प्रतिबिंब - 06/05/2023

 (लिनेट आणि दादा तुम्हाला आजच्या गृह प्रवेशा निमीत्त आप्पांचे दोन शब्द)

   ////////(₹)////////


आपल्या प्रतिबिंब ह्या नवीन घरातील गृहप्रवेशा बद्दल आपले अभिनंदन. एक ऐतिहासिक आठवण म्हणजे आजच्याच दिवशी सन १८८९ मधे पॅरीस मधील वर्ल्ड फेमस मॅान्यूमेंट “आयफेल टॅावर “ चे उद्घाटन झाले होते. एक अनपेक्षित जुळून आलेला योगायोग. माझ्या जन्मदिनाचे औचित्य साधून तुम्ही मला उपकृत केले त्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार. 

   आपल्या महाराष्ट्रात 

 विमल लिमये हि एक कवयित्री होऊन गेली. अलीकडेच म्हणजे 2018 मधे त्यांचं पुण्यात वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या, आदर्शाचा अर्क व संस्काराचा दर्प ओतप्रोत भरून असलेल्या कवितेचे वाचन बहुतेक सर्व नवीन घरात गृह प्रवेश प्रसंगी केलं जाते. त्यातील पहीली ओळ म्हणजे “घर असावे घरा सारखे नकोच नुसत्या भिंती, त्यात असावा असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती” ! अर्थ असा कि त्या घरात येणाऱ्या प्रत्येक अतिथीच्या पायाची धुळ पवित्र मानली जावी, त्यांचे यथायोग्य स्वागत व्हावे, मानसन्मान व्हावा. ह्यात तुम्ही कुठे कमी पडाल असे वाटत नाही कारण फलश्रुती ह्या जुन्या घरातून निघताना जिजी-बाबांचे संस्कार तुम्ही बरोबर घेऊनच निघालेले आहात ह्यात शंका नाही. कवितेची मधली ओळ अशी आहे की “त्या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊनी उंच भरारी”. आहेत आहेत आपले दोन पिल्लू ह्या घरात वास्तव्यास आलेली आहेत. ते नक्कीच ह्या प्रतिबिंब घरट्यातून उंच-उंच भरारी घेतील व आपल्या वाट्यास येणारे अवकाश ते व्यापतील अशी आम्हाला खात्री आहे. 

    इथे अजून एक उदाहरणासह दाखला तुम्हा दोघांना द्यावासा वाटतो तो असा👉🏿

 ‘जर मनात जागा असेल, हृदयात जागा असेल आणि अंतःकरणात जागा असेल तर घरात जागा असतेच असते’. 

दिवेलागणीची वेळ असते. एक सैनिक एका जंगलातून आपला मार्गक्रमीत असतो. काळोख पडतो व किर्र अंधारात त्याला रस्ता दिसेनासा होतो. त्याची दिशाभूल होते. जावं तर कुठे व कसा जाऊ. तो संभ्रमित होतो. तोच त्याला एक आशेचा किरण दिसतो. दुर कुठेतरी जळत असलेल्या दिव्याचा किरण त्याच्या डोळ्यात प्रवेशतो. तो खुश होतो व त्या दिशेने मार्गक्रमन करू लागतो. बरेच अंतर चालून गेल्यानंतर तो त्या घराजवळ पोहचतो व दरवाज्यावर दस्तक देतो. कोण आहे? काय काम आहे?असा आतून आवाज येतो. सैनिक म्हणतो मी एक वाट चुकलेला सैनिक आहे. मला एका रात्री पुरतां आसरा मिळेल काय? 

तेव्हा आतून आवाज येतो ह्या घरात एक माणूस झोपू शकतो किंवा दोन माणसे बसू शकतात. दरवाजा उघडा आहे, तुम्ही आत येऊ शकता. सैनिक आत जातो व दोघी बसून गप्पा मारत असतात. अर्ध्या तासा नंतर अजून एक वाट चुकलेला सैनिक तिथे येतो व दरवाजावर दस्तक देतो. आतून आवाज येतो कोण आहे व काय काम आहे? सैनिक म्हणतो मी एक सैनिक आहे, मला आजच्या रात्रीपुरता आश्रय मिळेल काय? आतून आवाज येतो, ह्या घरात एक माणूस झोपू शकतो किंवा दोन माणसे बसू शकतात किंवा तीन माणसे उभे राहू शकतात. दरवाजा उघडा आहे, आपण आत येऊ शतता. सैनिक आत जातो. तिघेजण उभ्याने गप्पा मारून रात्र गुजारतात.  


लिनेट-दादा इथे त्या माणसाच्या मनात जागा होती, हृदयात जागा होती आणि अंतःकरणात जागा होती म्हणून त्या घरात जागा होती. तुम्हीही प्रतिबिंब ह्या वास्तूत अगदी तृप्त मनाने, भरल्या हृदयाने व विशाल अंत:करणाने राहा म्हणजे घरात जागाचजागा होईल.

लिनेट -दादा मला इथे अजून एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून द्यायला आवडेल ती म्हणजे आपल्या बाबाने वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी आपले फलश्रुती हे घर बांधले, तर आपल्या मतू अण्णाने वयाच्या चाळीसाव्या वर्षी बकुळ हे घर बांधले तर त्यावर कमाल म्हणून कि काय तू वयाच्या अवघ्या पस्तीसाव्या वर्षी प्रतिबिंब नावाचा शिशामहलच उभारलास. आपल्या सर्वांसाठी हि एक अभिमानाचीच बाब आहे.

     एकदा सकाळी रविवारच्या मिसानंतर आपल्या ओटल्यावर पेपर वाचत असताना आपल्या छोट्या आरसेनने माझ्या खिशात हात घालून विस रूपयाची नोट काढली व म्हणाला आप्पा मी हे पैसे घेऊ का? आमच्या डॅडाला घर बांधण्या साठी पैसे हवे आहेत. इथे मला नमूद करायला आवडेल कि ह्या तुमच्या घर उभारणीत मोठ्याबरोबर खारी-मुंगीचाही वाटा आहे. बाकी कार्यक्रम भव्यच वाटला. लिनेटचे दोन शब्द गोड व हृदयस्पर्षीच होते. “सुरूवात गोड व शेवटही गोड” 


    तुमचाच आप्पा


              🙏🏿 


///// पॅट्रीक डिमेलो////

   दोनतलाव-पिपरी


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013