///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

 आईचा महीमा फार वर्णीण्यात आला आहे. “स्वामी तिन्ही जगाचा आई वीना भिकारी”, “आई म्हणजे देवाचे प्रतिरूप”, “तुझ्या सारखी आई असता पडेल आम्हा कसली वान”.

आजची ही आई म्हणजे फादर रेन्वीक दाबरे ह्यांची म्म्मी. तिला सर्व मुले प्रेमाणे दादी ह्या नावाने हाक मारीत असत. मी सुध्दा तिला दादी म्हणूनच संबोधित असे. दादी फार प्रेमळ, धार्मिक, सुस्वभावी, व सुसंस्कारीत होती. फादर रेन्वीक वरून तीची ओळख झाली होती. व त्यावरून दादीकडे आमचे जाणेयेणे होते. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे आमचा घरोबा निर्माण झाला होता. तिला पाच अपत्ये (तीन मुली व दोन मुलगे) तरीही ती मुलींची भुकेली होती आणि म्हणूनच कि काय ती वेरोनला मुली प्रमाणे मानत होती. आममचं त्या बाजूने ब-याच वेळा जाणं होत असे. तर अशावेळी हमखास दादीकडे जाणं व्हायचं. तेव्हा दादी निर्मळ नाक्यावर जाऊन आमच्या साठी गरमागरम पॅटीस घेऊन यायची. माझ्यासाठी न सांगतां बिन साखरेचा चहा ती बनवीत असे. निघताना ती आम्हाला पिशवीत पिकलेली भुरीची केळे, कधी वेलचीची, कधी लांबदुधी (सकेनी), कधी पालक तर कधी बिस्कीटाचा पुडा असं काहीनकाही प्रेमा पोटी देत असे. एप्रिल- मे मधे कांद्याच्या सिझनला तीने आम्हाला दोन तीन वर्षे कांद्याच्या माळी सुध्दा पाठवल्या. म्हणून दादीशी आमचे जिव्हाळ्याचा नाते होते. तर अशी ही दादी फादर रेन्वीकची म्म्मी व सि. आशालता आणि सि. मार्गारेटा ह्यांची बहीण. एका धार्मिक कुटुंबात वाढलेल्या व तोच वारसा आपल्या स्वताच्या कुटुंबात नेलेल्या दादी दिनांक 16 ॲागस्ट 20 अल्पशा आजाराच्या निमित्ताने देवाघरी निघून गेल्या. मृत्यु समयी दादीचे वय केवळ 68 वर्षे होतं. दादीचं भरल्या घरातून असं अचानक निघून जाणे हे थोडं लवकरच झाले.

दादी म्हणजे सुसंस्काराचं एक भंडार होतं. आदर्शाचं एक विद्यालय होतं. प्रत्येक अपयशा मागे ऊभी असते ती आई. तोही अनुभव तिने घेतला. “द:ख हे प्रत्येकाकडे असते, म्हणून कोणाकडेही जाताना आनंद घेऊन जा”. असा आपल्या कुटुंबाला आदर्शवत सल्ला देणे-या दादीला आमचा कोटी कोटी प्रणाम व हिच तीला आमची श्रद्धांजली. 🙏🏿🙏🏿🙏🏿


@@@ पॅट्रीक डिमेलो @@@

         दोनतलाव-वटार शाळा


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013