“बेंजामिन पिपरी” (१०/०४/२०२१)

 बेजम, तुला श्रद्धांजली पर दोन शब्द लिहीताना माझे हात थरथरतायेत. कुंचल्या वरची बोटाची पकड सैल होत आहे. तु ह्या जगातून ॲक्जीट घेतलेली आहे हे माझे मन स्विकारायला तयारच होत नाही. रसिका, रॅाबीन व ब्लांची ह्यांची समजूत कशी व कोणत्या शब्दाने काढावी तेच कळत नाही. रोजानचं अचानक निघून जाणं हा तुझ्यासाठी तसा फार मोठा धक्काच होता. त्यांच चिंतेत तु दिवस ढकलत होतास. रोजान गेल्यानंतर तु रडला नाही असा एकही दिवस गेला नाही. त्यानंतर तुला दुसरा पॅरालिसिस स्ट्रोक आला. व तुझ्या चिंतेत भर पडली. माणसाला चि्त्ता आणि चिंता दोन्ही जाळतात. तुला चिंतेने जाळले. आज ब्लांची आणि जॅाय ह्यांच्या वस्तीतील रात्र व्यवस्थित तू निभावून नेलीस पण पहाट मात्र तुला पेलवली नाही. सकाळी आठच्या सुमारास तु सर्वांना फसवून गेलास. तुझ्या सेवेसाठी दिवसा येणारा मेल-नर्स 8.30am वाजता घरी पोहोचला तो जणू तुझे शेवटचे दर्शन घेण्यासाठीच. त्यालाही तू फसवलेस.  


बेजम, आजच्या जमान्यात तुझे हे 66व्या वर्षी निघून जाणे हे केवळ पॅाल-स्मृती नव्हे तर संपूर्ण कळसुदमेल परीवारासाठी फारच लवकर होतय. बेजम, सात नातवंडाचा कुणालाही हेवा वाटवा असा तुझ्याकडे खजिना होता. त्यांना रोजान बरोबर तु सुद्धा पोरकं केलेस. तुझ्या सेवेसाठी आसुसलेले सुनीलचे हात रिकामे केलेस. काल पॅालचा 26 वा स्मृतिदिन तुम्हा कुटुंबियानी प्रार्थना व सहभोजनाने पार पाडलात. पॅालच्या नावाने वेशीवर तू क्रॅास बांधून जाणार-या येणा-यासाठी एक श्रद्धास्थान तूच निर्माण केलेस.🙏🏿🙏🏿🙏🏿


बेजम तुला तुझे स्वतंत्र विचार होते. तु खंबीर होतास. ठाम होतास. दुस-याचे विचार पटले नाहीत तर परीणामाची पर्वा न करता तु ते खोडीत असे. मग आज तुझा हा खंबीरपणा कुठे हरवला? मग आज तु मृत्यु समोर हार का खाल्लीस? मृत्युला दारातूनच का परतवले नाहीस? प्रश्न आमचे अनेक आहेत, पण उत्तरे मात्र तु घेऊन गेलास.  

 

बेजम तुझा जिवनतृत्तात फार मोठा आहे. तो ईथे नमूद करणे फार कठीण होईल. बेजम, जे काही आयुष्य तु जगलास ते मात्र राजेशाही होत. 

 

”पूर्ण विरामाचा क्षण, कुणास ठाऊक कधी राहील उभा!” 


 बेजम, कळसुदमेल परीवाराची हिच तुला भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏿🙏🏿🙏🏿🌹💐


----समाप्त---/

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013