आपली सिस्टर -शिशीनबाय (२४/१२/२०१९)

 धार्मिक, पापभीरू, सज्जन, प्रेमळ, दयाळू, मायाळू अशा अनेक ऊपाद्द्या कमी पडतील असं एक व्यक्तिमत्व म्हणजे आपली सिस्टरबाय. कळसु दमेल कुटुंबीयांचे श्रद्धास्थान व एक आदर्श म्हणजे सिस्टर शिशीनबाय. शिशीनबाय बद्दल कितीही लिहीलं तरी ती माहीती पूर्ण अशी होणार नाही. कळसु दमेल कुटुंबातील नवीन पीढीला शिशीनबाय बद्दल काही माहीती असावी म्हणून हा प्रयत्न. 


पिलीदादय व नाना ह्यांची जेष्ठ कन्या म्हणजे सिस्टरबाय. 24 आॅक्टोबर 1943 हा तीचा जन्मदिवस. आपली आई पिली ही फार धार्मिक. आपल्या आईला ती पिली ह्या नावानेच संबोधीत असे. पिली तीला लहान असताना आपल्या बरोबर पिपरी, आडाभाट वाडीत बरोबर नेत असे. शिपणे करताना पिली तीला देवधर्माच्या व फादर सिस्टरांच्या सेवा कार्या बद्दलच्या गोष्टी सांगत असे. केवळ पहीली-दुसरीत असताना त्या वेळच्या प्रथेप्रमाणे आपल्या वडील मंडळींनी तीचे सोयरीक जुळवण्यासाठी एके ठिकाणी शब्दही दिला होता. एकदा पिलीदादय लाडक्या शिशीन ला घेऊन भादव्याची रजा म्हणून तिच्या माहेरी(मशादकडे) गेल्या होत्या. तिथे असताना एके दिवशी शब्द दिलेल्या ठिकाणची मंडळी शिशीन बायच्या नावाने संदाव (हंदाव) घेऊन आले. पण पिलीदायला एवढ्या लवकर सोयरीक मान्य नव्हते. मुलीने शिकावं हि तीची ईच्छा होती. पिलीदादयने तो संदाव न स्विकारता परत पाठवला. पुढे आठवी-नववीत असताना एके दिवशी शिशीन बायचे काही मुलीबरोबर नंदाखाल काॅन्वेंटच्या चॅपेल मधे जाणे झाले. चॅपेलमधे हातात रोजरी घेऊन प्रार्थना करताना सिस्टरांना पाहीले आणि तेव्हा पासुन शिशीनबायचे मन प्रार्थना आणि सेवाकार्याकडे झुकू लागले. पुढे दहावीत असताना आगाशी कोन्वेंट मधे एकदा रिट्रीटचा योग आला व मन एका निच्छयाकडे झुकले. अकरावीत असताना आॅगस्ट 1961 ते मार्च 1962 पर्यंत मास्तरकाकांच्या परवानगीने इंग्रजी शिकण्यासाठी शिशीनबाय नंदाखाल काॅन्वेंट मध्ये राहू लागली. अकरावीच्या वर्गात शिशीनबाय बरोबर बाबीबाई, मेरीबाई व डहाणूची माॅनिका अशा चार विद्द्यार्थीनी व बारा विद्द्यार्थी असे मिळून एकूण सोळा विद्द्यार्थी होते.


ह्या SSC बॅचचे विशेष म्हणजे ह्या सोळा विद्द्यार्थ्यात चार फादर तर दोन सिस्टर झाल्या. 1962 मध्ये शिशीनबाय SSC पास झाली. आपल्या दोनतलाव गावातील SSC झालेली पहीली मुलगी म्हणजे शिशीन बाय. अशातच शिशीनबायचा धार्मिक कल पाहून त्यावेळचे प्रिन्सीपल फा. सायमन डिसोजा ह्यांनी शिशीनबायला भेटण्यासाठी बोलाविले व मुंबईतील चर्चगेट येथील वुड-हाऊस काॅन्वेंट मधे “Poor sisters of our lady” ह्या संस्थेमधे सेवाकार्य करण्यासाठी व्रतस्थांची फार जरुरी आहे म्हणून त्या संस्थेत जाॅईन व्हायचा सल्ला दिला. फादरांनी मास्तरकाकांशीही त्याबाबतीत चर्चा केली व शिशीनबायला त्या संस्थेत दाखल होण्यास मास्तरकाकांनी परवानगी दिली. अशाप्रकारे शिशीनबाय त्या संस्थेत जाॅईन झाल्या. तिथे शिक्षणाबरोबरच वयोवृध्द व आजारी फादर- सिस्टरांची सेवा त्या करीत होत्या. सप्टेंबर 1964 मधे तिला गोरेगाव येथे कपडे बहाल करण्यात आले. ह्या विधीला Vastation म्हणतात. ह्या विधीसाठी घरातील मोठ्या मंडळीबरोबर आम्ही बच्चे कंपनी सुध्दा गोरेगावला गेलो होतो. मलावाटते की लुईस अण्णा कडे त्याचा फोटोही आहे. पंधरा सप्टेंबर हा दु:खी माऊलीचा सण. 1966 मधे ह्या सणाच्या दिवशी शिशीनबायला पहीले व्रत देण्यात आले आणि शिशीनबाय व्रतस्थ झाल्या. पुढे 1972 पर्यंत त्यांना सलग सहा वर्षे व्रत देण्यात आली. दोनतलाव गावातील देवाच्या मळ्यात काम करणारी ती पहीली धर्मभगीनी ठरली.दरम्यान राज भवन Govt. School मध्ये सब्स्टीट्यूट टिचर म्हणून काम केले. वुड-हाऊस वरून अंधेरी, बॅन्ड्रा, औरंगाबाद , अमरावती(यवतमाळ), भोपाळ, गोवा व वसई येथे त्यांच्या बदली होत राहिल्या. आपल्या व्रतस्थ जीवनातक्लेर्जी होम मधील सेवेबरोबर स्कुल टिचर चा जाॅब त्या करीत होत्या. चकाला येथे झोपडपट्टीतल्या मुलांचे त्या क्लास सुद्धा घेत होत्या. एप्रिल 2002 मध्ये त्या रिटायर्ड झाल्या. सध्या अंधेरी येथील काॅन्वेंट मधे राहून संडे-स्कुल , मुलगामी प्रबोधन, फस्ट कम्युनियनची तयारी वगैरे निरनिराळी कार्य त्या करीत असतात. यवतमाळला असताना एकदा त्यांच्या शाळेवर रात्री दगडफेक हाेऊन छपराचे आणि क्राॅसचे नुकसान करण्यात आले होते. तसेच अंधेरी येथील डिवाईन स्कुलमधे त्या टिचर असताना एक सरदार फॅमिली शिशीनबायच्या कार्यावर खुश होऊन संस्थेला दान देत होते. त्यांनी शिशीनबायशी मित्रत्वाचे नाते जपले होते. व सोदाडातील कोणत्यातरी एका कार्यक्रमाला ती फॅमिली ऊपस्थित राहीली होती. शेवटी शिशीनबाय म्हणतात कि “मनात देव ठेवून सेवाकार्य करणे हेच माझे व्रत व हेच माझे ध्येय”


अशा आमच्या या व्रतस्थ सिस्टर बहीणीला आमचा विनम्र दंडवत.


----समाप्त---/

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013