“लुजान बाय मेरभाट/अर्नाळकर” (२२/१०/२०२१)
कळसु दमेल परिवाराच्या तिसऱ्या पिढीतील चार कन्या रत्ने म्हणजे झुज्या दमेलच्या दोन १) पावलीबाय जेलाडी/तावडी २) पडईबाय, लंगडीकाकाची मरीबाय कातरवाडी, व चिमा दमेलची लुजानबाय मेरभाट/अर्नाळा. पैकी तिन्ही मोठ्या कन्या देवाघरी गेलेल्या आहेत.
आज हे तिसऱ्या पिढीतील शेवटचं कन्यारत्न आपला ८५ वा वाढदिवस अगदी निरोगी स्थितीत साजरा करून ८६व्या वर्षात पदार्पण करीत आहे. म्हणूनच तू भुतकाळाचा दुवा व भविष्य काळाचा दिवा आहेस. लुजानबाय तुझे फार फार अभिनंदन व शंभरीची शृंखला न भंगता सहज पार व्हावी ह्या आम्हा संपूर्ण कळसू दमेल परिवाराच्या मनोकामना. तुम्हा चारही भगिनींचा जन्म आपल्या जुन्या घरी झालेला. तुम्ही चारही भगिनी एकत्र खेळल्या असाल , भांडल्या असाल. एकत्र हिंदोळ्यावर बसून झोके घेतले असाल.
तु सर्वात धाकटी म्हणजे सर्वांची तू लाडकी असशील. इथे मला एक गाणे सुचते ते म्हणजे “आपण हिंदोळ्यावर बैसू, आपण हिर वा साडा नेसू, आपण चौघ्या दिसू जशा पाठीच्या बहीणी”. लुजान बाय, तुमच्या वेळेला हे गाणे नक्कीच नसेल पण हे गाण तुम्हा बहीणींना परफेक्ट सूट होते. त्यावेळी हे गाणे नसेल. पण त्याला मिळतं जुळतं एखादे गाणे नक्कीच तुम्ही बोलत असाल. असो.
तर लुजानबाय, ह्या वयातही अंगण झाडताना, टगर खुडताना बघून आमचा उर भरून येतो. ॲंड्रयू व तोमास तसेच दोन्ही सुना मेरू+मेरू तुझी उत्तम सेवा करतात हे पाहून आमची मने आनंदाने भरून येतात. ज्या घरात वडीलधाऱ्यांचा आदर होतो, ते घर म्हणजे स्वर्ग असते. तुझे घरही स्वर्गा सारखेच आहे. तुझी नातवंडेही फार सेवा करतात हे सर्व पाहून तू नक्कीच वयाची शंभरी पार करणार ह्यात वाद नाही. तुला नेहमी येऊन भटणे आम्हाला शक्य होत नसले तरी अंद्रू -तोमास पाठवत असलेले फोटो पाहून आम्हाला प्रत्यक्ष भेटीचा अनुभव येत असतो. बाकी वयोमाना परत्वे तक्रारी सोडल्यास तुझी स्मृती, उत्साह व जगण्यातील रस अजूनही टिकून आहे व पुढेही टिकून राहावा हि प्रार्थना. धन्यवाद.
----समाप्त---/