाच्या चेह-यावरती जो आनंदाची एक भाव ऊमटायचा तो खरोखर बघण्या सारखा असायचा. धन्य ते लुईस अण्णा.
लुईस अण्णाबद्ल तीसरा एक अनुभव असा की एकदा वाॅकींगला जाताना राजणी खाली एक माणूस बसलेला होता. प्रथमता ह्या माणसाची तुम्हाला ओळख देतो. तर हा माणूस तुम्ही पाहीलेला असेल- अंगात अगदी जुने शर्ट व लाॅंग पॅंट मध्ये आपल्या मेन रस्त्यावरून ईकडे तिकडे फिरत असतो. ऊंच देहयष्टी, अंगाने सडपातळ, थोडासा डोक्यावर परिणाम झालेला आहे. हातात लांब काठी असते, व दुस-या हातात एक प्लास्टीकची जूनी पिशवी. नेहमी दोनतलाव स्टाॅपच्या ऊघडीवर किंवा राजणीखाली बसलेला असतो . हा एक चांगला रंगारी होता. आपल्या अेरीयात घराचे पेंटीग वगैरे करायचा. माझ्या घराचेही एक-दोन वेळा त्यांनी पेंटीग केलेले आहे. त्याचे नाव जगदीश. तो आपल्या कडील भोंगाळे रानपट्टीवर राहतो. आणि तो आपल्या नेल्सन दादाचा वर्गमित्र (हे मला एकदा नेल्सन दादानेच सांगितले होते). नेल्सन दादा त्याला कधी कधी पाचपन्नास रुपये ध्यायचा. तर हा माणूस राजनीखली बसलेला असताना मी लुईस अण्णाला सांगितलं की हा गृहस्थ भोंगाळ्यातील. हा घराचे पेंटीग वगैरे करायचा. आता त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. आता तो ईकडे तिकडे भटकत फिरत असतो. हा आपल्या नेल्सनचा वर्गात होता. ऐकून लुईस अण्णाला गहिवरून आले. व म्हणाला आज कुठे नेल्सन व कुठे हा त्यांचा वर्गमित्र. लुईस अण्णा लगेच मागे फिरले व त्या नेल्सनच्या वर्गमीत्राला जवळ बोलावले आणि आपल्या खिशातून शंभर-शंभरच्या दोन नोटा काढुन त्याच्या हातात दिल्या. मी अगदी स्तंभीतच झालो. लुईस अण्णा तुम्हाला कळसु दमेल कुटुंबियांचा त्रिवार सलाम 🙏🏿🙏🏿🙏🏿.
लुईस अण्णाबद्दल अजून एक अनुभव असा की एक दिवस वाॅकींग करताना आम्ही नवापूर चार रस्त्यावरून ऊंबरगोठन दिशेने परतत होतो. अर्ध्या रस्त्यात एक आदीवासी माणूस भेटला. पात्रीसदादा कसा आहे? बरा आहे ना? बोलून चालू लागला. तो निघाल्या नंतर मी लुईस अण्णाला विचारले की ह्या माणसाला तू अोळखलेस काय? तर म्हणला नाही. तेव्हा मी सांगितले की लुईस हा तुमच्या कडे कामाला लाडक्या होता ना त्याचा लहान भाऊ यशवंत. अरे यशवंत ईकडे ये म्हणून लुईस अण्णाने त्याला बोलावले आणि कुठे राहतोस, मुलंबाळं किती? लाडक्या काय करतो वगैरे चौकशी केली आणि खिशातून २००/-₹ काढुन त्याला दिले . तो घेत नव्हता पण लुईस अण्णाने त्याला दिलेच. पात्रीस, अरे हे सहा माणसाचं कुटुंबच म्हणजे जान्या व साकरी बाय हे नवरा-बायको व त्यांची चार मुलं म्हणजेच लाडक्या, गंगा, दामा व सगळ्यात छोटा हा यशवंत. (मला हे सर्व ज्ञात होतं). ह्या कुटुंबाने आमच्या कडे फार काम केले आहे. हा यशवंत लहान असुनही काम करायचा. आज तो मजुराचा मजुरच राहीला आहे. आणि आपले कुटुंब आज कुठे पोहचलं आहे. त्या वेळेला जरी त्यांची मजुरी आपण चुकती केली असली तरी त्यांचे तसे आपल्यावर कुठेतरी ऊपकारच आहेत. त्याचे भान असणे गरजेचं आहे. खरोखर त्या लुईस अण्णाला मनापासुन प्रणाम.
कुटुंबियानो, लुईस अण्णाला हे बाळकडू आपल्या कळसु- दमेल परिवारात पाजले गेलं आहे. आणि म्हणूनच एखाद्द्या माणसाला म्हणजे गरजवंताला १०-२० ₹ कधी कधी देणे, भुकेल्या आदीवासी गरीब मुलांना वडापाव खाण्यासाठी ५० रुपये देणे, नेल्सनच्या वर्गमित्राला २००/- ₹ देणे वा यशवंत सारख्या जुण्या मजुराला २००/- ₹ देणे हे भान लुईस अण्णा कडे पाहावयास मिळते. लुईस अण्णाचा हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून वागल्यास कळसु-दमेल परिवाराचे नाव अजूनही उज्वल होईल.
म्हणतात ना “देणा-याने देत रहावे, घेणा-याने घेत रहावे, पण घेता घेता घेणा-याने एक दिवस देणा-याचे हात घ्यावे” . म्हणजेच घेणा-याने देणा-याच्या हाताची देण्याची वृत्ती घ्यावी. आपल्याला हे जमेल काय? लुईस अण्णा कडून आपण काय धडा घेऊ शकताे काय?
🙏🏿🙏🏿🙏🏿
----समाप्त---/