“आई” (१०/१२/२०२०)

 आज गुरूवार, 10/12/20, आपल्या आईचा 76 वा जयंती दिन. त्या निमित्ताने आईला भावपूर्ण 🙏🏿🙏🏿 🌹🌺🌸 आदरांजली व पुष्पांजली.


आई म्हणजे मांगल्याची मुर्ती , दयेचा सागर, प्रेमाचा धबधबा, मायेचा झरणा व माऊलीचे साक्षात प्रतिरूप. प्रत्येक अपयशा मागे खंबीरपणाने उभी असते ती आई. आजची आई म्हणजे स्व. मेरी सायमन मिनेज. ती वेरोनिका, मेबल, ज्युलिएट , राजेश व सरीता ह्यांची मम्मी, तर पॅट्रीक , मॅथ्यू , राज व रिना ह्यांची सासुबाई.


आई हि फार सुसंस्कारीत, सुस्वभावी, धार्मिक व प्रेमळ अशी होती. आईला जाऊन आज दहा वर्षे होऊन गेलेली आहेत. वयाच्या केवळ 66व्या वर्षी आई कोणालाही कसलीही कल्पना न देतां देवाघरी अचानक निघून गेली. आईला घाई फार. भरल्या संसारातून असं अचानक निघून जाणे हि पण एक आईने केलेली घाई होती. “स्वामी तिन्ही जगाचा आईवीना भिकारी” गेली दहा वर्षे आम्ही तोच अनुभव घेत आहोत.


“दु:ख हे घरा-घरात असते म्हणून कोणाकडेही जाताना आनंद घेऊन जा” असा आपल्या लेकी-सूनेला सल्ला वा कानमंत्र देणे-या अशा या आदर्शवत आईला आमचा कोटी कोटी प्रणाम 🙏🏿🙏🏿🙏🏿


----समाप्त---/

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013