“गंगूबाय-गास” 24/06/2022
झुज्या दमेल, दोनतलाव ह्यांना दोन बायकाः १) मनी, आडल्यातील. हिच्या पासून झालेली मुले पावलीबाय व बाबू.
—-
मनीआजीच्या मृत्यु नंतर झुज्या दमेलचे दुसरे लग्न शिजूबय निर्मळ -नवाळे गावातील हिच्याशी ठरले. पण…….
—
शिजूचं अगोदर लग्न गासातील लहानसरगोडीतील लुद्रीक कुटुंबात झालं होतं. शिजूला तीथे एक मुलगी झाल्यानंतर (हि मुलगी म्हणजे आपली गंगूबाय उर्फ दुमी) शिजूबयचे यजमान वारले. झुज्या दमेलने शिजू बयशी लग्न करून मोठ्या मनाने गंगूबायला आपली मुलगी मानून गंगूबायचा स्वीकारही केला. पण घरून परिस्थिती चांगली असल्यामुळे गंगूबायच्या घरच्यांनी तिला तिथेच ठेवून घ्यायचा निर्णय घेतला. तरीपण झुज्या दमेलने गंगूबायला आपल्या मुलीप्रमाणेच वागवले. गंगूबायचे आपल्या हक्काची असे दोन घरे झाली. एक गासातील लुद्रीक कुटुंब व दुसरे दोनतलाव येथील झुज्या दमेलचे कुटुंब. आई दोनतलावकर झाली होती व झुज्या दमेल कडून सख्ख्या बापा सारखीच वागणूक मिळत असल्यामुळे गंगूबाय दोनतलावला सुद्धा राहात असे. गंगूबायच्या प्रेमळ स्वभावामुळे जोडलेल्या सहा घराच्या लांब्या बारीत गंगूबाय सगळ्यांचीच आवडती झाली होती. हिंदोळ्यात बसून त्या वेळी घडलेल्या गास गावातील काही दुदैवी कहाण्या ऐकवीत असे. गंगूबायच्या वार्ता ऐकण्यासाठी आम्हा मुलांना हिंदोळ्या-माशित जागा अपूरी पडत असे.
—-
पुढे शिजूबय व झुज्या दमेल ह्यांना चार मुले झाली. १)शिलू दमेल, २) इनूस दमेल, ३) आलेस दमेल व ४) कल्लारबाय (पडई बाय)
——
गंगूबायचं खरं नाव डॅाम्णिका (दुमी). उपवर झाल्यानंतर गंगूबायचे लग्न गासातील ओलोटी आळीतील मनवेल (मनू) डिमेलो ह्या उपवर मुलाशी झालं. ह्या लग्नाला झुज्या दमेलने चांगला हातभार लावला होता. आपले संपूर्ण कळसू दमेल परीवार ह्या लग्नात सहभागी झाला होता.
——
लग्ना नंतर गॅगूबायला सहा मुले झाली. (दोन मुलगे व चार मुली. एकूण सहाजणे.
👇🏿
१)बाल्याबाबा (झुज्या) मनवेल डिमेलो. पत्नीचे नाव - बाजी , मुलाचे नाव -राजू , व मुलीचे नाव - सांतान
—-
२)पावल्याबाबा उर्फ पावलू डिमेलो. पत्नीचे नाव दुमी.मुलाचे नाव-विल्सन. पावल्या बाबाच्या मुलीचे नाव- डायना.
——-
३)स्व. सांतानबाय फरसू फरगोज गास.
——
४)इस्पात (अपीबाय), घोन्साल्विस, मोतआळी. हीचे यजमान- जोसेफ (झुज्या) घोन्साल्विस, मोत आळी.
हिला तीन मुली- बना (बेर्नेदित), शैला व संगिता.
——-
५)शिजूबाय, भुईगाव (शिजू हे गंगूबायच्या आईचे नाव तिला देण्यात आले होते. म्हणजेच झुज्या दमेलची दुसरी पत्नी). शिजूबाय भुईगाव, एखादआळी. हिच्या यजमानाचे नाव- निकोलाव व मुलाची नावे - पास्कोल आणि संजू.
——-
६) रोजी (रोजीबाय) फरगोज. मोठीसरगोडी. हिचे यजमान लॅारेन्स फरगोज.
ह्यांना दोन मुलगे व एक मुलगी (जॅार्ज, स्टिफन व सेलिन)
——-
गंगूबायचे तसेच शिलूबाबा, इनूबाबा, आल्याबाबा व पडईबाय ह्यांचे मामाकड (आजोळ) निर्मळ -नवाळा येथील दालमेत घराण्यात होते. गंगूबायचे आपल्या दोनतलाव दमेल घराण्यावर भरपूर प्रेम होते. ती नेहमी आपल्या घरी येत असे मात्र येताना रिकाम्या हाताने ती कधी येत नसे. टॅामेटोच्या सिजन मधे ती टोपलीभर टॅामेटो घेऊन येत असे व सर्व कुटुंबात वाटप करीत असे. एप्रिल-मे मध्ये ती मिठाचे पुडके बनवून आणून आपल्या प्रत्येक कुटुंबात देत असे. पावसाळयात ती चवदार असे कुर्ला मासे आणून आपल्या कुटुंबात वाटीत असे. कधी भोंगाफाईट वांगी तर कधी निर निराळ्या पालेभाजीच्या जुड्या आणत असे. गंगूबाय आपल्या पडईबाय व जनाबाय नांदान ह्यांच्याघरी सुद्धा जात असे. अशा ह्या गंगूबायचे नाव आज कळसू दमेलच्या पाचव्या पिढीच्या ओठावर न राहीले तरच नवल. गंगूबाय प्रमाणेच तिची मुले विशेषतः
बाल्याबाबा, पावल्याबाबा आणि रोजीबाय हे अजूनही आपल्या घरी येतात. दुखाःत व लग्न कार्यात ते आवर्जून येतात.
गंगूबाय म्हणजे गासातील आमची एक बाय, पण ती नेमकी कोण? तिची मुले किती? आमचं तिच्याशी नक्की नातं काय होतं? हा सर्व इतिहास सर्वांना ज्ञात व्हावा हा या लिखाणा मागचा उद्देश.
“एक आदर्श मुलगी, एक आदर्श पत्नी, एक आदर्श आई आणि एक आदर्श आजी ह्याचा सुंदर मिलाप म्हणजे आमची गॅगुबाय उर्फ दुमिबाय”
🙏🏿
////पॅट्रीक डिमेलो////
दोनतलाव-पिपरी