“पासपोर्ट / व्हिसा” 31/10/2023
पासपोर्ट ला मराठी शब्द आहे पारपत्र. परदेशी जाण्या-येण्यासाठी सरकारने तुम्हाला दिलेला परवाना किंवा दस्तऐवज( Documents), ज्यात आपली पर्सनल ओळख, नाव, पत्ता, जन्मतारीख, राष्ट्रीयत्व इत्यादी संपूर्ण माहीती दिलेली असते. म्हणजेच जर तुम्हाला परदेशात जायचे असेल तर तुम्हाला पासपोर्ट साठी अर्ज करावा लागेल. भारतात परराष्ट्र मंत्रालयाच्या ॲाथॅारीटी अंतर्गत (Ministry of external affairs) देशातील निरनिराळ्या पासपोर्ट सेवा केंद्र (PSK) द्वारे Issue केला जातो. तसेच भारतात प्रौढ माणसांना दहा वर्षाच्या कालावधी साठी तर लहान मुलांना पाच वर्षाच्या कालावधी साठी दिला जातो. या शिवाय पासपोर्ट हे तुमचे नागरिकत्व व्हेरिफाय करण्यासाठी, शाळा कॅालेजात ॲडमिशन साठी, ड्रायव्हींग लायसन्स मिळवण्या पर्यंत अशा विविध कारणासाठी उपयोगात येतो.
भारतीय पासपोर्टचे मुख्य प्रकार :~
1) निळा पासपोर्ट . म्हणजेच टाईप पी पासपोर्ट होय. सर्वसाधारण सामान्य लोकासाठी म्हणजे जे व्यवसाया साठी, सहल/टूर साठी शिक्षणासाठी जाऊ इच्छीणाऱ्या करीता असतो. ह्या प्रकारचा पासपोर्ट परदेशी अधिकाऱ्यांना सामान्य जनता व सरकारी अधिकारी ह्यांच्यातील फरक कळण्यास उपयोगात येतो.
2) पांढरा पासपोर्ट :~
भारत सरकारचे अधिकारी जे अधिकृत कामासाठी परदेशात जातात, यात विशेषता IAS आणि भारतीय पोलीस सेवा विभागात काम करणारे अधिकारी यांचा समावेश असतो. पांढऱ्या पासपोर्ट मुळे परदेशी अधिकाऱ्यांना भारतीय सरकारी अधिकारी ओळखून त्याप्रमाणे वागणूक देणे सोपे जाते.
3) मरून कलरचा पासपोर्ट म्हणजेच डिप्लोमॅटीक पासपोर्ट :~
हा पासपोर्ट वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि मुत्सद्दी (Deplomats) ह्यांना इशू केला जातो. ह्या पासपोर्ट मुळे इमिग्रेशन प्रोसीजर इझी होते.
4) ॲारेंज पासपोर्ट :~
भारत सरकारने अलिकडेच म्हणजे 2018 साली हे पासपोर्ट लॅांच केले आहेत. या प्रकारचे पासपोर्ट मुख्यत्वे दहावीच्या पुढे शिक्षण न घेतलेल्या लोकासाठी बनवले गेले आहेत. ह्या प्रक्रियेत ECR (Emigration Check Required) पडताळणी व स्थलांतर प्रक्रिया जलद होते.
व्हिसा
(Visitors International Stay Admission)
———-
आता पासपोर्ट तुमच्या हातात आला पण परदेशात जाण्यासाठी तुम्हाला पुढचे सोपस्कर करावे लागतात ते म्हणजे तुम्हाला ज्या देशात जायचे आहे त्या देशाची परवानगी व ह्यालाच म्हणतात व्हिसा. व्हिसा अनेक प्रकारचे असतात उदा. बिजनेस व्हिसा, टुरिस्ट व्हिजा, स्टुडंट व्हिसा, वर्क व्हिसा इत्यादी व ते त्या त्या देशाच्या नियमावलीच्या चौकटीत बसविलेले असतात. प्रत्येक देशांचा व्हिसा अलग अलग कालावधी साठी असतात.
प्रथमता आपण US व्हिसा विषयी माहीती घेऊ या. :~
US व्हिजाच्या दोन मेन कॅटॅगरीज आहेत
1) अस्थलांतरीत (Nonimmigrant)व्हिसा. ह्या प्रकारात आपण टेंपररी बेसीस वर जाऊ येऊ शकतो.
2) स्थलांतरीत (Immigrant ) व्हिसा. ह्या प्रकारात अमेरिकेत परमनंट राहण्यासाठीच्या प्रवासासाठी हा व्हिसा उपयोगात येतो.
अमेरीकेत कायदेशीर मार्गाने येण्या साठी एकूण 185 प्रकारचे विविध व्हिजा आहेत.
पर्यटन, व्यापार, नोकरी, कुटूंबाला भेटण्यासाठी अथवा उच्च शिक्षणा साठी जे येतात ते सर्व Nonimmigrant visa अंतर्गत येतात. ह्यात पर्यटन, व्यापार, व अमेरिकास्थित कुटुंबियांना भेटण्यास येणारे सर्व B-1 (बिजनेस व्हिसा) वा B-2 (टुरीस्ट व्हिसा) श्रेणीत येतात. हल्ली अनेकदा B-1/B-2 असा संयुक्त श्रेणीचा व्हिसा इशू करतात. ह्या परवाण्यावर तुम्ही अमेरिकेत नोकरी वा व्यवसाय करू शकत नाहीत. ह्या व्हिसाचा कालावधी 1 ते ३ महीण्या पासुन 5 वर्षाच्या कालावधी साठी असू शकतो. परंतू काही विशिष्ट कॅटेगरीतील भारतीय नागरीकांना भारत व अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय करारा नुसार हा कालावधी 10 वर्षा साठीचा असू शकतो. उदा. ज्यांची मुले अमेरीकेत राहतात त्यामुळे त्याना नेहमी मुलांना भेटण्या साठी जायची गरज भासते वा इच्छा होते अशा वरिष्ठ नागरीकांना दहा वर्षाचा व्हिसा कदाचित दिला जातो. शिक्षणासाठी F किंवा M व्हिसावर येतात. तर नोकरीसाठी H-1 किंवा L-1 व्हिसा अंतर्गत येतात. अमेरिकेचा E-3 व्हिसा हा फक्त ॲास्ट्रेलियन नागरीका साठी असतो. उच्चशिक्षण, नोकरीसाठी अमेरिकेतील वास्तव्याच्या परवान्याचा कालावधी 2 वर्षा पासून 5 ते 6 वर्षाईतका मोठा असू शकतो. असे अनेक प्रकारचे अमेरीकन व्हिसा असतात. त्यातील निवडक प्रकारच्या व्हिसाची माहीती मी माझ्या परीने व इंटरनेट वरून घेऊन आपणा समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पासपोर्ट -व्हिसा बाबतीत बेसीक माहीती सर्वांनाच माहीत असतेच असं नाही म्हणून हा खटाटोप.
आपल्या अधिक माहीती साठी एक यु-ट्युब व्हीडीयो खाली फॅारवर्ड करीत आहे. नक्कीच आवडेल.
धन्यवाद
🙏🏿
//// पॅट्रीक डिमेलो ////
फलश्रुती
दोनतलाव - पिपरी