“आग्नेसबाय नाबाद ७०” (२९/०६/२०२१)
आज २९ जून. आपल्या बायचा ७० वा वाढदिवस. बाय माझ्या पेक्षा दोन वर्षे अकरा महीने व तेवीस दिवसांनी मोठी. आपल्या बाबाला तीन भाऊ व पडईतली बाय हि एक बहीण. बाबा आपल्या बहीणीवर फार प्रेम करीत असे. पडईतली बाय बाबा पेक्षा तीन वर्षे तीन महीणे लहान. तसेच बाबाला आम्ही तीन मुले व एक मुलगी म्हणजेच आपली आग्नेस बाय. आग्नेसबाय ही बाबाची फार लाडकी. बाबा आग्नेसबायवर कधीही रागावत नसे. आम्हा तीन भावाची आग्नेसबाय हि एक बहीण म्हणून आम्ही तिच्यावर खुप प्रेम करतो. आग्नेसबायच्या घरी आमची प्रत्येकाची आठवड्यातून एकदा तरी फेरी असतेच असते. दादा व बंधू सुद्धा आमच्या सारखेच बायच्या घरी नेहमी जात असतात. थोडक्यात बाय हि सर्वांची लाडकी.
बाय म्हणजे आयुष्यातील गोड - कटू प्रसंगात पाठीशी उभी राहणारे धिराचे एक गाठोडे आहे. बहीण भावाचे नाते हे न उलगडणारे कोडे असते. ते राखीच्या धाग्याने घट्ट बांधिलेले असते. बहीण भावाचे नाते एकमेकाशिवाय अपूरे असते म्हणून ते सागराहूनही खोल असते. हे नाते नदीच्या प्रवाहासारखे असते. ते आयुष्यभर एकमेका सोबत राहणारे असते. ते अतूट असते. अशा ह्या नात्यात आम्हाला गुरफटून ठेवणारी आमची बाय आम्हाला अतिशय प्रिय आहे. बायचा हा ७० वा वाढदिवस तिला आनंदाचा जावा हि प्रार्थना. बायला आज वाढिवसाच्या भरभरून शुभेच्छा देताना ईश्वराने तीला पुढील उर्वरीत आयुष्य निरोगी, आनंदी व शांततामय द्यावे व कुटुबाच्या भरभराटीसाठी तिचे अतूट निस्वार्थी प्रेम व तिची प्रार्थना सतत त्यांच्या पाठीशी असावी हेच ईश्वराकडे साकडे.
संजू , ॲाल्वीन, अनिता व सुलभा (ज्युली) ह्यांचे प्रेम सतत तिच्यावर बरसावे. जसिका व स्विडल ह्या सुनांचं तिच्यावरील प्रेम या पुढेही असेच राहावे. रिसा, रिनी, ॲली व सिनेल तसेच साहील, सानिया, सियान हि नातवंड तिच्या केवेत वाढावीत, पणतू ब्रेट वर तिचा आशिर्वाद असावा. विल्सन, संजू (सिल्वेस्टर) ह्या जावयांचे प्रेम सतत वाढत राहावे, कुन्यातने व बायने म्हातार पणात एकमेकाची काठी(आधार) बनून राहावे. ह्या वयात एकमेकांचा आधार बनने व एकमेकांना धीर देणे हे फार गरजेचं आहे हे ध्यानात घ्यावे.
बायच्या एकंदरीत स्वभावावरून तिचा एक अलिखीत संदेश माझ्या मनावर कोरला गेला आहे तो म्हणजे “ शब्द जपूण वापरा व शब्द गोड वापरा म्हणजे नाती कधीच तुटणार नाहीत”.
बायला परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. बायबद्दल भरपूर काही लिहीता येईल. बाय ही घरच्याप्रमाणे माहेरच्या कुटुंबियांचाही आदर्श आहे. बाय आम्हा सर्वात तू मोठी म्हणून आम्ही तुजवर शुभेच्छांचा वर्षाव करतो, तू आम्हावर आशिर्वादांचा बर्षाव कर. 🌹
तुझा भाऊ
----समाप्त---/