आपली काकबय (०६/०३/२०२०)

 तर मंडळी, आपले आद्द्य पुरुष कळसु दमेल ह्यांना पाच अपत्ये होती. तीन मुले व दोन मुली. तीन मुलात पहिला झुज्या दमेल (टोकर झुज्या), दुसरा झ्याव दमेल (लंगडी काका), व तीसरा मुलगा चिमा दमेल. तसेच दोन मुली पैकी एक पडईत दिली होती व दुसरी सांबोडीत दिली होती. म्हणजेच सांबोडीतले आपले भाचे शेंडूबाबा ह्याच्या मातोश्री. हे शेंडूबाबा म्हणजे आपल्या कुटुंबीया प्रमाणेच एक उंच व धिप्पाड व्यक्तीमत्व, ते नेहमी आपल्या घरी येत असत. आपल्या मामा कुटुंबियावर त्यांचे अपार प्रेम होते. आम्ही त्यांना अगदी जवळून पाहीलेले आहे. तसेच कळसु दमेल ह्यांना एक बहीण होती. तीला कातरवाडीत वडाखाली दिले होते. तिला दोन मुले. एक ईशाबाबा व दुसरे शिलुबाबा. ईशाबाबा सुद्धा त्यावेळी आपल्या घरी येत असे. आम्ही ईशाबाबालाही पाहीलेले आहे.  


तर आपले आजोबा झ्याव दमेल (लंगडीकाका )ह्याच्या पत्नी म्हणजेच आपली काकबय. काकबयचे खरे नाव अनिबाई. आम्ही पाहीलेली काकबय म्हणजे एक पंच्याहत्तरी क्राॅस केलेली, कमरेत वाकलेली, सुंदर, गोरी त्वचा असलेली म्हातारी व विधवा आजी. काकबय स्वच्छतेच्या बाबतीत नंबर एक होती. अगदी टापटीप राहत असे. आपल्या जुन्याघरच्या ओसरीत तीची खाट असे. काकबय स्वभावाने फार भोळी होती. घरातील सर्व लहान थोरावर ती फार प्रेम करायची. तिच्या बिछान्यावर नेहमी शुभ्र पांढरा चादर असे. हाॅस्पिटलमधे जसा पेशंटसाठी नवा बेड तयार केला जातो अगदी तसाच काकबयचा बेड नुकताच तयार केल्यासारखा वाटत असे. काकबय आपल्या आल्याबाबाकडे राहात असे. आल्याबाबावर तीचे पुत्रवत प्रेम होते. काकबय हि मिनेज घराण्यातील पारू मिनेज (अंतोन मिनेजचे वडील) ह्यांची सावत्र बहीण.  


पारू मिनेज ह्यांची ओळख म्हणजे त्यांची बायको ही आपल्या तांबडी बयची बहीण म्हणजेच आपल्या सर्वांची दुमी मावशी. काकबयला एकुलती एक मुलगी होती. तिचे नाव मरीबाय. लग्न होऊन कातरवाडीतील दमेल कुटुंबात ती गेली होती. शिलू दमेल, संज्याव बाबा व बावतीस आप्पा हि तीचे तीन मुले. तसेच रोजीबाय सांबोडी, तेरू बाय दोनतलाव व अतीबाय रूमाव हया तीच्या तीन लेकी. हि सर्व मंडळी म्हणजे आपल्या कळसु दमेल कुटुंबीयाचे भाचे व भाच्या अर्थातच काकबयची नातवंडे होत. हे आपल्या काकबयला म्हणजेच त्यांच्या मामरच्या बयला भेटण्यासीठी आपल्या घरी नेहमी येत असत. तेरूबाय आपल्या गावातच अगदी घराजवळ असल्यामुळे ती जवळजवळ रोजच काकबयकडे येत होती. तसेच अंतोन मिनेज हा तीचा भाचासुद्धा काकबयला भेटावयास येत असे. काकबय ही अंतोन मिनेज सारखी गोरीपान होती. काकबयची अजून एक आठवण म्हणजे त्यावेळच्या स्रिया ह्या आपल्या नव-याचे नाव चुकूनही घेत नसत त्यानुसार काकबय आपल्या जावड्या अण्णाला सोंड्या नावाने हाक मारीत असे. काकबयचा मृत्यु आठवत नसला तरी तो १९६४ - १९६५ दरम्यान असावा असे वाटते. अशा ह्या काकबयला म्हणजेच आम्ही पाहीलेल्या एकमेव आजीला दंडवत व भावपूर्ण श्रद्धांजली. 


----समाप्त---/

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013