//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023
आज बुधवार 21 जुन 2023. बरोबर पन्नास वर्षा पूर्वी आजच्याच तारखेला म्हणजे 21 जुन 1973 (गुरूवार) नंदाखाल मधील दोनतलाव, येथील नारोळ विभागातील एका बेड्याला रात्री 11.15pm च्या सुमारास अचानक आग लागली. गावात हाहाःकार माजला. हे बेडे शेंडूबाबा, झ्यावबाबा व बस्त्याव बाबा ह्या कुटुंबियांचे होते. गावात हे बेडे सर्वात मोठे होते. ह्या बेड्याचे विशेष म्हणजे ह्या बेड्याच्या बांधकामासाठी चुना माती व गुळाचा वापर करण्यात आला होता. ह्या बेड्याचा दरवाजा सागवान लाकडाचा होता व तो भरीव नक्षीकाम व कलाकुसरीने मढवलेला होता. तसेच हा दरवाजा 17 ते 20 फुट उंच व 12 ते 14 फुट रुंद असा भव्य व स्पेक्टॅक्यूलर होता. आगाशितील फडक्याच्या वाडयाच्या दरवाजा सारखा राजेशाही असाच होता. बेडेही अवाढव्य असल्यामुळे तो त्या बेड्याला शोभून दिसत होता. ऐकीव गोष्ट अशी कि ह्या कुटूंबियांचा एक पुर्वज “कतू दमेल” (सिनियर) ह्यांचा आगाशी भाटीबंदर येथे पळीचा म्हणजे लायसन्सचा धंदा होता. त्यावेळेला त्या बंदरावर आलेला हा भव्य दरवाजा कतू दमेलच्या नजरेत भरला व आपल्या ओळखीचा फायदा घेऊन तो दरवाजा त्याने मिळवला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा दरवाजा बेड्याला लागलेल्या आगीत भस्मसात झाला.
त्यावेळी गावात दुधदुभत्याचा, व शेती वाडीचा मुख्य धंदा असल्यामुळे गुरांना पावसाळ्यात खाण्यासाठी चारा म्हणून पेंढा -गवत भरून ठेवावा लागत होता. म्हणून गोठ्याच्या जवळपास बेडी असत. ह्या बेड्याला काही लोक पडाळ असेही म्हणत. दोनतलाव गावात वरील बेड्या व्यतिरिक्त बंगल्यावाले कुटुंबिय, देगुदमेल कुटुंबिय, झुज्या दमेल कुटुंबिय, अतानकाका कुटुंबिय, बाबूशेट कुटुंबिय, मन्याबाबा कुटुंबिय, नयाघरचे कुटुंबिय,भोळ्याकाका कुटुंबिय ह्यांच्या मोठमोठ्या बेड्या व्यतिरिक्त गावात अनेकांची बरीच छोटी छोटी बेडेही होती. ह्या बेड्यांचा उपयोग फक्त गवत-पेंढ्या साठी न करता, पावसाळयात चुल्हीत पेटवण्या साठी लाकडं व पेटवान म्हणून झावळ्याच्या पात्या भरून ठेवत. तसेच पावसाळ्या साठी भरलेले पापड, सुकेबोंबील, कोलिंब, मुंड्यातले आंबे, खारे, सुकट, लोणचे, वगैरेचे डबे सुद्धा ठेवण्यासाठी ह्या बेड्याचा उपयोग होत असे.
ह्यावेळी सुद्धा गावातील हि सर्व बेडे पावसाळयात गुरांची सोय म्हणून पेंढा, गवत, गवताचे गठ्ठे ह्यांनी फुल भरलेली होती. त्यामुळे आग पसरून प्रथमता ह्या बेड्याना आग लागून संपूर्ण गाव पेटण्याची भिती निर्माण झाली होती. आगेच्या भडकलेल्या ज्वाला आजूबाजूच्या गावांतील लोकांना दिसत होत्या. बेड्याची मॅंगलोरी कौले आगीमुळे तापून तडतड आवाज करून फुटत होती. वासे पेटून खाली कोसळून पडत होते. खबरदारीचा उपाय म्हणून नंदाखाल चर्चचे घाट वाजवण्यात आले. बातमी नंदाखाल व्यतिरिक्त इतर पॅरीश व अन्यजाती धर्मात पसरली. भराभर लोक जमा झाले. प्रथमता लहान तलावातून साखळी पद्दतीने लोक उभेराहून घरातील भांडी, पोहरे, बादल्या ह्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न झाला. गावातील सर्व जण अगदी घाबरून गेले होते. पुरूष मंडळी आग विझवण्यास गेले होते तर बायका मुले पोत्यात आपला दाग दागीना, पैसा व अमूल्य वस्तू घेऊन रस्त्यावर उतरून रोजरीची प्रार्थना करू लागले होते. गोठ्यातील म्हशी व कोंबड्या बाहेर सोडण्यात आल्या होत्या. आग शमण्याची शक्यता धुसर वाटू लागली. त्यावेळी आपले समाजकार्यकर्ते इनूस रुमाव हे वसई पंचायत समितीचे सदस्य होते. त्यांनी विरारला ताराबाई वर्तकशी संपर्क करून ठाण्यावरून बंब मागवला. बंब कर्मचाऱ्यांनी पाण्याचा तुफान मारा करून आग आटोक्यात आणून विझवली गेली. ताराबाई वर्तक गावात जातीने हजर राहिल्या व गावकऱ्यांना धीर दिला. आग विझली, बेडे भस्मसात झाले पण संपूर्ण गाव मात्र वाचला. जिव भांड्यात पडला. तो दिवस मात्र दोनतलावच्या इतिहासात काळ्याकुट्ट अक्षराने लिहीला गेला. हाच तो जवतळ करांचा काळा दिवस.
आता हि आग कशामुळे लागली ह्याचा निष्कर्ष असा निघू शकतो की आग लागण्याची अनेक कारणे असतात. त्यात एक कारण म्हणजे Spontaneous combustion (स्पॅांटॅनियस कम्बशन)
म्हणजेच अचानक किंवा उत्स्फुर्तपणे किंवा Autoignition ने आग लागण्याची शक्यता असते. जसे सुखे गवत किंवा पेंढा काही कारणास्तव ओला झाला कि काही दिवसांनी त्यात आतल्या भागात फंगस वा बुरशी तयार होते म्हणजेच बॅक्टेरीया वा जिवानू तयार होतात. व जिवानूच्या वाढीबरोबर तपमान ॲक्यूम्यूलेट होत जाऊन वाढत-वाढत जाते. व नंतर विशिष्…
[10:31, 2/29/2024] Rajan Dada: 22/09/2013
श्रीयूत बावतीस पेडीकर सर यास,
आपला “दिंडा कुरेल यांची वंशावळ” व त्याला 200 वर्षाच्या पूर्व संदर्भाची जोड देऊन जो लेख प्रसिद्ध केला आहे त्याला तोड नाही. ऐतिहासिक ज्ञानाच्या झालरीने मढवून एक परीपूर्ण भरलेला संग्रहीत घडा आम्हापुढे रिक्त केला आहे. ह्या बाबतीत वाचा, वेचा आणि साठवा एवढेच म्हणता येईल. आपण केलेल्या जवळजवळ २०० वर्षा पासुनचा दिंडा कुरेल ते राजूशेट-जेम्सशेट यांच्या नातवंडा पर्यंतची वंशावळीतील नावे सुंदर व दुर्मिळ फोटो सहीत आम्हापुढे ठेवलेली आहेत त्याला तोड नाही. अत्यंत मेहनतीच्या व जिकरीच्या कामांची धुरा तुम्ही आपल्या खांद्यावर सहज उचललेली आहे व उचललेलं धनुष्य खंबीर पणे पेललं आहे. आपलं लिखान सत्त्यावर आधारित आहे म्हणून स्तुत्य आहे. त्याला प्रामाणिक पणाची धार आहे. तसेच त्या लिखाणात अहंकाराचा अभाव दिसून येतो. म्हणून हे लिखान कमालीचे झालेले आहे. हे नक्कीच येऱ्यागबाळ्याचं काम नव्हे.
माणसाच्या हृदयाशी हृदय जोडण्याचं काम ह्या कुटुंबियानी केलेलं आहे. सच्चाई, प्रामाणिकपणा व शालीनता ह्याद्वारे ते माणसाचे माणसाशी नाते निर्माण करीत असत. समाजसेवेचे बाळकडू त्यांच्या रक्तातच भिनलेले आहे.
देवळाची घंटा ही त्याच्या धर्मदाय औदार्यातूनच प्राप्त झाली आहे. हि धंटा समाजाच्या व दुरवर अशा परिसरातील लोकांच्या दैनंदिन जिवनातील दिनचर्येचा व दिनक्रमेचा जणू एक भागच होती. ह्या घंटेवर कोरलेले “दिंडा कुरेल” हे नाव स्पष्टपणे वाचता येते.
पोप महाशयाच्या भेटी साठी केलेला रोमचा प्रवास व वसई विभाग पुनच्छ मुबई धर्मप्रांतात विलीन करण्यासाठी पोपच्या राजदूताला भेटण्या करीता केलेला श्रीलंकेचा यशस्वी प्रवास हे स्मरणात ठेवाव्या अशाच घटणा आहेत. भव्य, महाल जोगा बंगला, मॅंगलोरी कौले व लाकडाचा व्यापार, केळ्याच्या वखारी , हे त्याच्या श्रीमंतीचे लक्षण. महान व्यक्तीचे वय मोजण्याचं श्री. म. माटे यांचे तंत्र हुबेहूब दिंडा कुरेलला लागू होते.
इतिश्री
🙏🏿
//// पॅट्रीक डिमेलो ////
फलश्रुती
दोनतलाव-पिपरी