थायलॅंड -मलेशिया- सिंगापूर टूर प्रवास वर्णन (25 मे ते 6 जून २०१७)

 मित्रहो आपल्या थायलँड, मलेशिया व सिंगापूर टूरची एकदम झकास व दणक्यात झाली हे काही सांगायलाच नको. वास्तविक, सर्वसाधारणपणे हि टूर सिंगापूर, मलेशिया व थायलँड अशा प्रकारे आयोजित करतात परंतु आपल्या मागणी प्रमाणे त्यात बदल करून ती थायलँड, मलेशिया व सिंगापूर ह्या क्रमाणे करण्यात आली. तीन रात्र पटायामध्ये, दोन रात्र बॅंकाॅकमध्ये, दोन रात्र क्वालालम्पुरमध्ये व तीन रात्र सिंगापुरमध्ये अशाप्रकारे ती करण्यात आली. ह्या टूरसाठी 40 जणांचा ग्रुप बनविल्यानंतर राॅबीन सरने देव मिटींग घेतल्या. ह्या मिटींगमध्ये टूर बद्दल ऊपयुक्त अशी माहिती देण्यात आली तसेच फ्रेडीसर व अनुभवी बॅरीसरने प्रत्येकाच्या शंकेचे योग्य पद्दतीने निरसन केले. तसेच प्रत्येकाला लेखी टूर प्रोग्राम देण्यात आला. परदेशीचलनासाठी Cox and Kings त्या माणसाबरोबर मिटींग लावण्यात आली व आपला परदेशी चलनाचा प्रश्न मिटवला. आपला टूर मॅनेजर फ्रेडी कोलासो ह्यांची ओळख करून देण्यात आली. तसेच आपआपला पासपोर्ट, व्हीजा, विमानाची तिकीटे, इन्सुरन्स पाॅलीसी आपल्याकडे सुपूर्द करण्यात आले. पिकअप साठी एअरपोर्ट पर्यंत बस देण्याचे ठरले. बसचे ठिकाण व टाइपिंग ही ठरविण्यात आले. तसेच आपल्याबरोबर घ्यायच्या वस्तुची ट्रावेल टिप्स पत्रिकाच देण्यात आली. आता प्रत्येकजण 25th May ची वाट पाहु लागले. जसजसा दिवस जवळ येत होता तसतसा वातावरणात बदल होतहोता. आनंद वाढत चालला होता. मोबाईल घनधनत होते. सगळ्यांनी आपआपल्या बॅगा भरून तयार ठेवल्या होत्या. आणि बोलतां बोलतां ज्या दिवसाचीआपण सर्वजण अगदी आतुरतेने वाट पहात होतो तो दिवस येऊन ठेपला


आज शुक्रवार २५ मे २०१७. सर्व घरात एक आनंदी पहाट घेऊन आकाशात सुर्याचे आगमन. संपूर्ण घरच उत्साही भासत होतं. स्रिया अजूनही काही शिल्लक राहीलेले पॅकींग करण्यात तर काही गोडधोड बनविण्यात गुंतल्या. आजचे सर्व कपडे ईस्री होऊन तयार होते. फोन तसे चालूच होते. संध्याकाळी ४ लांडे पर्यंत आंघोळी वगैरे आटोपण्यात आल्या. आता लेडीज सर्व मेकअप रूममध्ये. आत जेन्टस् ना प्रवेश नव्हता. दरवाजा ठोकूनही आतून ऊघडला जात नव्हता. ठिक ५ वाजेपर्यंत सर्व जण कपडे करून तयार झाले. आणि अगदी त्यांच सुमारास फोन घनघनला. फोनची रिंग नेहमी पेक्षा निराळीच भासली. "आपले फ्रेडी सर बस घेऊन दोनतलाव स्टाॅप वरती आलेले आहेत." उत्साह गगनात मावेनासा झाला. लगेच सर्व घरात प्रार्थना आटोपल्या गेल्या. ठरल्या वेळेप्रमाणे सर्व जण आपआपल्या कुटुंबीय व नातेवाईका सोबत दोनतलाव स्टाॅपला पोहोचले. अर्नाळ्याहून अॅंड्र्यू लोपिस १, मिनेजकडून मायकल व इजमाल मिनेजीस २, धाकलवाडीतून फ्रान्सिस व नानू लोपिस २, शिरलयवाडी विसरोडीतून फिलीप व बेबी लोपिस २, करमाळा वरून मार्शल व जोस्पीन फरगोज २, बानभाटवरून जेकब, शोभना, जेसिका व लिटील मिस *जेसलीन* ४, बेंज्यामिन व मार्तिन लोपिस २, दोनतलाव वरून चार्लस, ज्युली, ग्लेन व झील डिमेलो ४, ईजमाल डिमेलो १, पास्कोल (पांडू), सुनिता व जय डिमेलो ३, सायमन, संगिता, सायली, व सेनेट डिमेलो ४, ग्रेसी डिमेलो १, पॅट्रीक व वरोनिका डिमेलो २, आणि घोटार वरून सांतान घोन्साल्विस १ हे सर्वजण ५.४५ वाजेपर्यंत स्टाॅपवरती हजर झाले. चेहर्या वरील ऊत्साहामुळे टूरवर निघालेली माणसे सहज ओळखतां येत होती. 


आपआपल्या नातेवाईकांचा निरोप घेऊन सर्वजण बसमध्ये आपआपल्या सीट वर स्थानापन्न झाले. फ्रेडी सरने बसमध्ये सर्वांचे Warm Welcome केले. ठिक ६.२० ला बस मुंबई विमानतळाकडे निघाली. बसमध्ये ज्युली डिमेलोने प्रथमतादेवांचें आभार मानून सुखरूप प्रवासासाठी प्रार्थना केली व सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. बसमध्ये ग्लॅमर ट्रॅव्हल तर्फे नाश्ता ( पॅटीस व कोल्ड ड्रिंक्स ) देण्यात आला व सोबत वाॅटर बाॅटल ही देण्यात आली. बसमध्ये संगिता डिमेलोने नंदाखाल चर्च- पवित्र आत्म्याच्या सणाच्या नोव्हेनाची प्रार्थना केली. ठिक ९.०० वाजता बस मुंबईच्या भव्य एअरपोर्टवरती पोहोचली. कित्येकदा पाहूनही एअरपोर्टची नक्षीदार बिल्डिंग, भव्य पिलर्स, कोरीव काम व लाईटचे झोत परतपरत आपले लक्ष वेधून घेत होते. विमानतळावर मेदोडीकर अजित, गिता, ....., लिटील मिस् निकोल ४, हे घोन्साल्विस कुटुंब आपल्याला जाॅईन झाले. आपआपल्या बॅगा ट्राॅलीवरती ठेवून सर्वजण आळीपाळीने फ्रेश होऊन आले. नंतर सर्वांनी बाहेर एकत्र बसून भुजिंग, लाॅलीपाॅप,फरसाण, चकली, चिवडा खाऊन आपला नाश्ता आटोपला. १०.३० pm नंतर सर्वानी आपआपले पासपोर्ट दाखवून आत प्रवेश घेतला. चेकइन, सेक्युरीटी चेक, इमिग्रेशन च्या प्रोसेस आटोपून आपल्याला दिलेल्या गेटवरती जाऊन बसलो.


—-------------------------------------------------------

Patrick Dmello: वरील माहितीत समाधानवाले मायकल व मीना डिमेलो २, हा ऊल्लेख अनवधनाने राहून गेला आहे. समजून घ्यावे. Sorry

—-------------------------------------------------------


बॅंगकीॅकला आपण एअर इंडियाच्या फ्लाईटने निघणार होतो.आपले फ्लाईट No. AI - 330 होते. आपले विमान टर्मिनल दोनच्या गेट नंबर 71 वरून सुटणार होतं. बोर्डींग टाईम 26 मे पहाटे 1.45am चं होतं. रात्री 8/1/17, 11:34:15 PM: Patrick Dmello: 11वाजता आपण गेट नं. 71 वरती जऊन गप्पा मारीत बसलो होतो. साधारण 11'30 वाजता आपले फ्लाईट गेट नं. 71 ऐवजी गेट नॅ. 78 वरून सुटणार असल्याची अनाउंसमेंट झाली. व विमान 1.45am ऐवजी 2.45 am ला निघणार म्हणजेच एक तास उशीराने निघणार असल्याचे जाहीर झाले. लगेच आपण सर्वजण 78 नॅबरच्या गेट वरती जाऊन बसलो. गप्पा मारता मारता रात्रीचे बारा वाजून गेले व दुसरा दिवस ऊजाडला.


आज २६मे २०१७. पहाटे दोनच्या सुमारास आपले बोर्डींग सुरू झाले. ठिक २.४५ वाजता आपल्या विमानाने उड्डान घेतले. आपला बॅंगकाॅक प्रवास सुरू झाला. ३.३० वाजता विमानात आपल्याला डिनर देण्यातआले. पहाटे ६.४५ वाजता आपले विमान थायलॅंड च्या बॅंगकाॅक शहरातील "सुवर्णभूमी" ह्या इंटरनॅशनल विमानतळावरती लॅंडींग झाले. आपले पाय थायलॅंड जोशींच्या भूमीला लागले. मित्रहो, आपल्या म्हणजे इंडीयाच्या आणि थायलॅंडच्या टाईमा मध्ये दिड तासाचा फरक आहे. म्हणजेच जेव्हा आपल्या इंडीयन टाईमा प्रमाणेआपले विमान सकाळी ६.४५ वाजता लॅंडींग झाले तेव्हा बॅंगकाॅक विमानतळावरील टाईमींग होते सकाळचे ८ वाजून १५ मिनिटे. भारतीय वेळेप्रमाणे साधारण ७.१५ am ला इमिग्रेशन झाले. त्यानंतर आपण बेल्टवरून आपआपल्या लगेज बॅगा कलेक्ट केल्या. बाहेर आपल्या साठी 31-6713 क्रमांकाची लक्झरी बस हजर होती. आपल्या बॅगा बसमधील लगेज पोर्शन मध्ये ठेवून आपण बसमध्ये स्थानापन्न झालो व Mr. Barry ह्या थायलॅंड गाईड सोबत आपला पुढचा प्रवास सुरू झाला.


—-------------------------------------------------------

आपल्या पुढच्या प्रवासा अगोदर आपण थोडक्यात थायलॅंड देशाचा आढावा घेऊ या --------


थायलॅंड हा इंडोचायनीज द्वीपकल्पामध्य् वसलेला एक देश आहे. जवळजवळ १४३० बेटांनजीक बनलेलाल हा देश आहे. क्षेत्रफळाने थायलॅंड हा जगातील पन्नासाव्या क्रमांकावर आहे ( भारत सातव्या क्रमांकावर आहे). बॅंगकाॅक शहर ही थायलॅंड चे राजधानी शहर आहे. ह्या देशांचा भाषा *"थाय"* आहे. इथे ९३% पेक्षा जास्त लोक बौध्द धर्माचे आहेत. ह्या देशात ३५००० टेंपल आहेत. बाथ (Baht) हे या देशाचे चलन आहे. शेती व टुरिझम ह्या विभागात हा देश आघाडीवर आहे. थायलॅंड मध्ये राजेशाही पद्दत असून तिथे राजा-राणीला फार Respect दिला जातो. प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी राजा-राणी चे फोटो असलेले मोठमोठाले फलक लावलेले दिसतात. तिथे राजा विरूध्द काहीही बोलल्यास तुरूंगाची शिक्षा होऊ शकते. थायलॅंडचे पूर्वीचे नाव सियाम (Siam) असे होते. साऊथईस्ट एशियन देशांतील थायलॅंड हा एकमेव देश असा आहे की ज्याच्यावर युरोपीयन देशांचे कधीही अधिपत्य नव्हते. मुळात थायलॅंड नावाचाच अर्थ म्हणजे "स्वतंत्र भूमी" (Land of freedom) असे आहे. मानवी शरीरातील डोक्याला अतिमहत्वाचा व पवित्र भाग समजला जातो म्हणून कोणत्याही व्यक्तीच्या डोक्याला स्पर्श करण्यास बंदी आहे, इवन लहान मुलांच्या डोक्याला सुद्दा. "आॅर्चीड" (Orchid) हे थायलॅंड चे राष्ट्रीय फुल असून तेथे ह्या फुलांच्या १५०० शे हून जास्त जाती आहेत. थायलॅंड हा जगातील सर्वात जास्त आॅर्चीड फुले Export करणारा देश आहे. थायलॅंड मध्ये स्मित हास्याला (Smile) फार महत्व असून तिथे तुम्हाला मोस्टली सर्वांच्या चेहर्यावर smile दिसेल. आणि म्हणूनच थायलॅंड ला "Land of Smile" असेही संबोधीले जाते. धातु उत्पादनात टिन व शेती उत्पादनात राईस ह्या मध्ये थायलॅंड आघाडीवर आहे. "रेड बुल" हे थायलॅंड मधील फार महत्त्वाचे व लोकप्रिय Energy drink आहे. इथे घरातून बाहेर पडताना अंडरवेअर घालने बंधनकारक आहे. रेटीकुलेटेड नावाचा जमातील सर्वात मोठा अजगर थायलॅंड मध्येच आढळतो. "Mudskipper " नावाचा एक विचीत्र मासा थायलॅंड मध्ये आढळतो की जो पाण्यातही राहतो, जमीनीवरही चालतो व झाडावरही चढू शकतो. प्रत्येक वर्षी थायलॅंड ला साठ लाखाहून जास्त परदेशी पर्यटक भेटी देतात. अशाप्रकारे थायलॅंड हा विविध पिरकारे नटलेला, सजलेला व आपल्याला खरोखर प्रेमात पाडणारा, विविध पैलू असलेला देश आहे.

—-------------------------------------------------------


    "Good Morning". सकाळचे ८.१५ लाजलेले आहेत. थायलॅंड भूमीवर बसमधून गाईड बॅरी सोबत आपला पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. बॅंगकाॅकच्या सुवर्णभूमी अअरपोर्ट वरून आता आपण पटायाकडे निघालो आहोत. बसमध्ये मि. बॅरी आपल्याला पटायाविषयी आणि अेकूण थायलॅंड बद्दल माहिती देत आहेत. आपले टुर मॅनेजर मि. फ्रेडी कोलासो मध्येमध्ये व्हिसल साॅंगने आपली करमणूक करीत आहेत. पटायात "श्रीराच्या टायगर Zoo" पाहण्यासाठी जात आहोत. आणि ठिक ११ am ला आपण टायगर झू ला पोहोचलो. थायलॅंडला गेलात आणि श्रीराच्या झू पाहिला नाही असं कधी होऊच शकतनाही. हा झू बघण्या सारखा असून तिथे जगातील सर्व प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. बेंगाल टायगर, बेबी पीग (डुकरे) आणि कुत्रे पिंज-यात एकत्रपणे व गुण्यागोविंदाने राहतात. डुकरांच्या पिलाबरोबर वाघाचे छावेही एकत्रपणे डुकरणीचे दुध पित असतात. मोठमोठाल्या डुकराचे शो व रेस दाखवल्या जातात. तीथे वाघाच्या पिल्लांचा विंगेत घेऊन फोटो घ्यायला मिळतो परंतु तुम्हाला त्यासाठी पैसे घ्यावे लागतात. तसेच छोट्याछोट्या क्राॅकोडाईल हातात पकडून फोटो घ्यायला देतात पण ते सुद्दा on payment. तसेच तेथे अनेक शहाम्रुग, कांगारू, गौरीला ऊंट हत्ती व हरीणे पाहायला मिळतात. आणि विशेष म्हणजे तीथे आपण "Scorpion Queen" पाहीली की जीच्या अंगावरील कपड्याला असंख्य विषारी विंचू टांगलेली होती. तिच्या बरोबरही पर्यटक फोटो घेत होते. तसेच एका बंदीस्त तलावात मोठमोठ्या मगरी सुद्धा आपण पाहिल्या. तसेच तेथे दाखविण्यात आलेला टायगर शो पाहून ठिक १.३० pm ला आपण zoo मध्येच असलेल्या "Bombay magic Restaurant" मध्ये लंच घेतले. एका साईडला थाय-चायनिज-युरोपियन जेवण तर दुस-या बाजुला इंडियन जेवण होते. भुक फार लागली होती. सर्वांनी दोन्ही साईडच्या जेवणातला आनंद घेत यथेच्छ ताव मारला.


मित्र हो, श्रिराच्याव टायगर झू मध्ये आपण क्राॅकोडाईल शो व टायगर शो पाहीले, त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ या........

    

क्राॅकोडाईल शो :- शो साठी खास बनवीलेल्या तलावात सहा-सात मगरी होत्या . दोन तरूण तलावात उतरून तलावात अंगावर खेकसणा-या मगरीच्या शेपटीला पकडून त्यांना बाहेर सरफेस वरती आणतात. आ करून असलेल्या मगरीच्या जबड्यात हात घालणे, मगरीचे चुंबन घेणे, ऊघडया जबड्यात हात घालून मगरीची जीभ खाली-वर करून दाखविणे, तसेच एका युवतीने मगरी समोर झोपून आपली स्वःताची मुंडी मगरीच्या जबड्यात ठेवणे वगैरे सारखे थरारक शो करून दाखविले. Really horrible .


टायगर शो :- बंदीस्त स्टेजवर आठ वाघ रिंगमास्टर बरोबर Entry करतात. रिंगमास्टरच्या ईशा-यांवर सर्व वाघ आपआपल्या मेटल स्टॅंडवरती ऊड्या मारून उभे राहतात. नंतर एक-एक वाघ खाली उतरून खास बनवलेल्या मेटल स्टेज वरती चढून लाईनीने दोन पाया वरती ऊभे राहून स्टेडीयम मधील प्रेक्षकांना सलाम करतात. तसेच दोन वाघांना जमिनीवर झोपायला लावून ईशा-यावर लोळण घालायला लावतात, अडीच फूट व्यासाच्या मेटल रींग मधून एका स्टॅंड वरून दुस-या स्टॅंड वर जम्प घेणे, रींगला संपूर्ण पातळ कागद लावून समोरील न दिसणा-या स्टॅंडवर ऊडी मारणे, पेटत्या रीग मधून ऊडी मारणे, तसेच रींगमास्तरच्या समोरून पुढचे दोन पाय त्याच्या खांद्यावर ठेवून नरडीसमोर तोंड असलेला वाघ रींगमास्तरच्या हातातील खाद्य खात-खात रीगमास्तर बरोबर गोलगोल फिरणे वगैरे जानलेवा गेम ह्या शो मध्ये आपण पाहीले. सचमूच Terrible.


श्रीराच्या टायगर झू मधील "बाॅंम्बे मॅजीक रेस्टोरंट मध्ये लंच आटोपून आपण पटायातील गोल्डन बीच ( Golden Beach ) ह्या हाॅट्लवरती भारतीय वेळेप्रमाणे ३.१५ pm ला पोहोचलो. प्रत्येकाने बसमधून आपआपल्या बॅगा कलेक्ट केल्या व नंतर रूमच्या चाव्या ताब्यात घेऊन आपण अलाॅट केलेल्या रूम मध्ये गेलो. आंघोळी आटोपून थोडीशी विश्रांती घेऊन ४.३० pm वाजता पटाया येथील फेमस "Alkazar cabaret show" पाहण्यासाठी आपण बस मधून हाॅटेल पासुन थोडे जवळच असलेल्या थिएटर वर पोहोचलो.


अल्काझर केब्रे शो हा आशियातील एक भव्य व वर्ल्डक्लास कॅब्रे शो आहे. ऊत्क्रुष्ट म्युझिक, फॅन्टास्टीक साऊंड सिस्टीम, अॅट्रॅक्टीव डान्स, काॅम्प्यूटराईज्ड लायटींग, अतिऊच्च वेशभूषा (costumes), नाॅनस्टाॅप डान्स वगैरेंनी युक्त असा कॅब्रे शो असतो. दिवसाला चार शो असतात. प्रत्येक शो साधारणपणे ७० मिनीटांचा असतो. संध्याकाळी थायलॅंड टाईम प्रमाणे ५.०० pm ला हे शो सुरू होतात आणि ११.००pm ला बंद होतात. ह्या थिएटरची कपॅसीटी १२०० सीट्स ची आहे. तिकीटाचा कमीतकमी रेट ४८० बाथ आहे. थिएटर मध्ये प्रवेश करताना प्रत्येकाला एक साॅफ्ट ड्रिंक्स दिले जाते. ह्या डांस मध्ये ऊंच व सुंदर सुंदरीं डान्स करीत असतात. त्याच्या सिंक्रोनायझेशनला तोड नाही. डान्स बघताना नजर हटत नसते. निरनिराळ्या देशातील निरनिराळ्या गाण्यावरती डान्स असतात. आपल्याला "आज नचले नचले " ह्या हिन्दी गाण्यावर कॅब्रे डान्स पाहायला मिळाला. ऐकून नवल वाटेल , ह्या शो चे खास वैशिष्टय म्हणजे त्यात नाचणा-या सर्व सुंदरी ह्या लेडीज नसून मुलत: पुरूष आहेत. त्यांना "Ladyboy" म्हणून संबोधिले जाते. म्हणजेच स्रि लाईफ जगणारे पुरूष.


शो पाहून झाल्यानंतर थोडीशी शाॅपिंग व ८.००pm ला "इंडियन चिमणी रेस्टोरंट" ला डिनर घेतले आणि ठिक ९.३०pm ला आपण "गोल्डन बीच" हाॅटेल वरती परतलो.


थायलॅंड मधील पटाया शहरात आपला पहिला दिवस एकंदरीत फार म्हणजे फारच मजेत गेला. पण पहीली रात्र? ऊंच, सुंदर देखण्या युवतीचा मन Excite करणारा आणि Temptation आणणारा कॅब्रे शो आपण पाहून आलेलो आहोत. भलत्याच मुड मध्ये आहोत. आणि आता आपण पटाया मधील हाॅटेल "गोल्डन बिच" वरती पहीली रात्र Enjoy करण्यासाठी पोहोचले आहोत. असो.


आज शनिवार दिनांक २७/०५/२०१७. सकाळी लवकर उठून, आंघोळ आटोपून पाॅश कपडे करून आपण पुढच्या प्रवासासाठी तयार झालो आहोत. तत्पूर्वी आपण हाॅटेल मध्ये काॅन्टीनेंटल व थाय ब्रेकफास्ट चा आनंद घेऊन अगदी त्रुप्त झालेलेच आहोत. आता आपण भारतीय वेळेप्रमाणे ठिक ८ वाजता पटाया बिच वरती जाण्यासाठी बसमध्ये बसलेलेच आहोत. बसमध्ये मिनक्षी समाधानने नंदाखाल चर्च च्या सणाची नोव्हेना प्रार्थना केली. ९.४५ वाजता आपण बलीहाय बिच वरती पोहोचलो. १०.३० वाजता फेरी बोटणे निघुन अगदी १५ मिनीटांत आपण समुद्रात खास पॅरासेलींग साठी बनवलेल्या तारफ्यावर (Pontoon) पोहोचलो. आपल्यातील

ब-याचं जणांनी पॅरास्लींगचा आनंद लुटला. ह्यात पॅराशूट ची दोरी खाली समुद्रातील स्पीडबोटला बांधलेली असते. स्पीडबोटच्या सहाय्याने उड्डाण केल्यानंतर माणूस आकाशात घार-गरूडा प्रमाणे विहंग करीत फिरत असतो. तब्बल १० मिनीटे माणूस ऊंच आकाशात एकटा असतो. आपल्यातील प्रामुख्याने बेजमी, जेकब, शोभना, जसिका, जेसलिन, लुईस, पांडू, सुनिता,जय, मायकल समाधान, मिनाक्षी, सायमन, संगिता, सायली, सेनेट, चार्ल्स , ज्युली, ग्लेस्टन, झील, अजित,गिता, सायरा, निकोल आणि विशेष म्हणजे चक्क पन्नासी क्राॅस केलेल्या लेडीज म्हणजे सांतान, ग्रेसी, वेरोनिका व मेरी ह्यांनीही अगदी आत्मविश्वासाने आपली हवेत ऊडायची हौस पुरी केली. मित्रहो, ह्या पॅरासेलींगचे तिकीट ५०० बाथ म्हणजेच आपले १०००/- रुपये Per Person होते.


खरोखर एक थ्रीलींग अॅक्स्पीरीयन्स. ज्यांनी अनुभवीला ते सर्व ग्रेटच.


वर निळे आकाश आणि खाली पटायाचा निळा समुद्र आणि मध्ये नंदाखालची माणसं देवदुताप्रमाणे आकाशात पॅराशुटच्या सहाय्याने हवेत तरंगत आहेत जणू पवित्र आत्म्याच्या सहवासातच फिरत आहेत. आकाशात जिकडे-तिकडे पॅराशूट छत्र्सा व खाली समुद्रात स्पीडबोटी इतस्तथा फिरताना दिसत होत्या. एक सुंदर असा देखावा पाहायला मिळत होता.


पॅरासेलींग आटोपून ११.१५ वाजता आपण स्पीडबोटीने कॅरोल आयलॅंड वरती निघालो. सर्वांनी आॅरेंज कलरचे लाईफ जॅकेट परीधान केलेले होते. एक साहसी आणि धाडसी प्रवास आपण अनुभवीत होतो. स्पीडबोट असंख्य व मोठमोठ्या लाटाबरोबर वरखाली होत होती. *"याग दरीयाचा दरीयाचा दरारा मोठा" * हा अनुभव आपण प्रत्यक्षात घेत होतो. ११.३० वाजता आपण ब्ल्यू कलरच्या रबरी ब्लाॅकने बणवीलेल्या जेट्टी वर उतरलो. हलकेसे डुलणा-या जेट्टीवरून चालताना एक वेगळाच अनुभव आपणांस येत होता. समोर दिसणारा बीच आकर्षक दिसत होता. बीच वरती पोहोचल्यावर समोर मंडपाचे शेड , त्यात बसलेले पर्यटक, समोर लाईन मध्ये असलेली दुकाने व पाठीमागे समुद्रात मनमुराद आनंद लुटणारे रंगीबेरंगी काॅस्च्यूम परीधान केलेले पर्यटक, खरोखर प्रेक्षणीय सीन होते. मंडपात पर्यटकांना आपआपल्या डिमांड प्रमाणे बियर, व्हिस्की, कोल्ड ड्रिंक्स, नारळपाणी, थाय नाश्ता serve केला जात होता. पाठीमागच्या बाजुला लाईनमध्ये असलेल्या दुकानात निरनिराळ्या प्रकारचे फ्राय केलेले मासे विकले जात होते. त्यात मोठमोठाले खेकडे, प्राॅंझ, पापलेट, सरगे, बोंबील फ्राय (बाॅंम्बे डक), मांदेली, कोलंबी, करंदी इवन सुके बोंबील सुध्दा विकले जात होते. चिकन, डुकराचे रोस्ट/ फ्राय केलेले आयटेम सुद्धा आपले लक्ष वेधत होते. तिथे समुद्रात पर्यटक अंगावरील रंगीबेरंगी स्विमींग वेषात समुद्रात डुबक्या मारून सन-बाथचा आनंद घेत होते. आपली तरूणमंडळी सुद्धा यात मागे नव्हती. स्पीडबोटींचा तांडव तर चालूच होता. अशा रमणीय वातावरणाची मनमुराद मजा लुटून स्पीडबोटने आपण बलीहाय बीचवर पोहोचलो. ठिक एक वाजता आपण बसने आपल्या "गोल्डन बीच" हाॅटेलवर आलो. लंच आटोपून हाॅटेलवर आपआपल्या रूममध्ये थोडीशी विश्रांती घेऊन परत ३.१५ वाजता आपण बसने "Nongnooch Village" कडे निघालो.


नाॅंगनूच व्हीलेज पार्क ही एक वर्ल्ड फेमस tropical botanical garden असून जवळजवळ ६ अेकर जागा व्यापलेली आहे. तेथील आॅर्चीड गार्डन, पाॅटरी गार्डन प्रेक्षणीय आहे. आपण तेथील थाय कल्चरल शो पाहीला ज्यात थाय वेडींग सेरेमनी, ट्रॅडीशनल थाय डान्स इन ट्रॅडीशनल थाय ड्रेस, म्युजिकल परफाॅरमन्स, तलवार लढाई ( award fighting), हत्तीवर बसून होणारी सैनिकी लढाई वगैरे दाखविण्यात आली. ह्या कल्चरल शो नंतर आपण इलेफेन्ट शो पाहीला ज्यात सोंडीत रींग फिरवणे, दोन्ही पाय वर करून सलामी देणे, माणसाला सोंडीत पकडून स्टेजवर फिरवणे, छोट्या स्टुलवर ऊभे राहणे, लहान मुलासारखे लंगडत लंगडत चालणे, लांबून फुगे फोडने, फुटबाॅल - बास्केट बाॅल खेळाने, तसेच बेबी इलेफेन्टच्या कसरतीही पाहिल्या. हे सर्व पाहून झाल्यानंतर आपण बाहेर गार्डन मध्ये आलो. बाहेर फ्रेडी सरांनी आपले फाऊंटन समोर ग्रुप फोटो घेतले. त्यानंतर त्या गार्डन मध्ये आपण फिरून तेथील नकली प्राण्याबरोबर व फुलझाडात आपण वयक्तीक वा ग्रुप फोटो घेतले. बागेचा मनगुराद आनंद लुटून ठिक ५.१५ pm वाजता मसाज सेंटरवर निघालो व ५.४५ वाजता पोहोचलो. थायलॅंड मध्ये थाय मसाज फार फेमस आहे. थायलँडला जाऊन मसाज न घेणे असे कधी सहसा होतं नाही. दोन तास मसाजचे ४०० बाथ म्हणजे आपले ८०० रुपये . ह्या मसाज सेंटरवर फिलीप व बेबी लोपिस, फरशा व नानू लोपिस, मायकल-मिना, सायमन-संगिता, सायली, सेनेट, पांडू- सुनिता, जय, चार्ल्स - ज्युली, गलेस्टन, झील, अजीत- गिता, ईजमाल(सुकीबाय), मार्शल व जसिंता फरगोज, मायकल व ईमाबाय मिनेज वगैरे जणांनी थाय मसाजचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. रात्री ठिक ८.३० वाजता आपण "Indian Garden" ह्या रेस्टाॅरंटला डिनर घेऊन १०.००वाजता Golden Beach hotel वर पोहोचलो.


अशा प्रकारे पटायात आपण दोन दिवस अगदी मजेत घालवले. आज रविवार, २८/०५/२०१७, हा पटायातील आपला तिसरा दिवस. हाॅटेलमध्ये सकाळचा नाश्ता आटोपून आपण ८.२० वाजता कार्टुन थीम पार्क कडे निघालो. बसमध्ये आज नोव्हेनाची प्रार्थना शोभना बानभाट हिने केली. साधारण तासाभराने आपण कार्टुन थीम पार्कला पोहोचलो. "Cartoon network Amazone Waterpark Pattaya". ही थीम पार्क म्हणजे एक वाॅटर पार्क असून हायस्पीड वाॅटर स्लाईड्स आणि राईड्स असलेली जगातील पहीली वाॅटर पार्क आहे. तसेच थायलॅंडमधील सर्वात मोठी वाॅटरपार्क आहे. काळजाचा ठोका चुकवणे-या राईड्स, सी राफ्टींग, वाईंडींग रीवर सारख्या राईडींग्स म्हणजे एक एक थरार नाट्यच आहे. अशा ह्या थीम पार्क मध्ये सर्व राईड्स ची मजा घेऊन ठिक १२.३० वाजता "गरम मसाला" ह्या इंडियन रेस्टाॅरंटमध्से आपण लंचसाठी गेलो. लंच आटोपून १.४० वाजता जेम्स गॅलरी बघण्यासाठी गेलो. हि फॅक्टरी थायलॅडमध्ये बॅंगकाॅक, Chiangmai, फुकेट आणि पटाया ह्या चार मेजर शहरात ठाणं मांडून आहे. जगातील सर्वात मोठी ज्वेलरी आणि जेम्स सेंटर म्हणून प्रसिद्ध आहे. फेअर आणि रिझनेबल प्राईस, ऊत्क्रुष्ट सर्वीस बद्दल फेमस आहे. तेथील प्रत्येक ज्वेलरी आयटम हा सर्टीफाईड केला जातो व त्याला लाईफटाईम गॅरंटी असते. जेम्स जवळ असणे म्हणजे श्रीमंतीचे लक्षण समजले जात असे. व ते सहसा राज घराण्यातच असत, ऊदा. ईजिप्तची क्लिअोपात्रा, रोमचे सिझर, इंग्लंडचे राजे, चायनाचे राजे, किंवा थायलॅंडचे राजे आपल्याकडे जेम्स ठेवीत असत. ह्या फॅक्टरीत ज्वेलरी कशी बनवली जाते हे पहावयास मिळते. संगिता, गिता, मिनांक्षी, सुनिता, जसिंता, ज्युली, बेबीबाय व ईमाबाय इत्यादींनी दागिने खरेदी केले. जेम गॅलरी नंतर आपण ५.१५ वाजता आपण आपल्या गोल्डन बिच हाॅटेलवरती पोहचलो.


२६, २७ आणि २८ मे ह्या तीन दिवसात आपण थायलॅंड मधील *पटाया* शहर अगदी पिंजून काढले. आज सोमवार २९ मे २०१७. सकाळचा नाश्ता आटोपून हाॅटेल *गोल्डन बीच* ला रामराम करून आपआपल्या बॅगा बसमध्ये ठेवून सकाळी सव्वा सात वाजता बसने आपण थायलॅंडच्या *बॅंगकाॅक* शहरांकडे निघालो. बसमध्ये आजची नोव्हेनाची प्रार्थना ग्रेसी डिमेलोने अर्पिली. ठिक दहा वाजता आपण *टेंपल आॅफ गोल्डन बुद्धा• मध्ये आलो. ह्या टेंपलमध्ये गाॅड बुद्धाची बसलेल्या पोज मधील पाच मीटर ऊंचीची व साडे पाच टन वजनाची सोनेरी मुर्ती असून विशेष म्हणजे ही जगातील सर्वात मोठी बसलेल्या पोज मधील सोनेरी मुर्ती आहे. हे टेंपल पाहून झाल्यानंतर आपण *Temple of the Reclining Buddha* पाहायला गेलो. संपूर्ण थायलॅंडमध्ये हायग्रेडची जी सहा टेंपल आहेत त्यात हे टेंपल सर्वात वरच्या ग्रेडचे म्हणजेच 1st grade Royal Temple म्हणून गणले जाते. ह्या टेंपलमध्ये भगवान बुद्धाच्या भरपूर मुर्त्या असून त्यात ही Reclining म्हणजेच पहुडलेल्या पोज मधील ४६ मिटर लांबीची सोनेरी मुर्ती आहे. आणि म्हणूनच ह्या टेंपलला * The temple of the reclining Buddha* म्हणून संबोधले जाते. इथे थाय मेडीसीन स्कुल सुद्धा आहे. तसेच वर्ल्ड फेमस थाय मसाज इथूनच सुरू झाला. म्हणजेच थाय मसाजची ही Birthplace आहे. अजूनही इथे थाय मसाज शिकवीले जाते. हे टेंपल पाहून झाल्यानंतर आपण १२.३० वाजता *Hotel Bangkok Palace* वर आलो. रूमच्या चाव्या घेऊन आपल्या बॅगा रूमवर ठेवल्या व एक वाजता जवळच असलेल्या *रसोई रेस्टाॅरंट* वर जाऊन लंच घेतले व तीन वाजेपर्यंत रूमवरती आलो. संध्याकाळी क्रुझची मजा आणि अनुभव घेण्यासाठी ठिक ५.४५ वाजता क्रुज रिवरसीटीला आलो. व संध्याकाळी सहा ते साडे सात पर्यंत आपण क्रुजचा अनुभव घेतला. बुफे डिनर मधील भरपुर थाय आयटमचा मनसोक्त आनंद घेतला. बिअर, हाॅटड्रीक ब कोल्ड ड्रिंक्स सुद्धा serve केली जात होती. मधुर म्युझिक तर चालूच होते. लेडी सिंगर निरनिराळ्या हावभावात गात व डान्स करीत होती. निरनिराळ्या देशांतील गाण्यांवर त्या त्या देशातील पर्यटकांकडून दाद मिळवत होती. आपल्या भारतातील हिंन्दी, व साऊथइंडियन गाण्यावरती आपले सर्व भारतीय हातात बिअर वगैरे घेऊन नाचून दाद देत होते. जेकब, पांडु, मायकल, सायमन, चार्ल्स, ज्युली, संगिता, मिनाक्षी, गिता, मार्शल व आपली सर्व बालमंडळी मनमुराद नाचून आनंद घेत होती. क्रुजची मजा काही न्यारीच. अशाप्रकारे भरपेट व मनसोक्त जेवन करून, क्रुजची मजा घेऊन रात्री ९.०० वाजता क्रुजच्या मुड मध्ये आपण हाॅटेल बॅंगकाॅक पॅलेस वरती पोहोचलो.


आज ३० मे २०१७. आपल्या टुरचा पाचवा दिवस व बॅंगकाॅक मधील दुसरा दिवस. "बॅंगकाॅक पॅलेस हाॅटेल" वरती सकाळचा ब्रेकफास्ट आटाेपून ठिक सात वाजता आपण बसने सफारी वर्ल्ड पाहण्यासाठी निघालो. बसमधील आजची नोव्हेनाची प्रार्थना Mrs. गिता मेदोडीकर हिने केली. साधारण पावणे आठच्या सुमारास आपण सफारी वर्ल्ड ला पोहोचलो. सफारी वर्ल्ड हि ४८०हून जास्त अेकर वरती बनवलेली पार्क आहे. ह्या पार्कचे दोन विभाग आहेत. एक सफारी पार्क व दुसरा मरीन सफारी. ह्या दोन्ही विभागाचे व लंच पकडून १८०० बाथ तिकीट आहे. सफारी वर्ल्ड हे १९८८ पासुन सुरू झालेली पार्क आहे. सफारी पार्क ही एक आोपन झू आहे. इथे निरनिराळे प्राणी मुक्तपणे फिरत असतात व पर्यटक बंदीस्त अशा बसमध्ये प्राणी आणि पक्षी पाहात संपूर्ण झू फिरत असतात. ह्या सफारी पार्कमध्ये झेब्रा, ऊंट, काळवीट, हरीण, चिंकारा, गाढव गेंडा, अस्वल, माकडे, रान गवे, तसेच अती हिंस्र प्राणी म्हणजे वाघ, सिंह, लांडगे वगैरे प्राणी कळपामध्ये अगदी जवळून पाहायला मिळततत तसेच शहाम्रुग, क्रेन (बगळे) पेलीकन (लांब चोचींचे बदकासारख् पक्षी), हेराॅन, व रंगीबेरंगी पोपटा सारखे परंतु मोठे पक्षी, मोर , वगैरे असे पक्षी ही फार आहेत. ह्या पार्क मध्ये मगरी - सुसर सुद्धा भरपूर पाहिल्या. बसमधून प्राणी पक्षी दर्शन करत, व जमेलतशी फोटोग्राफी करत ४५ मिनीटांनी आपण सफारी पार्क मधून बाहेर पडून मरीन पार्क मध्ये आलो. इथे आपण डाॅल्फीन शो, सी लायन शो, आेरंगउटन बाॅकसींग शो, स्पाय वाॅटर अॅक्शन शो, हाॅलीवुड काऊबाॅय स्टट शो वगैरे एका पाठोपाठ शो पाहीले. व नंतर ११.३० म्हणजेच थाय टाईम १.०० वाजता सफारी वर्ल्ड मधील इंडीयन रेस्टॅरेंट वरती लंच आटोपले. लंचनंतर एक वाजता निघुन आपण ठिक दोन वाजता बॅंगकाॅक पॅलेस हाॅटेलवरती पोहोचलो.


मरीन पार्क मध्ये आपण निरनिराळे शो पाहीले त्यापैकी काहींचा थोडक्यात आढावा......


सर्वप्रथम आपण ८.४५ वाजता "Orang Utan Boxing Show" पाहीला. ओरंगऊटान म्हणजे माकडाची एक प्रगत जात. ह्या शोची सुरूवात म्हणजे प्रेक्षकांच्या डोक्यावरून बबंधलेल्या दोन पॅरलल रोपला टांगून रंगीत कपडे परीधान केलेली दोन ओरंगऊटान एकदम स्पीडमध्ये स्टेजवरती एंट्री करतात. व नंतर शोमनच्या आदेशावरून निरनिराळे करमणुकीचे कार्यक्रम करतात. आणि शेवटी दोघांची मजेशीर बाॅक्सिंग दाखविली जाते.


ओरंगऊटान शो नंतर ९.३० वाजता आपण "Sea Lion Show" पाहीला. सी लायन हा एक समुद्र प्राणी असून त्याला मराठीत "समुद्र सिंह" म्हणतात. रॅगाने काळा व तेलसर असून जवळ जवळ पावने दोन मिटर लांब असतो. पोहण्यासाठी त्याला पोटाखाली पुढच्या बाजूने दोन व मागच्या बाजूने दोन असे पायवजा फ्लिपर असतात. एका तलावात सहा सी लायन असतात. वरती दहा ते बारा फूट उंचीवर टांगवीलेल् बाॅल शो मॅनच्या ईशा-यावर जंप मारून हालवीणे, पाण्यातील तरंगते बाॅल तोंडावरती अलगद बॅलेंस मध्ये घेऊन स्टेजवरती चढणे, तसेच बाॅल उडवत उडवत वरच्यावर ठेवणे, गळ्यात रींग घेऊन गळ्याभोवती गरगर फिरवणे, पाण्यात व स्टेजवरती मागच्या फ्लिपरवर ऊभे राहून डान्स करणे, पुढच्या फ्लिपरने टाळ्या वाजवून बीगहॅंड देणे वगैरे परफाॅरमन्स आपण पाहीले.


१०.२० वाजता आपण स्टंट शो मध्ये निरनिराळ्या प्रकारचे स्टंट्स व फायटींग्स,पाहील्या . त्यानंतर १२.००वाजता आपण डाॅल्फीन शो पाहीला. ह्या शो मध्ये तलावात सहा डाॅल्फीन असतात. शोमॅनच्या ईशा-यावर पाण्यात एकाच वेळी जम्प मारणे, गळ्यात गरगर रिंग फिरवणे, तोंडावरती बाॅल घेऊन बॅलेंस वरती उडवत उडवत नेने, ऊलटे पोहणे, रिंग मधून जम्प मारणे,पाण्यात शेपटीवर ऊभे राहणे, पाण्यातील दोन शोमॅनना अलगद बाहेर काढणे, शेपटीवर ऊभेराहून शोमॅनचे चुंबन घेणे. शोमॅनला तलावात पाठीवर घेऊन स्पीडने फिरवणे वगैरे सारखे मजेशीर शो आपण पाहीले. अशाप्रकारचे शो पाहून दोन वाजता आपण हाॅटेलवरती परतलो.

ठिक ५.३० pm ला आपण सर्वजण शाॅपिंग साठी बाहेर पडलो. प्रथमत: थोडीशी स्ट्रीट शाॅपिंग केली, काहीजणांनी बिगबाॅस च्या शाॅपमधून ब्रॅंडेड T-shirt घेतले. व नंतर सर्वजण खरेदीसाठी सुप्रसिद्ध "Indra Square Shopping Mall" मध्ये गेलो. इथे मात्र बरीच शाॅपिंग केली गेली. चाॅकलेट्स, चपला, ड्रेस, स्कुलबॅग्स, सुटकेस, शर्ट्स, पॅन्ट्स, टाॅप्स , कुर्ता, कानागळयातील वस्तु, वगैरे मटेरीयलची भरपूर खरेदी केली. व नंतर जवळच असलेल्या एका इंडियन रेस्टाॅरंट वरती डिनर घेऊन आपण १०.०० वाजता गोल्डन पॅलेस हाॅटेलवरती पोहोचलो.


आज ३१ मे २०१७ बुधवार. कालची मंगळवारची रात्र बॅंगकाॅक पॅलेस हाॅटेल वरती गुजारून, सकाळचा ब्रेकफास्ट हाॅटेल वर आटोपून भारतीय वेळ ६.१५ वाजता मलेशियाला जाण्यासाठी आपण बसने DMK International Airport, Bangkok (Don Mueang International Airport) ला निघालो. बस मधील आजची नोव्हेनाची प्रार्थना वेरोनिका डिमेलो हिने केली. सहा वाजता आपण एअरपोर्टला पोहोचलो. आपले फ्लाईट मलिंदो एअरलाईन्सचे होते. फ्लाईट नंबर OD 521 होते. चेकइन, सेक्युरीटी चेक वगैरे सोपस्कर आटोपून आपण टर्मिनल एक वर गेलो. आपला हा विमान प्रवास दोन तास दहा मिनीटाचा होता. थाय टाईम प्रमाणे ठिक ११.३० वाजता विमानाने टेकआॅफ घेतले व मलेशिया टाईम प्रमाणे ठिक तीन वाजता मलेशियातील "Kaula Lumpur International Airport" वर लॅंडींग झाले. मलेशिया हा थायलॅंड पेक्षा एक तासाने पुढे आहे म्हणजेच भारतापेक्षा अडीच तासाने पुढे आहे. बेल्टवरून आपआपल्या बॅगा कलेक्ट करून आपल्या तीन वाजता आपण पुत्राजया येथील Perdana Square ला आलो. येथे उंच टेकडीवर मलेशियन प्राईमिनीस्टरचे आॅफीस काॅम्प्लॅक्स आहे. हि एक इस्लामिक स्टाईलने बांधलेली पाच मजली ईमारत असून ह्या ईमारतीच १९९९मध्ये उद्घाटन झालेला आहे. तिथे जवळच "Putra Mosque" आहे. ह्या मशिदीचा डोम पिंक ग्रॅनाईट वापरून बनवलेला आहे. ह्या मशिदीत एका वेळी १५००० माणसे accommodate होऊ शकतात. ह्या मशिदीला Pink Mosque म्हणूनही संबोधीले जाते. जवळच Merdeka Flag Square आहे. तिथे दरवर्षी ३१ आॅगस्टला रात्री बारा वाजता मलेशियाचा झेंडा फडकवीला जातो. त्यानंतर आपण ३.३० वाजता जगप्रसिद्ध KL Tower ( kaula Lumpur Tower) पाहण्यासाठी गेलो. हा टाॅवर कौलालंपूरचा फेमस कम्युनिकेशन टाॅवर असून जगातील सातव्या क्रमांकाचा ऊंच टेलकम्युनिकेशन टाॅवर आहे. हा टाॅवर १९९५ मध्ये बांधिलेला असून टावरची ऊंची अॅंटेना धरून ४२१ मिटर आहे. वरती जाण्यासाठी लिफ्ट असून संपूर्ण सेक्युरीटी चेक करून एकेकाला आत सोडले जाते. वरून विस्तीर्ण असे कौलालंपूरचे द्रुष्य पाहण्याची मजा औरच होती. द्रुष्य पाहण्यासाठी वर ठिकठिकाणी दुर्बीणी बसविण्यात आलेल्या आहेत. K L Tower पाहून झाल्यानंतर मलेशिया टाईम प्रमाणे संध्याकाळी ७.४० वाजता आपण डिनर साठी "The Olive Tree Restaurant " वरती गेलो. योगायोगाने ह्या हाॅटेलचा मॅनेजर आपल्या गास गावातील होता. ओळख झाल्यानंतर सर्वांशी आपल्या कुपारी भाषेत बोलून, हसत खेळत वागत होता. त्याने सर्वांची जेवणाची व्यवस्था चांगल्याप्रकारे केली. त्याच्या भेटीमुळे सर्वांनाच आनंद झाला. जेवन झाल्यानंतर आपण ट्विनटाॅवर पाहण्यास गेलो. ह्या ट्विनटाॅवरला पेट्रोनास ट्विन टाॅवर म्हणतात. ह्या टाॅवरचे १९९६ मध्ये उद्घाटन झाले आहे. ह्या टाॅवरला ८८ मजले आहेत. १९९६ ते २००४ पर्यंत हे टाॅवर जगातील सर्वात ऊंच टाॅवर होते. ह्या टाॅवरची ऊंची ४५१.९ मिटर आहे. अशा ह्या Skyscraper (गगनचुंबी) टाॅवरची फोटोग्राफी करून आपण वस्तीसाठी "Pearl International Hotel" वरती रात्री ९.०० वाजता पोहोचलो. बसमधून बॅगा घेऊन , आपआपल्या रूमच्या चाव्या घेऊन आपण रूमवरती गेलो. Good Night.


जून ऊजाडला. आज जून २०१७ ची एक तारीख. आजचा दिवस हा टुरचा सातवा दिवस व मलेशियातील दुसरा दिवस. आपण क्वालालम्पुर city मध्ये आहेत. क्वालालम्पुर शहर हे मलेशियाचे राजधानी शहर आहे. मलेशियातील आपली पहीली रात्र "हाॅटेल पर्ल इंटरनॅशनल " वरती काढुन आपण सकाळचा ब्रेकफास्ट करून बस ठिक ६.३०वाजता " cocoa Boutique chocolate shop" कडे निघाली. बसमधील आजची नोव्हेनाची प्रार्थना मेरी डिमेलो हिने केली. कोका बोटीक शाॅपमध्ये निरनिराळ्या प्रकारची, निरनिराळ्या कॅटेगरीची, निरनिराळ्या स्वादाची व निरनिराळ्या आकाराची चाॅकलेट होती. तिथे सर्व प्रकारच्या चाॅकलेट बद्दल माहिती दिली जाते. ह्या शाॅप मध्ये सम्पलींग म्हणजे टेस्ट साठी चाॅकलेटचे फ्री सॅंपल दिले जातात. Durian, coconut chocolate tiramisu, coffee chocolate, Tongkat Ali. वगैरे अशी अनेक प्रकारची फेमस चाॅकलेटस् तीथे होती. आपण सर्वांनी तीथे भरपुर चाॅकलेटस् परचेस केली. Tongkat Ali हे महागडे चाॅकलेटची खरेदीसुद्धा आॅलमोस्ट सर्वांनी केली. नंतर आपण " Istana Nagara" हा किंग पॅलेस पाहीला. बरीच फोटोग्राफी करून आपण गेन्टींग स्काय वे केबल कार अनुभव enjoy करण्यासाठी गेलो. ह्या केबल कारचं


आज २/६/२०१७. आज शुक्रवार. "Hotel pearl international" वरती सकाळचा ब्रेकफास्ट करून, आपल्या बॅगा घेऊन, हाॅटेलला बाय बाय करून सकाळी मलेशियन टाईम प्रमाणे ७.३० वाजता आपण बसमधून *सिंगापूर* कडे निघालो. मलेशिया-सिंगापूर बाॅर्डरवरती पोहचल्यावर तीथे भारतीय वेळ ११.१५ ते ११.३५ पर्यंत "Restaurant Olive" मध्ये आपण लंच आटोपले. मलेशिया व सिंगापूर हे दोन्ही देश एका ब्रिजने (Causeway) जोडलेले आहेत. ह्या पुलाची लांबी १०५६ मिटर आहे. पुलाच्या एका बाजूने मलेशियातील Johor Bahru हे शहर असून दुस-या बाजूने सिंगापूर मधील Woodland शहर आहे. १९६५ मध्ये सिंगापूर मलेशिया सेपरेट झाल्या पासुन हा काॅजवे त्या दोन देशांची सरहद्द म्हणून मानण्यात आला आहे. तर अशा ह्या ब्रिजवरील मलेशिया साईडने आपला मलेशिया व्हिजा साधारण ११.३० पर्यंत स्टॅंपींग करून झाला . व काॅजवे वरून आपण सिंगापूर मध्ये प्रवेशलो. तिथे Q मध्ये ऊभे राहून १.३० pm पर्यंत सर्वांचे इमिग्रेशन झाले व ख-या अर्थाने आपण सिंगापूर मध्ये आलो. इमिग्रेशन झाल्यानंतर आपण Indian वेळेनुसार २.५० pm बसने सिंगापूर मधील "Hotel Pinnacle" वरती पोहोचलो. हाॅटेल वरील थाेड्या विश्रांती नंतर आपण बसने ५.४५ वाजता सिंगापूर रिवर ला बोट राईडींग करून संपूर्ण लाइटींग मध्ये सिंगापूर दर्शन केले व सिंगापुरची बोट मजा अनुभवीली. येताना इंडियन रेस्टाॅरंट वरती डिनर केले. रात्री १०.०० वाजता हाॅटेल वरती परतलो. हाॅटेल वरती आपल्या अंगाळी गावातील श्री पिटर लोबो ह्याचे चिरंजीव Mr Roystan आपल्याला खास भेटायला आले होते. तासभर ते आपणा सर्वाशी बोलत होते. फार बरे वाटले. हे दोघे भाऊ सिंगापूर मधील एक फेमस हाॅटेल " Hotel Marina Bay Sands" मध्ये कामाला आहेत. विशेष म्हणजे सिंगापूर टुर वरती आलेल्या आपल्या कडील प्रत्येक ग्रुप्सला ते भेटतात व मार्गदर्शनही करतात.


आज , ३/६/२०१७ शुक्रवार. टुरचा नऊ वा दिवस. मलेशिया टाईम आणि सिंगापुर टाईम सेम आहे. म्हणजेच इंडिया पेक्षा अडीच तास पुढे आहे. तर सिंगापुर टाईम प्रमाणे हाॅटेल पिनॅकल वर सकाळी ७.३० वेकअप काॅल, ८.३० ब्रेकफास्ट व ९.३० आपण सिंगापुर फ्लायर कडे निघालो व १०.०० वाजता तेथे पोहचलो. हा एक १६५ मिटर ऊंचीचा, आशियातील सर्वात ऊंच Giant wheel (पाळणा) असून ह्याचे opening 2008 मध्ये झालेले आहे. त्याला २८ एअरकंडीशन कॅपसुल्स (cabins) आहेत. प्रत्येक कॅप्सुल मध्ये २८ पॅसेंजर अॅकोमाॅडेट होतात. ह्या भव्य पाळण्यात बसुन उंचावरून सिंगापुर view बघितला. लय भारी. त्यानंतर १.१५ वाजता आपण "Bhandari's Saffron" ह्या वर्ल्ड फेमस रेस्टाॅरंट वरती बुफे लंच घेतले. हे एक जबरदस्त भव्य रेस्टीॅरंट असून थाय, चायनिज, इंडियन, पाकीस्तानी, काॅन्टीनेंटल, व्हेज, नाॅनव्हेज, ज्युस, कोल्ड ड्रिंक्स, सूप, केक, बेकरी आयटम, ड्रायफ्रुट्स, फ्रुटसॅलेड, जगातील निरनिराळे फ्रुट आिण बरेच काही आयटमचे काऊंटर होते. सेपरेट ड्रिंक्स बार सुध्दा होता. सर्वांनी मस्तपैकी ताव मारला. टुर वरील सर्वात भारी जेवण हेच होते. व एक चांगलाअनुभव सुद्धा होता. लंच आटोपल्या नंतर आपण S E A Aquarium पहायला गेलो. सॅन्टोसा आयलॅंड वरील रिसाॅर्ट वर्ल्ड मध्से असलेले जगातील सर्वात मोठे मच्छालय आहे. तिथे एक लाखाहून जास्त लहानमोठे मासे आहेत. मोठ मोठले शार्क मासेही आपणास पहायला मिळाले. 


Aquarium नंतर आपण केबल कारने Sentosa Merlion पाॅइंटला आलो. इथे येताना गफलत होऊन आपला सहा माणसाचा ग्रुप अलग स्टेशनवर उतरल्या मुळे miss झाला. थोडसं टेन्शन निर्माण झाले होते. पण काही वेळाने आपल्या जेकब , पांडु, सायमन, चार्ल्स , ज्युली वगैरे ॲलर्ट मंडळींनी त्यांना शोधून आणले. God is great. असो. आता Sentosa Merlion हा एक ३७ मिटर ऊंचीचा पुतळा असून ह्याचा वरील अर्धा भाग सिंहाचा (lion) असून खालचा अर्धा भाग माश्याचा (fish) आहे. Sentosa merlion हे सिंगापुर टुरीस्टचे मोठे attraction आहे. Merlion हे सिंगापुरचे एक Icon ( प्रतिमा) आहे. असे आयकॉन सिंगापुर मध्ये ठिकठिकाणी आहेत परंतु सर्वात ऊंच icon Sentosa Merlion हाच आहे. Sentosa Merlion समोर तुफान फोटोग्राफी करून जवळच असलेल्या "Archies" ह्या इंडियन रेस्टीॅरंट मध्ये *हरवलेली माणसं सापडल्याच्या आनंदात* भरपेट डिनरचा आस्वाद घेतला. डिनर नंतर फेमस लेसर शो पाहून रात्री हाॅटेल पिनॅकल वर परतलो.


आज ४ जून २०१७, रविवार . हा आपल्या टुरचा दहावा दिवस. सकाळी हाॅटेल पिनॅकल वरील ब्रेकफास्ट आटोपून आता आपण युनिव्हर्सल स्टुडीयो कडे निघालो आहोत. युनिव्ह्रर्सल स्टुडीओ हि एक हाॅलीवुड मुव्ही & थीम पार्क म्हणजेच मनोरंजन पार्क आहे. ह्या पार्कच्या एन्ट्रान्सलाच युनिव्हर्सल ग्लोब आहे. हा ग्लोब म्हणजे युनिव्हर्सल स्टुडीओ चा *लोगो* आहे. युनिव्हर्सल स्टुडीओचे ओपनींग १८ मार्च २०१० मध्ये झाले आहे. ह्या स्टुडीओने ४९ अेकर जागा व्यापलेली आहे. ह्या स्टुडीओत २१ Rides, 6 Roller costers, 2 Water Rides तसेच ३० रेस्टाॅरंट्स आणि २० रिटेल स्टोअर्स आहेत. गेटवरील बेहतरीन डान्स परफाॅर्मन्स पाहून आपण अगदी खुश होऊन गेलो. राईड्स मध्ये न्युयाॅर्क ट्रान्सफाॅर्मर राईड्स (3D Battle of Robot), Human vs Cylon ride, Ancient Egypt ride, enchanted Airways अशा एकाहून एक सुपर्ब राईड्स आहेत. काही ठराविक राईड्स ची मजा घेऊन आपण "गार्डन बाय द बे" बघण्यास गेलो. सिंगापुर बे एरीया मधील ही एक कलरफुल पार्क आहे. ह्या पार्क मध्ये रंगीबेरंगी फुले गहिवरून टाकणारी हिरवळ, ऊंच स्कायवाॅक, हिरवळीचे डोम असलेले रस्ते पाहून मन प्रसन्न झाल्याशिवाय राहात नाही. रात्री ९.०० वाजता "Sitara Restaurant " मध्ये डिनर घेऊन आपण हाॅटेल पिनॅकल वरती परतलो. दुसरा दिवस म्हणजे सोमवार ५/६/२०१७ हा आपल्या साठी खास राखुन ठेवलेला परचेसींग चा दिवस. सकाळी ब्रेकफास्ट नंतर ७ ते १२ ह्या वेळेत आपण सर्वांनी *मुस्ताफा* मार्केट मध्ये तुफान खरेदी केली. १२.०० वाजता "Kabab and curries" ह्या रेस्टीॅरंट वरती लंच आटापून आपल्या हाॅटेल वर पोहोचलो. हाॅटेल वरती चेकआऊट करून आपण बसने २.१५ वाजता सिंगापूर च्या च्यांगी एअरपोर्ट वरती पोहोचलो. बॅगेज चेकइन, सेक्युरीटी चेक वगैरे प्रोसीजर आटोपून आपण टर्मिनल दोन वरती गेलो. आपले विमान ७.१५ बाजताचे होते. आपल्याकडे भरपुर वेळ होता. आपल्यापैकी बहुतेकांनी ड्युटी फ्री शाॅप मध्ये जाऊन अलग अलग ब्रॅंडच्या व्हिस्की रमच्या व परफ्युम्स च्या बाटल्या खरेदी केल्या. आपल्या ए्अरइंडियाच्या विमानाने सिंगापूर टाईम प्रमाणे ७.१५ pm वाजता टेकआॅफ केले. आणि भारतीय वेळे प्रमाणे रात्री ९.४५ pm ला त्यांच दिवशी मुंबईला पोहोचलो. सिंगापूर मुंबई प्रवास हा पांच तास विस मिनीटांचा होता. बेल्ट वरून बॅगा कलेक्ट करून 11pm ला बाहेर आलो. आपल्यासाठी बस येऊन थांबलेली होती. आपण सर्व जण बसमध्ये बसल्यानंतर ठिक साडेअकराला बस निघाली. हा सुंदर सहवास संपत आल्याची खेदकारक जाणीव प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करू लागली होती.

आज मंगळवार दिनांक ६//६/२०१७ पहाटे १.३० am पर्यंत सर्व जण सुखरूप घरी पोहोचलो. Good Night.


मित्रौ, आपली थायलॅंड , मलेशिया आणि सिंगापुर टुर चांगल्या प्रकारे म्हणजे अगदी आनंदी आणि प्रसन्न वातावरणात आपण खुप Enjoy केली. टुरचे आयोजन एकंदरीत चांगलेच होते. Mr फ्रेडी कोलासो सर एक चांगले व अनुभवी मॅनेजर होते. त्यामुळे आपले सगळे प्रोग्रॅम वेळच्सा वेळी व ठरल्याप्रमाणे पार पडत गेले. आपल्यातही सर्व मंडळी समंजस, शांत आणि सहकार्य करणारी होती. मला वाटते टुर यशस्वी होण्यामागे हे एक सर्वात महत्त्वाचे कारण होते. आपण टुर वरती असताना ग्लॅमरचे सर्वेसर्वा Mr. Robin Sir हे त्यांच्या दुस-या ग्रुप बरोबर असुनसुद्धा सतत आपल्या काॅन्टॅक्ट मध्ये राहून विचारपुस करीत होते व अपडेट ठेवत होते . Mr. Barry Lopes हे सुद्धा WhatsApp वरती आपल्या संपर्कात होते. आपल्याला त्या त्या देशा विषयी वा पिकनिक पाॅईंट विषयी माहिती देणारे नियोजित टुर गाईड Mr. Barry, Mrs. नुरयानी आणि Mrs. पॅट्रीशिया ह्यानी चांगली व योग्य योग्य ती माहीती देईन आपल्या ज्ञानात भर घातली. वरील सर्व कारणांमुळे आपली टुर आठवणीत राहण्यासारखी झाली. म्हणून वरील सर्वांचे ऋण विसरता येणार नाही. असो.


टुर वरती असताना फ्रेडी सर नेहमी सांगायचे कि तुम्हा सर्वांच्या सहकार्याने टुर एकदम मजेत व टेंशन फ्री चाललेली आहे. आणि त्या खुशीत त्यांनी ग्लॅमर तर्फे इंडियाच पोहोचल्यावर एक पार्टी देण्याचेआश्वासन दिले. व त्याप्रमाणे ग्लॅमरने सर्वांना मॅसेज पाठवून शुक्रवार दिनांक ९/६/१७ रोजी आपले गेटटुगेदरचे LD Farm अर्नाळा येथे आयोजन केले. ठरल्याप्रमाणे आपण सर्वजण संध्याकाळी ७.४५ वाजता LD Farm वरती जमा झालो. ग्लॅमरने पार्टीची सर्व व्यवस्था LD वाले ॲड्र्यु लोपिस ह्याच्या कडे सोपविली होती. पार्टीसाठी त्याने १२kg चे बोकड आणले होते. बिअर, व्हीस्की, थम्सअप, स्प्राईट, सोडा वगैरेची व्यवस्था होती. सुरूवातीला गरमागरम सुप सव्ह्र करण्यात आला. डिप फ्राय चिकन, तंदुरी, चिली, कोलबी फ्राय, व सलाड होते. सर्वांनी त्रुप्त होईपर्यंत तृषा बुझविली. चहापान आटोपल्यानंतर आपण गरमागरम राईस, मटन मसाला व ब्रेडने जेवण घेतले. जेवणानंतर सर्वांनी आईस्क्रीम enjoy केले. L D वाल्यांची ऊत्तमस व्यवस्था व स्वादीस्ट प्रिपॅरेशन होते. शेवटी ज्युली डिमेलोने आपणा सर्वा तर्फे ग्लॅमरचे आभार मानले. रात्री ११.३० वाजता कार्यक्रम संपला व अशाप्रकारे आपल्या थायलॅंड , मलेशिया व सिंगापुर टुरची सांगतां झाली. 


आपल्या टुर विषयी वर केलेले सर्व लिखान आपली टुर सतत हसत खेळत ठेवणारी, स्व:ता नाचुन दुस-याला नाचायला लावणारी, सदा सर्वदा हसतमुख असणारी व गालावरती खळी असलेली Mrs. ज्युली चार्ल्स डिमेलो हिला मी अर्पण करीत आहे.


थॅंक्स. इथेच थांबतो.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013