“सिप्रियन पिपरी” (२२/०३/२०२१)
आज सोमवार, 22 March, 2021. आजचा दिवस कळसू दमेल परीवारासाठी आनंदाचा व अभिमानाचा आहे. आज कळसू दमेल परिवाराच्या शिरोपेचात अजून एक शिरोमणी रोवला जात आहे. आज आपले बच्चु आप्पा ह्यांचा मुलगा सिप्रियन पिपरीकर हा आपल्या उच्च शिक्षणासाठी म्हणजेच MS करण्यासाठी व आपले फ्युचर घडविण्यासाठी आणि करीअर करण्यासाठी कॅनडाला जात आहे. बच्चु-जसिंता तुमचे अभिनंदन. पॅालस्मृती व बेथेल कुटुबियासाठी फार आनंदाची व अभिमानाची बाब आहे. तुमचेही कळसू दमेल परिवारातर्फे अभिनंदन. सिप्रियन तु घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. तुझ्या ह्या निर्णयाने कळसुदमेल परिवाराची मान नक्कीच उंचावेल. सिप्रियन तुझे खास अभिनंदन व तुझ्या पुढील हायर एड्यूकेशन साठी आम्ही सर्वजण तुला सुयश चिंतीतो. BEST OF LUCK. संपूर्ण कळसू दमेल परिवार तुझ्या पाठीशी आहे.
सिप्रियन हा एक हुशार, मनमिळावू , थोडासा लाजरा, कमी बोलणारा, गावच्या व देवळाच्या कामात हिरीहिरीने भाग घेणारा, कुटुंबियांच्या लग्न कार्यात जमेल ते काम करून पुढच्या हुकुमाची वाट पाहणारा, सर्वांना हवाहवासा
वाटणारा असा हा गुणसंपन्न तरूण नक्कीच आपले स्वप्न आपल्या मेहनतीने साकारील ह्यात तिळमात्र शंका नाही.
आपल्या कळसूदमेल परिवारातून रॅाजर, जोयेल, सॅवियो, ॲशर, जेसन हे पाच पांडव अमेरीकेत आपआपल्या कुटुंबिया समवेत सेटल आहेत. तर सियॅान वाडेकर हा तरूण जर्मनी मध्ये आपलं उच्च शिक्षण पूर्ण करीत आहे. तसेच प्रभावी, तेजस्वी, वैभवी, स्नेहल, कॅरल व सिल्वी ह्या सहा कन्या आपले शिक्षण पूर्ण करून लग्नानंतर अमेरीकेत आपला संसार थाटून आहेत. आपले रॅाबीन दादा ॲास्ट्रेलियात बरीच वर्षे काढून आपल्या कुटूंबा सोबत मायदेशी परतले आहेत. त्याची परत ॲास्ट्र्लीयात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आपला छोटा जॅायसन पिपरी , हा अमेरीकेत हॅाटेल मधे आपलं जम बसवून आहे. आपली डॅाक्टर सोनी व जावई सॅम्यूअल अलिकडेच सिंगापुरला स्थिर झालेले आहेत. आपले नेल्सन दादा ओमान मध्ये बरीच वर्षे जॅाब करून आता आपल्या कन्न्यांच्या शिक्षणावरती लक्ष केंद्रीत करण्यासाठी व कुटुंबाला वेळ देण्यासाठी घरी परतले आहेत. आपले मार्शल वाडेकर हे कुटुंबिया सोबत दुबईत आपला व्यवसाय सांभाळत आहेत. आपले बेजम अंकल, एलशा अंकल, व बच्चु अंकल ह्यांनी सुध्दा आखाती देशात आपआपला जॅाब केलेला आहे. ब्लांची ताई हि सुध्दा जॅाय बरोबर दुबईत नोकरी करून आलेल्या आहेत. कदाचित करोना नंतर ते कुटुंब सुद्धा परत दुबईला जाण्याची शक्यता नाकारतां येत नाही.साहाजिकच टोनी, धिरज, निल, ख्रिस, लिनस व जयेश हे कळसू परीवारांचे जावई देखील अमेरीकेत आपला जॅाब प्रामाणिकपणे करीत आहेत. एकंदरीत कळसू दमेल परिवाराची कमान आकाराने उंचावतच आहे. तसेच आपल्या कळसू दमेल परीवाराच्या परदेशी स्थाईक सुना रेजीना, नॅन्सी, सिल्वि, एलीना व सिंथी या पांच जणी परीवाराची मान उंचावत आहेत.
तर अशा ह्या जगभर पसरलेल्या कळसू दमेल परीवारातून आपले नशीब आजमावण्या साठी सिप्रियन तू प्रथमच व एकमेव कळसू दमेल परीवाराचा घटक म्हणून कॅनडा भुमीवर उद्द्या उतरत आहेस. “Wish you a happy journey “. ‘May almighty god bless you abundantly.’
सिप्रियन, तुला ईथे आमचे आजोबा म्हणजेच तुझे पणजोबा स्व झुज्या दमेल ह्यांचा एक महत्त्वपूर्ण सल्ला शेअर करायला आवडेल. ते म्हणत असत “गाडीघोड्यातून कुठेही जाताना चांगल्या माणसात बसा” म्हणजेच ‘सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो’. हा उद्देश. आपल्या मोठ्याबाबाचा हा उपदेश जप. नक्कीच फायदा होईल.
सिप्रियन पिपरीकर, तुला सर्व पिपरी वासीयाकडून भरभरून आशिर्वाद 🙏🏿🙏🏿🙏🏿 व शुभेच्छा.
----समाप्त---/