पोस्ट्स

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

 आज बुधवार 21 जुन 2023. बरोबर पन्नास वर्षा पूर्वी आजच्याच तारखेला म्हणजे 21 जुन 1973 (गुरूवार) नंदाखाल मधील दोनतलाव, येथील नारोळ विभागातील एका बेड्याला रात्री 11.15pm च्या सुमारास अचानक आग लागली. गावात हाहाःकार माजला. हे बेडे शेंडूबाबा, झ्यावबाबा व बस्त्याव बाबा ह्या कुटुंबियांचे होते. गावात हे बेडे सर्वात मोठे होते. ह्या बेड्याचे विशेष म्हणजे ह्या बेड्याच्या बांधकामासाठी चुना माती व गुळाचा वापर करण्यात आला होता. ह्या बेड्याचा दरवाजा सागवान लाकडाचा होता व तो भरीव नक्षीकाम व कलाकुसरीने मढवलेला होता. तसेच हा दरवाजा 17 ते 20 फुट उंच व 12 ते 14 फुट रुंद असा भव्य व स्पेक्टॅक्यूलर होता. आगाशितील फडक्याच्या वाडयाच्या दरवाजा सारखा राजेशाही असाच होता. बेडेही अवाढव्य असल्यामुळे तो त्या बेड्याला शोभून दिसत होता. ऐकीव गोष्ट अशी कि ह्या कुटूंबियांचा एक पुर्वज “कतू दमेल” (सिनियर) ह्यांचा आगाशी भाटीबंदर येथे पळीचा म्हणजे लायसन्सचा धंदा होता. त्यावेळेला त्या बंदरावर आलेला हा भव्य दरवाजा कतू दमेलच्या नजरेत भरला व आपल्या ओळखीचा फायदा घेऊ...

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

  आज 8 June. आजचा दिवस आम्हा फलश्रुती, बकुळ व प्रतिबिंब कुटुंबांचा आनंदोत्सवाचा दिवस. आज आमच्या मातोश्री म्हणजेच आमची *जिजी* हिचा जयंती दिन. जिजीला भावपूर्ण आदरांजली. तसेच आज आमचे धाकटे बंधू मॅथ्यू यांचा 60th Birthday. म्हणजेच हिरक महोत्सव. साठ वर्षाचे वय झाल्या नंतर त्याला जेष्ठ नागरीक वा सिनीयर सिटीझन वा बुजूर्ग म्हणून संबोधिले जाते. पण जपानी डॅाक्टर वाड याच्या मते त्यांना बुजूर्ग न म्हणता “भाग्यवान” म्हणावे . मॅथ्यूच्या चेहऱ्यावरून त्याचे वय रिटायरमेंटचे वाटत नाही. मॅथ्यूचे वय जरी वाढले तरी मन मात्र तरूण आहे. आमचा मॅथ्यू एक साधा सरळ माणूस आहे. मागील एका बर्थडे पार्टीला त्याचे मित्र अजू पाटील मॅथ्यू बाबतीत म्हणाले होते “जे पोटात तेच ओठात”. राग,द्वेश, मद-मत्सर ह्या षड्रिपू पासून मॅथ्यू दुर आहे. मॅथ्यू म्हणजे आमच्या मुलांचे लाडके अण्णा. जत्रा असो, सर्कस असो, पिक्चर असो वा इतर करमणूकीचे कार्यक्रम अण्णा मुलांना नक्कीच घेऊन जाणार. अण्णाचे मुलावरील प्रेम व मुलांच अण्णावरील प्रेम हे अबाधित होतं व आजही आहे. अण्णाच्या बाबतीत मुलासोबतचा एक किस्सा नमूद करावासा वाटतो. अण...

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

 तेरे एक बूॅंद के प्यासे हम मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी च्या भर दुपारी अतिशय दुःखद, अविश्वसनीय परंतु दुर्दैवाने खरी असलेली असलेली एक बातमी वाॅटसअॅपच्या सर्व ग्रुप वर येऊन धडकली आणि सगळ्यांची झोप उडाली. सगळीकडे अंधारून आले. वाटा निस्तेज झाल्या आणि मन सुन्न झाले. पॅट्रिक तुझ्या जाण्याची ती बातमी होती. आदल्याच दिवशी तू हाॅसपिटल मधून घरी आला होतास हे समजले. मुळात तू रूटीन चेकअप साठी तुमच्या बी. ए. आर. सी. च्या हाॅसपिटल मधे गेला होतास. पत्नी वेरोनिका तुझ्या बरोबर येत होती परंतु तू तिला मना केले. तुझ्या मनात काय द्वंद्व चालले होते हे कोणाला समजले नाही. परंतु तुझा प्रवास क्षणाक्षणाला मॄत्यू च्या समीप चालला होता. प्रत्येक जिवंत माणसाचा प्रवास असाच असतो. तुला हाका ऐकू येत होत्या. मला आता गेले पाहिजे हे तुझ्या मनाने ठरविले होते. तुझी पूर्ण तयारी झाली होती. जिथून आलो तिथेच जाणे म्हणजे मॄत्यू. म्हणून तो कधी अ सुंदर असू शकत नाही. ज्याच्या वर प्रेम केले, ज्याच्या इच्छेप्रमाणे वागलो, ज्याचा ध्यास घेतला तेथ पर्यंत जाणे म्हणजे मॄत्यू असतो. पॅट्रिक सीमा चित्रपटातील तू एक प्यार का सागर है हे तुझं आव...

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

 जगात दोनच गोष्टी वक्तशीर आहेत त्या म्हणजे सुर्य आणि मृत्यु. मृत्यु हा अटळ असतो. तो चोर पावलांनी येतो. तो कल्पना देऊन येत नाही. तो बेमालूम पणे येतो. पण त्याचं स्वतःची वेळ मात्र ठरलेली असते. तो वक्तशीर असतो. नियतीने आखलेल्या अटळ रेषा कोणाला पुसतां येत नाहीत.   एलायस मृत्युने तुला दोन वर्षांपूर्वीच कवेत घेतलं होतं. तु बरा होऊन फिरायला लागलास. पुन्हा जेष्ठ नागरिकांच्या सहलीत सहभागी होऊ लागलास. त्यात एक-दोन फॅारीन टुर्स सुद्धा तू केल्यास. तु पर्यटनाचा भोक्ता होतास. परंतू नंतर मात्र तुला आजारपणाच्या महागड्या बिछान्यावर जावं लागलं. तुझ्या आजारपणात रेडियेशन व केमोसाठी व डॅाक्टर भेटीसाठी सुकीबायला तुझे तिन्ही भाऊ, भावजी व मेहुणा नेल्सनची फार मदत झाली ते आम्हालातरी विसरतां येणार नाही. तुझ्या सेवेत आमची सुकीबाय थकलेली दिसत होती पण तीने धीर मात्र सोडला नव्हता. तिचे अविरत प्रयत्न चालू होते. तुझ्या वेदना ती स्वताकडे घेऊ शकली नाही हाच काय तो फरक.      एलायस , तू एक चांगला मित्र होतास. तुझा मित्र गोतावळा मोठा होता. स्वभावाने शांत व मनमिळावू होतास. तू स्नेहाळ अंत:क...

राजेश-रिनाचा लग्नाचा 25 वा वर्धापन सोहळा -20/12/2023

 25 वर्षा पुर्वी राजेश व रिना हे जोडपं विवाहबद्ध झाले. आणि त्या दिवसापासून नांदान गावातील प्रसिद्ध सोज कुटुंबातील रिना व मेरभाट मधील मिनेज घराण्यातील राजेश ह्यांचा ऐन तारूण्यातील लक्ष्मी-नारायणाचा जोडा शोभून दिसायला लागला. आई प्रमाणे प्रेम करणारी व आई ह्या नावाने परीसरात प्रसिद्ध असलेली सासू लाभल्यानंतर रिनाला आकाश ठेंगणे वाटायला लागले. पुढे रिना-राजेशच्या जीवन वेलींवर दोन रत्न-फुले शोभायला लागली. रिना - राजेशचे कुटुंब एक चौकोणी कुटूंब झाले. राजेशने तोपर्यंत मेडिकल स्टोअर मधे चांगला जम बसवला होता. तर रिनाने आपल्या शिक्षकी पेशात पाय रोवले होते. मुले शिकत होती. पण नियतीने रिनाची परिक्षा घ्यायचे ठरवले. रिनाचा फार मोठा आधार असलेले तीचे तरूण असे बाबा अल्पशा आजारात देवाला प्रिय झाले. हा रिनासाठी पहिला धक्का होता. लग्ना नंतर अगदी बारा वर्षात आईप्रमाणे असलेल्या सासूचे अकाली निधन झाले. पुढे मेडिकल धंद्यातील स्पर्धेमुळे राजेशला आपले स्टोअर दुसऱ्याला चालविण्यास द्यावे लागले. त्यानंतर राजेशने कॅडबरी डिलरशीप मधे प्रवेश केला. त्यात तो चांगले यश कमावत होता. पण आपल्याच घरासमोर झाले...

लुजान डिसोजाची रिटायरमेंट - 07/12/2023

अलीकडेच एका भेटीत लुजान मला बोलली होती की मी डिसेंबर मधे रिटायर होत आहे. तेव्हाच मी विचार केला की लुजान बद्दल काहीतरी भावना व्यक्त केल्या पाहीजेत. मी जरी भाषण करू शकत नसलो तरी माझे विचार लेखनातून व्यक्त करून मी ते वाचू शकतो. लुजानचा आमच्या कुटुंबियाशी परिचय अगदी अलिकडचा म्हणजे 2019 साली आम्ही जापान टुर वरती एकत्र होतो व नंतर 2022 साली आम्ही टर्की टुर वरती एकत्र होतो. त्या वेळच्या लुजान बरोबरच्या सहवासात आम्ही फार जवळ आलो. व तेव्हाच आम्हाला तिच्या खऱ्या स्वभावाची ओळख झाली. लुजानच्या अनेक सुप्त गुणांची आम्हाला तीथे खर प्रचिती आली. लुजान म्हणजे एक स्मित हास्याचा धबधबा. लुजान म्हणजे प्रसन्नता, आनंद व खुशी ह्यांचा मिलाप. लुजान म्हणजे विनम्रता, आदर व माणूसकीने ओतपोत भरलेलं एक भंडार. लुजान भेटली म्हणजे समोर जणू बहरलेलं एक सदाफुलीच झाडच उभं आहे असं वाटे. एक प्रेमळ, साधं, भोळं, नम्र असं बहूआयामी व्यक्तीमत्व. मनाने दिलदार, वागणं जबाबदार व बोलनं खुमासदार अशी हि मुर्ती. आपल्या हातून छोटीशी नगण्य चूक जरी झाली तरी सॅारी शब्द तिच्या ओठावर पहायला मिळतो. केवळ अशा ह्या गोड, व मनमिळावू स्वभावा मुळेच लुजा...

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

 हा आठवडा “कन्या आठवडा” म्हणून साजरा होत आहे. आणि ह्याच आठवड्यात ह्या कुमारी कन्येची प्राणज्योत अनंतात विलीन झाली. वडिल सोमाशेट व आई बेबी सह सहा बहीणी, एक भाऊ अशा संगीत, ताल, लय, रिदम (Rhythm) यांचा वास असलेल्या कुटुंबात ललिता हिचा जन्म झाला. रूपवान, गुणवान तरीपण लग्न न करण्याची सुप्त ईच्छा ती मनी बाळगून होती व बाबा-बेबीनेही ती हेरली होती. आपल्या पांच बहीणीच्या बाळंतपणांत ती सुद्धा बेबी बरोबर एका आईची भुमिका बजावत होती. म्हणूनच सर्व बहीणीला ती अतिप्रिय अशी दुसरी आई होती. कुटुंबात ती सर्वांची लाडकी होती. सोमाशेट तिला “बेटा” म्हणून हाक मारीत. आपल्या पाचही बहीणींची मुले तिला “लिया मावशी” अशी प्रेमळ हाक देत. सोमाशेटच्या शेवटच्या आजारपणात ललिताने केलेल्या सेवेला तोड नव्हती. आपल्या बेबीचीही (मम्मीची) तशीच सेवा करायची तिची इच्छा होती. पण नियतीला ते मंजूर नव्हते.   प्रेमळ स्वभाव, सर्वाशी अदबिने बोलणे, पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे, मुलाबाळंची विचारपूस करणे आणि येणाऱ्या पाहूण्यास न चुकता चहा टाकणे हे गुण तिच्यात उपजतच होते. जेव्हा कधी जाणं व्हायचं थोडीशी विचारपू...

“वामन गुरूजी” - ७/१०/२०२३

 काहीक लोक आपल्या आयुष्यात येतना खानदानी श्रीमंती बरोबरच दिर्घायुष्य व निरोगी जीवनाचा वर घेऊनच येतात. असं असूनही हि माणसे जाताना हळहळ का लावून जातात हे समजत नाही. वामन गुरूजी हे त्या पैकी एक होत. त्याचा जन्म सामवेदी कुटूंबात झाला. शनिवारी 7/10/2023 , त्यांच्या प्राणोत्क्रमणाची बातमी वॅाटस्ॲपवरील अनेक ग्रुपवर व्हायरल होऊ लागली. एक शॅाकींग न्यूजच होती. प्रथमता मन ॲक्सेप्ट करायलाच तयार होत नव्हतं. कोफराडातील यशवंतआप्पा ह्याच्या घरंदाज, नावदार, श्रीमंत व खानदानी कुटुंबातील ते होते. आप्पाशेटचे एक भाऊ भास्कर शेट ह्यांचे ते चिरंजीव होत. जवळजवळ साठ वर्षा पुर्वी नंदाखाल शाळेत तिसरी इयत्तेत शिकवणारे ते माझे गुरू होते. त्यानंतर एकदोन वर्षांनीच ते शाळा सोडून दुसरीकडे गेले. तिसरीत त्यांनी आमचा पाया मजबूत केला. ते अबोल, मितभाषी होते. निर्विकार चेहरा, सकारात्मकता व प्रशस्त मन हे केवळ वामन गुरूजीतच पाहायला मिळेल. एक साध्या, भोळ्या व प्रेमळ व्यक्तीमत्वाचा सरमिसळ असलेला गुरू आम्हाला लाभला म्हणून आम्ही आम्हाला भाग्यवान समजतो. हातात छडी त्यांनी कधी वापरली नाही. आमच्या वर्गातील सर्...

१२/०५/२०२३ “एक भला माणूस

 आपल्या आब्राहम नाक्यावर एक फ्रुट सेलर आहे. जरी नाव माहीत नसले तरी आपण बहुतेक सर्वजण त्याला ओळखतो. एकदम भोळा माणूस. मोकळ्या हाताचा, उदार, शांत स्वभावाचा, पापभीरू, प्रामाणिक, प्रेमळ व सर्वांना हवा-हवासा वाटणारा आहे. आपण सर्वांनीच अनुभवले असेल कि फळे देताना काटा पाडून देतो व कधी कधी एखादे फ्रुट जास्तही देत असतो. एखादे फळ मागितल्यास प्रेमाणे देतो. कोणी फळ उचलल्यास तो हसतो पण चिडत नाही. अधिक चौकशी अंती समजले कि तो धार्मिक वृत्तीचा असून पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत स्वत:ला त्याने झोकून दिले आहे. रोज दुपारी एक ते तीन ह्या वेळेत आपल्या गावी फोनवरून २५ ते ३० माणसाच्या समुहास प्रार्थनेद्वारे मार्गदर्शन करीत असतो व दर 15 दिवसांनी एकदा 400 ते 500 माणसांच्या ग्रुप करीता तो प्रार्थनेचे आयोजन करीत असतो.     त्याच्याशी थोडंसं बोलत असताना माझी क्युरीयोसीटी वाढत गेली त्यात कळले की त्याच्या जीवनात एक ट्रॅजेडी घडली व तेव्हापासून आयुष्याचा टर्निंग पॅाईंट सुरू झाला.        ह्या माणसाचं नाव  “लालबाबू रामप्रसाद महतो”. हा माणूस बिहार मधील सिता...

प्रतिबिंब - 06/05/2023

 (लिनेट आणि दादा तुम्हाला आजच्या गृह प्रवेशा निमीत्त आप्पांचे दोन शब्द)    ////////(₹)//////// आपल्या प्रतिबिंब ह्या नवीन घरातील गृहप्रवेशा बद्दल आपले अभिनंदन. एक ऐतिहासिक आठवण म्हणजे आजच्याच दिवशी सन १८८९ मधे पॅरीस मधील वर्ल्ड फेमस मॅान्यूमेंट “आयफेल टॅावर “ चे उद्घाटन झाले होते. एक अनपेक्षित जुळून आलेला योगायोग. माझ्या जन्मदिनाचे औचित्य साधून तुम्ही मला उपकृत केले त्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार.     आपल्या महाराष्ट्रात   विमल लिमये हि एक कवयित्री होऊन गेली. अलीकडेच म्हणजे 2018 मधे त्यांचं पुण्यात वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या, आदर्शाचा अर्क व संस्काराचा दर्प ओतप्रोत भरून असलेल्या कवितेचे वाचन बहुतेक सर्व नवीन घरात गृह प्रवेश प्रसंगी केलं जाते. त्यातील पहीली ओळ म्हणजे “घर असावे घरा सारखे नकोच नुसत्या भिंती, त्यात असावा असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती” ! अर्थ असा कि त्या घरात येणाऱ्या प्रत्येक अतिथीच्या पायाची धुळ पवित्र मानली जावी, त्यांचे यथायोग्य स्वागत व्हावे, मानसन्मान व्हावा. ह्यात तुम्ही कुठे कमी पडाल असे वाटत ...

“बट्या गुरूजींना भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली, व पुष्पांजली”

 गुरूजी, वॅाटस्ॲपच्या अनेक ग्रुप वरती तुम्हाला धो धो पावसा सारख्या श्रद्धांजली वाहील्या गेल्या. त्यातीलच एक ओझरती धार म्हणून माझी ही श्रध्दांजली.                 —- “गुरू: ब्रम्हा: गुरू: विष्णू: गुरूर्देवो महेश्वर:। गुरू: साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरूवे नम: ।। गुरूजी, तुम्ही माझे दुसरी इयत्तीचे क्लासटिचर, सन १९६१.   शिष्याला ज्ञानरूपी प्रकाश देणारा व त्याचे जीवन उज्वल करणारा महान योगी म्हणजे गुरू. आपल्याकडे असलेले ज्ञानरूपी भंडार निस्वार्थी पणे शिष्याला देणारा तपस्वी म्हणजे गुरू. भुतकाळाचा दुवा आणि भविष्य काळाचा दिवा म्हणजे गुर. गुरू हे इश्वरी रुप आहे. गुरूचे ऋण कधीही न फेडणारेच असते. तो चोरी करायला शिकवतो पण फक्त आणि फक्त ज्ञानाचीच चोरी. मला हे सर्व गुण बट्या गुरूजीत दिसतात. म्हणून ह्या गुणवंत गुरूचा मी शिष्य असल्याचा मला रास्त अभिमान वाटतो. दुसरी इयत्ते नंतर हेच गुरूजी मला पाचवीत हिन्दी शिकवण्यास आले. हिन्दी भाषा आपल्या शिष्याच्या डोक्यात कशी उतरवायची ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बट्या गरूजी. त्या काळात आपल्या कडील बायका...

//// महती, दोनतलाव गावाची ////.

 [भाग-१] नंदाखाल पॅरीस मधील पश्चिमेस वसलेला एक निसर्गरम्य गाव म्हणजेच “दोनतलाव गाव”. दोनतलावला फार पुर्वी जवतळे म्हणत. जवतळे ह्या नावाची एका लाकडी पोलवर फिक्स केलेली पाटी अगदी आता-आता पर्यंत वटाराला जाणाऱ्या रोडवर जॅानी-मॅानी घराजवळ कॅार्नरला उभी होती. जवतळे म्हणजे जुळे तळे. ह्या तलावांना “हाऊ ओ” चा तलाव म्हणजेच सासू-सुनेचे तलाव म्हणूनही संबोधीत असत. ह्या दोन्ही तलावांना दुभंगून जाणाऱ्या अर्नाळा-वसई रस्त्यामुळे तलावाचे दोन भाग झाले होते. पुर्वेकडील तलाव हे आकाराने मोठे होते म्हणून गावकरी त्याला मोठे तलाव व दुसरे आकाराने लहान म्हणून त्याला लहान तलाव असे बोलत असत. दोनतलाव गावाचा मुख्य धंदा दुधदुभत्याचा होता. घरोघर म्हशी पाळल्या जात असत. खळ्यात आप्पा -आलेस तात्या ह्याचा पंधरा ते विस म्हशींचा तबेला होता. देगुनाना यांच्याकडे दहा म्हशी होत्या. नया घरच्या कुटुंबात सुद्धा पंचवीस म्हशीचा तबेला होता. इनूबाबा-आल्याबाबा यांच्या कडेही पंधरा वीस म्हशी होत्या. देगुदमेल कुटुंबातही मिळून तीस ते पस्तीस म्हशी होत्या. नारोळ कुटुंबातही पंचवीस म्हशी पहावयास मिळत होत्या. गोंड्या नारोळ ह्यांच्या कडेही पंच...

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

 आईचा महीमा फार वर्णीण्यात आला आहे. “स्वामी तिन्ही जगाचा आई वीना भिकारी”, “आई म्हणजे देवाचे प्रतिरूप”, “तुझ्या सारखी आई असता पडेल आम्हा कसली वान”. आजची ही आई म्हणजे फादर रेन्वीक दाबरे ह्यांची म्म्मी. तिला सर्व मुले प्रेमाणे दादी ह्या नावाने हाक मारीत असत. मी सुध्दा तिला दादी म्हणूनच संबोधित असे. दादी फार प्रेमळ, धार्मिक, सुस्वभावी, व सुसंस्कारीत होती. फादर रेन्वीक वरून तीची ओळख झाली होती. व त्यावरून दादीकडे आमचे जाणेयेणे होते. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे आमचा घरोबा निर्माण झाला होता. तिला पाच अपत्ये (तीन मुली व दोन मुलगे) तरीही ती मुलींची भुकेली होती आणि म्हणूनच कि काय ती वेरोनला मुली प्रमाणे मानत होती. आममचं त्या बाजूने ब-याच वेळा जाणं होत असे. तर अशावेळी हमखास दादीकडे जाणं व्हायचं. तेव्हा दादी निर्मळ नाक्यावर जाऊन आमच्या साठी गरमागरम पॅटीस घेऊन यायची. माझ्यासाठी न सांगतां बिन साखरेचा चहा ती बनवीत असे. निघताना ती आम्हाला पिशवीत पिकलेली भुरीची केळे, कधी वेलचीची, कधी लांबदुधी (सकेनी), कधी पालक तर कधी बिस्कीटाचा पुडा असं काहीनकाही प्रेमा पोटी देत असे. एप्रिल- मे मधे कांद्याच्...

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013

 श्रीयूत बावतीस पेडीकर सर यास, आपला “दिंडा कुरेल यांची वंशावळ” व त्याला 200 वर्षाच्या पूर्व संदर्भाची जोड देऊन जो लेख प्रसिद्ध केला आहे त्याला तोड नाही. ऐतिहासिक ज्ञानाच्या झालरीने मढवून एक परीपूर्ण भरलेला संग्रहीत घडा आम्हापुढे रिक्त केला आहे. ह्या बाबतीत वाचा, वेचा आणि साठवा एवढेच म्हणता येईल. आपण केलेल्या जवळजवळ २०० वर्षा पासुनचा दिंडा कुरेल ते राजूशेट-जेम्सशेट यांच्या नातवंडा पर्यंतची वंशावळीतील नावे सुंदर व दुर्मिळ फोटो सहीत आम्हापुढे ठेवलेली आहेत त्याला तोड नाही. अत्यंत मेहनतीच्या व जिकरीच्या कामांची धुरा तुम्ही आपल्या खांद्यावर सहज उचललेली आहे व उचललेलं धनुष्य खंबीर पणे पेललं आहे. आपलं लिखान सत्त्यावर आधारित आहे म्हणून स्तुत्य आहे. त्याला प्रामाणिक पणाची धार आहे. तसेच त्या लिखाणात अहंकाराचा अभाव दिसून येतो. म्हणून हे लिखान कमालीचे झालेले आहे. हे नक्कीच येऱ्यागबाळ्याचं काम नव्हे. माणसाच्या हृदयाशी हृदय जोडण्याचं काम ह्या कुटुंबियानी केलेलं आहे. सच्चाई, प्रामाणिकपणा व शालीनता ह्याद्वारे ते माणसाचे माणसाशी नाते निर्माण करीत असत. समाजसेवेचे बाळकडू त्यांच्या रक्तातच भिनलेले आहे. ...

“हॅलोविन” 19/10/2023

 काहीक अपवाद वगळता बहूतेक सर्वच देशामध्ये देव-धर्म पाळले जातात. तर थोड्याबहूत प्रमाणात कर्मकांडेही जोपासली जातात. ह्या कर्मकांडांत मोडणारा एक उत्सव म्हणजे “हॅलोविन”. सुमारे 6000 वर्षा पुर्वी हॅलोविनची प्रथा इंग्लंड आणि आयलॅंड मधून उदयास आली. युरोपियन देशांत साल्टीक जातीचे लोक हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्यांची अशी धारणा आहे कि हॅलोविनच्या दरम्यान मेलेल्या व्यक्तिंची आत्मे त्यांच्या कुटुबियांना भेटायला येतात. पुढे जसजसे हे आयरिश लोक जगाच्या विविध भागात पसरत गेले तसतसे हॅलोविन सेलेब्रेशन आपले रंग आणि रुप बदलत गेले. हा दिवस म्हणजे सर्व मृत संतांच्या आठवणीचा दिवस. पाच्शिमात्य देशात 31 October हा दिवस ‘हॅलोविन डे’ एक फिस्ट म्हणून पाळला जातो. हा उत्सव 31 Oct ते 2 Nov. पर्यंत असा तीन दिवस सिलेब्रेट केला जातो. ज्यु आणि मुसलमान लोक हि प्रथा पाळत नाहीत. काहीक लोकांची अशी समजूत आहे की त्या दिवशी मृत माणसांचे आत्मे पृथ्वीवर परत येतात. ह्या दिवसाला ते ‘सॅमहॅन’ दिवस म्हणूनही संबोधितात. भारतीय संस्कृती आणि परंपरेमधे पितृपक्ष पाळून पितरांचे स्मरण केले जाते. त्याच धर्तीवर ख्रिच्शन धर्मि...