//// महती, दोनतलाव गावाची ////.

 [भाग-१]


नंदाखाल पॅरीस मधील पश्चिमेस वसलेला एक निसर्गरम्य गाव म्हणजेच “दोनतलाव गाव”. दोनतलावला फार पुर्वी जवतळे म्हणत. जवतळे ह्या नावाची एका लाकडी पोलवर फिक्स केलेली पाटी अगदी आता-आता पर्यंत वटाराला जाणाऱ्या रोडवर जॅानी-मॅानी घराजवळ कॅार्नरला उभी होती. जवतळे म्हणजे जुळे तळे. ह्या तलावांना “हाऊ ओ” चा तलाव म्हणजेच सासू-सुनेचे तलाव म्हणूनही संबोधीत असत. ह्या दोन्ही तलावांना दुभंगून जाणाऱ्या अर्नाळा-वसई रस्त्यामुळे तलावाचे दोन भाग झाले होते. पुर्वेकडील तलाव हे आकाराने मोठे होते म्हणून गावकरी त्याला मोठे तलाव व दुसरे आकाराने लहान म्हणून त्याला लहान तलाव असे बोलत असत. दोनतलाव गावाचा मुख्य धंदा दुधदुभत्याचा होता. घरोघर म्हशी पाळल्या जात असत. खळ्यात आप्पा -आलेस तात्या ह्याचा पंधरा ते विस म्हशींचा तबेला होता. देगुनाना यांच्याकडे दहा म्हशी होत्या. नया घरच्या कुटुंबात सुद्धा पंचवीस म्हशीचा तबेला होता. इनूबाबा-आल्याबाबा यांच्या कडेही पंधरा वीस म्हशी होत्या. देगुदमेल कुटुंबातही मिळून तीस ते पस्तीस म्हशी होत्या. नारोळ कुटुंबातही पंचवीस म्हशी पहावयास मिळत होत्या. गोंड्या नारोळ ह्यांच्या कडेही पंचवीस म्हशीचा तबेला होता व अजूनही आहे. साल्या शिनोर कडेही दहाते बारा म्हशी पाहायला मिळत. तसेच तेत्याबाबा, लानापोर, नानू नारोळ ह्यांच्या कडेही म्हशी होत्या. एकंदरीत दोनतलाव गावात दीडशे पर्यंत म्हशी होत्या. या दोन्ही तलावात दोनतलाव गावा व्यतीरीक्त वटार, नोनोडी, रुमाव , मेढे, बाणभाट व बावखाल ह्या आजुबाजुच्या गावातील म्हशी सद्धा पाणी पिण्यासाठी व साफसफाई साठी वा धुण्यासाठी आणीत असत. ह्या म्हशी तलावात पोहताना एक अद्भूत दृष्य नजरेत भरत असे. गावातील बदके या तलावात पोहताना दिसत. कधी कधी हि बदके एका लाईन मधे येऊन नकळत एक सुंदर व आकर्षक नजारा तयार होत असे. कधी कधी रात्रीच्या वेळी ह्या तलावात बदका सारखे दिसणारे काही हंस सदृश पक्षी ह्या तलावात दृष्टीस पडत असत. लहान तलावाच्या पूर्व बाजूला रस्त्याच्या दोन्ही कडेला दोन महाकाय डौलदार बोधीवृक्ष (पिंपळ वृक्ष) तलावाची व गावाची शोभा वाढवीत होते. ह्या पिंपळावर घुबड, वाघुळ, कावळे व अनेक प्रकारच्या चिमण्या आपली घरटे बनवून राहात असत. कधी कधी ह्या झाडाच्या उंच बुध्यावर घारी सुद्धा नजरेस पडत. मे -जुन महीण्यात कोकीळा सुद्धा आपले कुहूकुहू असे गुंजन करताना दिसत असत. हे दोन पिंपळ म्हणजे दोनतलाव गावाचं लॅंडमार्क होते. जवळ जवळ पन्नास वर्षा पुर्वी उत्तरे कडील पिंपळवृक्ष कापून जमीनदोस्त करण्यात आले. तर दक्षिणेकडील पिंपळ वृक्ष आजही रोडावल्या अवस्थेत तग धरून उभा आहे. फार पुर्वी ह्या दोनतलावा मधून जाणारा रस्ता हि एक पाऊलवाट म्हणजेच आपल्या भाषेत कांडा होता असे सांगतात व दोनतलाव गावात जाणारा रस्ता म्हणे लहान तलावाच्या पश्चिमेच्या कडेकडेने जात होता असे बुजूर्गा कडून ऐकावयास मिळते. दोनतलाव गावाचं आणखीन एक विशेष म्हणजे ह्या गावात चिंचेची भरपूर झाडे होती. त्यात खळ्यामधे पासू दमेल कुटुंबियाच्या दोन, शेंज्यावरती नयाघर कुटुंबियांची एक, फरशाकाकाची एक, लडकूकाकाची एक, भोळ्याकाकाची एक, देगुदमेल कुटुंबियाची एक, टोकर झुज्या फॅमिलीच्या दोन, पेद्रूकाका व फिलूकाकाच्या दोन, माडीघर करांच्या दोन, बापूजीकाका कुटुंबियांच्या दोन तमुकाका कुटुंबियांच्या दोन अशा प्रकारे सोळाहून अधिक चिंचेची झाडे होती. हि झाडे व दोन पिंपळवृक्ष गावाची हिरवळ टिकवून होती, व गावाला सावली देत होती. ह्या चिंचेच्या झाडावर भरपूर बगळे बसत असत. त्यामुळं हि झाडे फार आकर्षक दिसत. चांदण्या रात्री हे सफेद बगळे चमकून दिसत व झाड लख्ख प्रकाशाने न्हाऊन निघाल्याचा भास होत असे. हे दृष्य विलोभनीय होते. या झाडाचे तलावात पडणारे प्रतिबिंब म्हणजे एक नयनरम्य असा देखावा होता. असा एकमेव शोभिवंत व देवाचा वरदहस्त लाभलेला एकमेव गाव म्हणजेच नंदाखालचा दोनतलाव गाव. 

दोनतलाव गाव प्रामूख्याने तीन भागात विभागला होता. अगदी उत्तरेचा भाग म्हणजे शिनोर विभाग. हे सर्व डिमेलो आहेत. परंतु त्या विभागात होऊन गेलेल्या फादर पॅालीकार्प ह्याला मिळालेल्या शिनीयोर ह्या पदवीमुळे हि मंडळी मोठ्या अभिमानाने आपल्या डिमेलो आडनावाबरोबरच शिनीयोर हे आडनाव जोडीत असत. ह्या कुटुबियांची बागायतीची जागा म्हणजे ते वास्तव्य करीत असलेली शिनोर-वाडी. तसेच भेंडीभाट इथे सुद्धा त्याची जमीन आहे. बाजुला असलेल्या आडाभाट व अटाळी ह्या वाडीत त्यांचा हिस्सा नाही. हे कुटुंब सन्माळे कुटुंबियाशी निगडीत असावं असा कयास आहे. ह्या कुटुंबियातील अकरा जनांनी आता शिनोर वाडीतच पण अर्नाळा -वसई रोडवर आपली अकरा घरे उभारलेली आहेत. 

दोनतलाव गावात प्रवेश करण्यासाठी दोन वेशी आहेत. दक्षिणेकडची वेस नारोळ विभागात तर उत्तरेकडची वेस विसरोडी व शिनोर विभागात जाते. प्राप्त माहीती नुसार शिनोर विभागात मुळ चार कुटुंबे होती. 

१) साल्या शिनोर व अत्या शिनोर हे दोन भाऊ. # साल्या शिनोरच्या बायकोचे नाव अनी होते. त्यांना जिरू शिनोर व फरशा शिनोर हे दोन मुले होते. # अत्या शिनोरच्या पत्नीचे नाव मर्शी. तिला बोठी नावाने ओळखत असत. ह्यांना अपत्ये नव्हती. 

# जिरू शिनोरची मुले :~ साल्याबाबा, अंतोन, बावतीस व मतेस

# फरशा शिनोरची मुले:- बेजमी, पेद्रू व आलेस


२) दुसरं कुटुंब म्हणजे कत्या शिनोर व तमू शिनोर हे दोन भाऊ.

# कत्या शिनोरला दोन मुले, फिल्या शिनोर व शिलू शिनोर. शिलू शिनोरचा मुलगा सायमन. फिल्या शिनोरला मुलगा नव्हता, एक मुलगी होती. 

# तमू शिनोर हा उंगनभाटात घर जावई म्हणून गेला. त्याचा मुलगा फिलीप डिमेलो. मायकल व तोमास हे त्याचे नातवंडे. ते आपलं आडनाव डिमेलो म्हणूनच वापरतात.


३) तिसरे कुटुंब अतू शिनोर यांचे. त्याला दोन मुले:- झुज्या शिनोर व इज्या (विन्सेंट) शिनोर

# झुज्या शिनोरचा मुलगा मिंगू शिनोर (तोकड्याचे व लुईसचे वडील)

# इज्या शिनोर हे घरजावई म्हणून मशाद गावात गेले. त्याची मुले बस्तु, बावतीस, अतान व मतू . त्यांची आडनावे डिमेलो आहेत.


४) चौथे कुटंब:- फिलीप शिनोर म्हणजेच बारक्या शिनोर यांचे होते. फिलीप शिनोरला पास्कू शिनोर व लुसू शिनोर हे दोन मुलगे होते. 

# फिलपा शिनोर व मुका शिनोर हे पास्कू शिनोरची मुले होत. फादर पास्कोल हा फिलपा शिनोरचा मुलगा होय. 

दिलीप व संजू हे मुकाकाकाचे मुलगे.

# लुसू शिनोरचा मुलगा अंतोन मास्तर होय. व अंतोन मास्तरची तीन मुले अेली, सचीन व नेल्सन हि होत.


तर एकंदरीत असा होता दोनतलाव गावातील शिनोर विभागाचा संक्षीप्त आढावा.

-🙏🏿-

[भाग-२]


दोनतलावचा मुख्य गाभा म्हणजे विसरोडी हा विभाग. उत्तरेस शिनोर विभाग व दक्षिणेस नारोळ विभाग आणि मधला विसरोडी विभाग. गावाच्या उत्तर वेशीतून पुढे शेंज्यावर पोहचल्यावर समोरच सुरूवातीला एक लाकडी क्रॅास होता. क्रॅासच्या बाजुलाच सालुकाकाचे लाकडी कुडाचे घर होते. घराला एका बाजूने पाच -सहा म्हशीचा गोठा होता. सालुकाका नारोळ मधून इथे आल्याची माहीती आहे. नारोळ मधील मायकलबाबा व नानूबाबा हे लानापॅार कंपणीचे कुटुंबिय होत. ह्या सालुकाकाचे तीन मुले मंगाकाका, जाकुकाका, व लानापॅार. त्यांची मुले म्हणजेच आजचे क्लेमेंट (रमेश), राजेश, चार्लस, रॅाबर्ट व रिचर्ड USA. पुढे ह्या मुलांनी एक मोठा बंगला उभारला. हाच रस्ता उत्तरेला शिनोर विभागाच्या वेशीपर्यंत जातो व पुढे आडाभाट वाडीकडे जातो. ह्याच रस्त्याला लागून पश्चिमेस पासू दमेलचे घर होते. पासू दमेलच्या घरापासून ते थेट कुकुर दमेलच्या घरापर्यचा परीसर व रस्त्याच्या पुर्वेस पेद्रू दमेल (नयाघर) चे घर, हा सर्व परीसर म्हणजे विसरोडी. पासुकाकाच्या घराला जोडूनच लुसू दमेलचे घर होते, त्याला लागून फरशाकाकाचे घर होते. त्याला लागूनच अतानकाकाचे व टोकर झुज्याचे घर व त्यालाच लागून लडकूकाका-झुज्या बाबाचे घर. असे सहा घरे एकत्र चिटकून होते. त्यांचा ओटा जोडलेला असल्यामुळे तो ओटा लांब लचक होता. ते एका लोकल गाडीसारखे वाटायचे. त्याला लांबी बार असेही म्हणत असत. ह्या बारीत मन्याकाकाच्या ओट्यवर एक हिंदोळा व एक माशी होती. बाबू शेटच्या ओट्यावर एक हिंदोळा होता. फरशाकाकाच्या ओट्यावर एक हिंदोळा होता. अतान काकाच्या ओट्यावर एक हिंदोळा व एक माशी होती. टोकर झुज्याच्या ओट्यावर एक हिंदोळा व एक माशी होती. तसेच लडकूकाकाच्या ओट्यावरही एक हिंदोळा होता. बारीत असे एकूण आठ माशी-हिंदोळे होते. सकाळी उठल्या पासुन ते रात्री बारा वाजे पर्यंत कोणता नी कोणता माशी-हिंदोळा झोके घेत असायचा. त्याचा करकर जरी असला तरी कर्णमधुर आवाज सतत चालू असायचा. बारीतील लग्न कार्याच्या वेळी ह्या माशी-हिंदोळ्याचा फार वापर होत असे. रात्रीच्या वेळी स्रिया ह्या माशी- हिंदोळ्यावर बसून सुमधुर लग्नगीते बोलत असत. हि लांबी-बार नेहमी माणसांनी गजबजलेली असायची. ह्या बारीत यायला पाहूना कचरून जात असे. बायका तर पाठीमागच्या ( मिंगरच्या) बाजूने यायच्या. त्याच्या पुढचे घर अत्या-देगू व फिलू ह्या तीन भावाचे. त्याच्या पुढे भोळ्याकाकाचे व त्याच्या पुढेचे म्हणजे विसरोडी विभागाचे शेवटचे घर कुकूर दमेल व आशा दमेल ह्या भावांचे. त्यालाच माडीघर बोलत असत. ह्या सर्व कुटुंबियाची घरे अटाळी वाडीला सल्लग्न होती किंबहुना अटाळी वाडीतच होती. लांब्या बारीच्या मागे अटाळी वाडीचा रहाट व विहीर होती. अजूनही आहे. आम्ही सर्व गावकरी ह्या विहीरीतच पोहायला शिकलो. उत्तरेकडची वाडी म्हणजे आडाभाटवाडी. ह्या अटाळी व आडाभाट वाडीतील हिस्सेदार म्हणजेच विसरोडी विभाग कुटुंबिय. ह्या दोन्ही वाडीत शिनोर व नारोळ करांचा हिस्सा नाही. आडाभाटची संपूर्ण वाडी माझ्या माहीती प्रमाणे हि सात अेकरहून जास्त असून तीची दिड अेकर जागा निव्वळ खराबाच आहे. लांब्या बारीतील उत्तरेकडचे कुटुंब हे पासू दमेलचे. पासू दमेलचे तीन मुले. १) मन्याकाका म्हणजे दिटाकाका व देगूनाना ह्यांचे वडील. ( दिटाकाकाची मुले जॅान, व जोजेप. जॅानचा मुलगा लेवीस

देगू नानांची मुले :- अंद्रू, विलम व विनेश)

२) तोमासकाका :- आलेसतात्या व आप्पा (वेल्डिंग ) चे वडील. साई तोमास, फेल्शा, मोती, चार्लस व डेव्हीड ही तोमास काकाची नातवंडे.

३) आमाकाका :- पाकल व शमन चे वडील. 


ह्या पासुदमेल कुटंबाची आता सात घरे झालेली आहेत. 

हे कुटुंबिय लुसू दमेल (बिशा शेट व बाबू शेट ह्या कुटुंबियाशी संबंधीत आहे.) बावतीस, दुमिग USA, व फा. बाबा हि बाबूशेटची मुले होत. पासु व लुसू दमेलचं कुटुंब हे कुकुर दमेल व आशा दमेल ह्या कुटुंबाशी संबंधीत आहे. म्हणजे हे सर्व एकच कुटुंब. 


# माडीघरचे कुटुंब:-

कुकुर दमेलचे घर म्हणजे सहा दरवाजे असलेल्या वाड्या प्रमाणे त्या काळातील अक प्रशस्त बंगला होता. म्हणून ह्या कुटुबियांना माडीघरचे किंवा बंगल्यावाल्या घरचे असे संबोधले जात असे. 

कुकुर दमेल व आशा दमेल हे दोघे भाऊ.

कुकुर दमेलला पाच मुलगे व एक मुलगी. 


# १) कुकुर दमेलचे पहीले अपत्य जिरू दमेल. जिरू दमेलचा मुलगा देगुदमेल. देगू दमेलची बहीण रोजीबाय म्हणजेच लडकूकाका व झुज्याबाबाची आई. देगुदमेल चा मुलगा काळ्याबाबा. काळ्याबाबाचे नाव जिरू .


# 2) कुकुर दमेलचे दुसरे अपत्य

पि दमेल. 

पि दमेलला तीन मुल:- 

इनूस दमेल, इतूरकाका व शिमूकाका.

# इनूस दमेलला चार मुलगे- फिलूकाका, आलेस, पायस, आणि लुईस.

फिलूकाकाला दोन मुलगे -विल्सन (बाबू) व जॅाना.


# इतूरकाकाला दोन मुलगे:- पासूआप्पा व बाकुशा. 

पासूआप्पाला दोन मुलगे- महेश व विलास


# शिमूकाका. 

शिमू काकाला दोन मुलगे - फरशा आप्पा व शिलू आप्पा.

फरशाआप्पला एक मुलगा - राजेश. 


# 3) कुकुर दमेलचे तिसरे अपत्य नाना दमेल. 

नाना दमेल हयाला अपत्य नव्हते. भागावरील पि दमेलच्या घरासमोरील क्रॅास त्याच्याच नावाने बांधलेला आहे. हा क्रॅास कुकुर दमेल कुटुंबियांचा प्रायव्हट क्रॅास असून ह्या क्रॅासची रंगरंगोटी व वार्षिक सण हे कुटुंबियच मोठ्या धुमधडाक्याने करतात. 


# 4) कुकुर दमेलचे चौथे अपत्य पासुदमेल.

पासु दमेलला तीन मुलगे :- बाबूकाका (झ्याव) , नानाकाका, व ताटीकाका. 

बाबूकाकाची पाच मुलगे:- बिशाबाबा, मिंगूबाबा, बाकाबाबा, बेजमबाबा व शिलू

# बिशा बाबाला दोन मुलगे- गोंड्या (जॅाकीम) व मोजेस.


# मिंगूबाबाला तीन मुलगे - तोमास, आबेल व डेनिस


# बाकाबाबाला एक मुलगा- जॅान (गॅाडी)


# बेजमबाबाला एक मुलगा - संदीप (नटू)


# शिलू अंकलला दोन 

मुलगे:- सुरेंद्र व पिंचू

—-॰—-

# नानाकाकाला चार मुलगे - एलीस, चार्लस, जॅान, व पांडू. 


# ताटीकाकाला दोन मुलगे- मार्शल व वॅाल्टर


# 5) कुकुर दमेलचे पाचवे अपत्य अंतोन दमेल. 

अंतोन दमेलला दोन मुलगे - बाळाबाबा व मोत्याबाबा

# बाळाबाबाला एक मुलगा झुजा (अंजोमा). 

अंजोमाला तीन मुले - नेल्सन, सुनील व संजू.


# मोत्याबाबाला एक मुलगा - अंतोन


ह्या कुकुर दमेल कुटुंबियांची आता घटनावर चार व वटार रस्त्याच्या दोन्ही कडेने सतरा मिळून एकूण एकवीस घरे झालेली आहेत. 


# आशा दमेलचे कुटंब :-

आशा दमेलचे दोन मुलगे पेद्रूकाका व फिलूकाका.

पेद्रूकाकाचा मुलगा खंड्याकाका व

फिलूकाकाचे दोन मुलगे १) कोकोकाका ( कोकोकाकाने ननोडी गावाजवळ अंजी वाडीत घर बांधलेले आहे. त्याचा मुलगा पात्रीस. 

२)संज्याव काका. ह्यांचे घर गावात असून लुईस व मनेष हि त्यांची दोन मुले होत. 

—-॰—-


# झुज्या दमेल (टोकर झुज्या) व चिमा दमेल हे दोघे भाऊ. ह्याचे कुटुंब हे अतान काका कुटुंबाशी संबंधीत आहे. झुज्या दमेलला बाबू, शिलू, इनूस व आलेस हि चार मुले. # बाबूचा मुलगा तेत्याबाबा, # शिलूकाकाची मुले बेजम, एलशा, बच्चू व पॅाल. 

# इनूबाबाची मुले पॅट्रीक , जेरोम व मॅथ्यू. # आल्याबाबाची मुले बिशा, मायकल व पांड्या. 

शिलूकाका, इनूबाबा व आल्याबाबा ह्यांनी पिपरीत घरे बांधली. त्यांची आता पिपरीत सात घरे झालेली आहेत. मास्तरकाकाचे श्रमदीप ह्या घराचे तीन तीन घरे ॲालरेडी बांधली गेली असून श्रमदीप घर डिमॅालीश केले आहे व आता त्या जागेवर चार घरे बनत आहेत. तेत्या बाबा कुटुंबाची दोन घरे बांधलेली आहेत. हि सर्व घरे मिळून कळसू दमेल कुटुंबाची एकूण सोळा घरे झालेली आहेत. 

——-

# दिन दमेल कुटुंब :- दिन दमेलची दोन मुले

अतान काका व तमू काका. अतान काकाची तीन मुले 

१)जॅान (शांबूकाका), २)मनूकाका व ३)शांत्याकाका. 

# शांबूकाकाची मुले तोमास व गोंड्या.

# शांत्या काकाची मुले रिचर्ड व जॅानी. 

अतान काका कुटूंबाची तीन घरे झालेली आहेत. 


-🙏🏿 -


[भाग -३]

पुढे चालू•••••


# देगू दमेल कुटुंबाची माहिती पुढील प्रमाणे :-

आगू दमेल व फरशा दमेल हे दोघे भाऊ. #आगू दमेलला तीन मुलगे व एक मुलगी 

# १) अत्या दमेल ( शेजावबाबा, बस्त्याव बाबा, आगुबाबा व मनू बाबा ह्यांचे वडील) 

शेज्याव बाबाचा मुलगा चिमू, बस्त्याव बाबाचा मुलगा रमेश, आगुबाबाचा मुलगा पिटर, व मनूबाबाचे मुलगे अंतोन, जॅाकीम, रॅाबर्ट व नेल्सन


# २) देगुदमेल (अंद्र्याबाबा व बाटीबाबाचे वडील) 

अंद्र्या बाबाचे मुलगे एलीसतात्या व फादर ज्यो.

बाटीबाबाचा मुलगा जॅान.


# ३) फिलुकाका (आल्याबाबा, मोत्याबाबा व पासुबाबा ह्यांचे वडील)


आल्याबाबाची मुले गफूरआप्पा, ॲास्टीन व जाड्या (डॅाम्णिक).


मोत्याबाबाचे मुलगे 

बिशा, शिलू व कैतान.


पासुबाबाचे मुलगे

बबन व रिचर्ड. 


# फरशा दमेलला तीन्ही मुली 

१) दुमीबाय - मोत्या कुरे नांदान ह्याची बायको.

२) कतीबाय बोळींज - फरशा लुद्रीक (वालीचे सासरे ) ह्यांची आई 

३) ओजाबाय - बब्याचे बाबा फरशाकाका ह्याची आई.

ओजाबायचा नवरा म्हणजेच फरशाकाकाचा बाबा हे भुईगावातून दाबरे कुटूंबातून आणलेले होते. म्हणून त्यांचे आडनाव दाबरे होय.

फरशाकाकाचा मुलगा डॅाम्निक म्हणजेच बब्या होय. 

फरशा काकाची एक बहीण बुलाबाय म्हणजे काळ्याकाकाची आई व देगू दमेल (माडीघर ह्याची बायको) 

फरशा काकाची दुसरी बहीण मनाबाय म्हणजे कातरवाडीतील बुलशी व शेंडू ह्यांची आई. 


# नयाघरचे कुटुंब:-

झुज्या दमेल व नाना दमेल हे दोघे भाऊ. नाना दमेलला मुले नव्हती. 

झुज्या दमेलला दोन मुली १) मरीबाय (मोत्या शेटची बायको)

२) फरशीबाय ( माडीघरच्या बाळाकाका व मोत्याकाका ह्यांची आई)


झुज्या दमेलची बायको वारल्या नंतर त्याचे लग्न जापक्यातील बोठी बरोबर झाले. बोठीबरोबर तिचा मुलगा बाबू म्हणजेच पेद्रू ह्यालाही आणले व त्याला रीतसर दत्तक घेतले. 

बाबूचे चार मुलगे :- 

१) बस्त्यावबाबा (मोत्यामास्तर, अंद्रेस, पांडू, पिटर व बिशा ह्यांचे वडील)

२) मिगू दमेल (फा. जॅान, वाली व जेम्स ह्यांचे वडील)

३) झुजू (भटाकाका) हे बेजम, गुगूर, व गोंड्या ह्याचे वडील.

४) बावतीस /हिटलर काका (तोमासचे वडील).


नयाघरच्या कुटुंबियांची गावात एकूण दहा घरे झालेली आहेत. 

झुज्या दमेल (नयाघर) हयाचे देगु दमेल कुटुंबियाशी कौटुंबिक नाते होते. झुज्या दमेल हे आगु दमेल व फरशा दमेल ह्यांचे चुलत चुलत बंधू. ओजाबाय हि वर सांगितल्या प्रमाणे देगु दमेल कुटुबियाची लेक होती. म्हणजेच देगुदमेल कुटूंब, नयाघरचे कुटुंब व फरशाकाकाचे कुटुंब हे सर्व एकच कुटुंबिय होत. देगुदमेल कुटूबियांची गावात पाच घरे व आगोडीत नऊ मिळून एकूण चौदा घरे झालेली आहेत.


# नांदू -फरशाचे कुटुंब :- फरशाचा मुलगा नांदू (बेजमी)

व नांदूची मुलं:- लडकू काका (अंतोन) आणि झुज्याबाबा म्हणजेच रोजीबाय ह्यांचे कुटुंब. लडकूकाकाचे नाव अंतोन. रोजीबाय हि माडीघरच्या जिरू दमेलची मुलगी व देगु दमेलची बहीण. म्हणजेच काळ्या बाबाची बाय. रोजीबायच्या नवऱ्याचे नाव बेजमी. हे कुटुंब सांबोडीतील लुद्रीक कुटुंबियातून आलेले म्हणून हे लुद्रीक कुटुंब. लडकूकाकाची सासुरवाडी क्रॅासनाक्यावरील क्रास्टो कुटुंबात होती. पुढे लडकुकाकाची सासु तिच्या माहेरी जोजघर येथे शिफ्ट झाली. लडकूकाकाला एक मेहूना आहे. ते आपले आडनाव क्रॅस्टो असे लावतात. तसेच लडकूकाकाची एक मेहूनी (सांतान दादयची बहीण) वाघोलीत आहे. 

# लडकुकाकाचा मुलगा रॅाबर्ट सर. रॅाबर्ट सरचा एक मुलगा त्याचे नाव रिमस.


# झुज्याबाबा (बॅंडवाला). ह्याचा मुलगा विली. 

आता ह्या कुटुंबियाचे रॅाबर्ट सरांचे एक घर व विलीचे एक घर मिळून दोन घरे झालेली आहेत. 


# भोळ्याकाका (डॅाम्णिक) मिरांडा ह्यांचे कुटुंब:- ह्या कुटुंबाची पुर्वज आंजी घोसाळ म्हणून एक विधवा बाई होती. आपल्याला एक आधार हवा व प्रॅापर्टीला वारस असावा ह्या उद्देशाने तीने झ्याव घोसाळचा मुलगा दुमा ह्याला दत्तक म्हणून आणले. झ्याव घोसाळची बायको हि कातरवाडीतील झुरलाबाबा ह्यांच्या घराण्यातली. (अशी तोमास मिरांडा कडे नोंद आहे). पुढे दुमा घोसाळचे मिरांडा कसे झाले ते कळायला काही मार्ग नाही. 

दुमा मिरांडा म्हणजे भोळ्या काकाला तीन मुलगे इतूरकाका, तोमासतात्या व संज्यावआप्पा

इतूर काकाला चार मुलगे :- लुईस, अंद्रेस, बस्त्याव व गोंड्या. 

ह्या मिरांडा कुटुबियांची आता सात घरे झालेली आहेत. 

तर असा आहे/होता जुन्या नव्या विसरोडी विभागाचा संमिश्र आढावा. 

-🙏🏿-



[भाग-४]

—॰॰—

दोनतलाव गावातील शिनोर विभाग व विसरोडी विभागाचा माहीतीपर आढावा आपण घेतला. दोनतलावचा तितकाच महत्वाचा भाग म्हणजे नारोळ. ह्या विभागाला नारवाळ असेही म्हणत. नारोळ विभाग हे एक रमनीय ठिकाण होतं. गावच्या दक्षिणेकडून एका गजबजलेल्या मेन रोडशी मिळणारी हि नारोळ विभागाची वेस. डाव्या बाजुला भव्य नक्षीदार क्रॅास उजव्या बाजूला महाकाय पिंपळवृक्ष पुढे रस्त्याच्या कडेने आपलं प्रतिबिंब घेऊन चालणारं लहान तलाव. डाव्या बाजुलाच तमू काका कुटुबियांच तीन वर्गाच घर व बाजुलाच नारवाळ वाडीचा रहाट. रस्त्याच्या बाजुला उंचच- उंच चिंचेची झाडे. उजव्या बाजुला बंगलेवाल्याचं विस्तृत बंगला. पुढे डाव्या बाजुला फिल्या काकाचं घर. त्यापुढे अत्याकाका- बापुजीकाका- फरा-पेद्रू काकाचे

जॅाईंट घर. आजुबाजूला भेंडीची,गुलछेडीची व शेवग्याची झाडे पुढे नयाघरचे उंच पायरीचे तीन वर्गाचे उंच व भव्य वाडासदृष घर. व बाजुलाच ह्या कुटुंबियांचे मोठे बेडे. तर असा हा हिरवळ असलेला, गारवा देणारा, थंड वातावरणाचा व मे-जून

मधे कोकीळेचा कुहू-कुहू आवाज गावात पसरविणारा रम्य परीसर म्हणजेच आमचा नारवाळ विभाग. ह्या विभागात म्हशी बरोबरच कोंबड्या व बदके सुद्दा पाळले जात. हि बदके रात्री अंडी देत. परंतु हि बदके सकाळी एकदा तलावात गेली की संध्याकाळी स्वत:हून घरी येत नसत. घरी नाही आली तर अंडी मिळणार नाहीत. म्हणून तलावाच्या दोन्ही टोकाने दोनजणांनी दोरी घेऊन हलवत हलवत बदकांना पुढे सरकवून बाहेर काढत व मग ते बदक आपआपल्या घरी जात. (केवळ अंडी मिळवण्या साठी हा खटाटोप). काहीक वेळेला बदके दोरी चुकवून मागे राहात. व दुसऱ्या दिवशी सकाळी प्रातर्वीधी साठी गेलेल्या माणसांना तलावाच्या काठावर अंडी मीळत. काहीक वेळेला रात्रीच्या भोजना नंतर मेन रोडवर फिरताना तलावात बदके दिसत म्हणजे नक्कीच दुसऱ्या दिवशी प्रातर्वीधी साठी गर्दी जमली म्हणून समजा. नारोळ म्हणजे अंड्याचे माहेरघर. गावात कधीही अंड्याची गरज भासली तर नारवाळात हमखास मिळत. तर असा हा रमनिय व आकर्षक परीसर म्हणजे गावचे भुषण नसला तरच नवल. गावातील कोणत्याही कार्यक्रमात नारोळकरांचा सहभाग उत्स्फुर्त व कौतूकास पात्र असाच असतो. करमणूकीचे कार्यक्रम असो, डान्सअसो, कोळीनृत्य असो, जोक्स असो, नाटीका असो, त्यात नारोळ कलाकार नाहीत असं कधी होत नसे. असा हा आमचा नारवाळ विभाग म्हणजे आमच्या दोनतलाव गावचे नंदनवन नव्हे वृंदावनच. तर हे होतं नारोळ विभागाचं नैसर्गिक वर्णन.

ह्या विभागाची कौटुंबिक रचने विषयी व घराण्या विषयी आढावा/ माहीती :- 

ह्या विभागातील एक मोठे कुटुंब कि ज्याला ह्या विभागात नयाघर म्हणून संबोधीतात. हे घर 4मार्च 1925 ला बांधले होते. ह्या घराला तीन प्रवेश दरवाजे होते. एका बाजूस शेडूकाका कुटुंब, मधे बेजमी दमेल कुटुंब व तिसऱ्या दरवाजात पेद्रू दमेलचे कुटुंब राहात होते.

ह्या कुटुंबातील बावतीस दमेल हे कुटुंब प्रमूख होते. बावतीस दमेलला तीन मुलगे:-

१) आलु बावतीस दमेल. २) शिमा बावतीस दमेल ३) कतू बावतीस दमेल.

# पैकी शिमा बावतीस दमेल हे कातरवाडीत मामाकडे गेले (कातरवाडीतील दमेल कुटुंबाला इथूनच सुरूवात झाली.)

# कतू बावतीस दमेल. 

ह्यांना एकच मुलगी. ती देवी रोगात वारली. 

# राहीले आलु बावतीस दमेल. ह्यांना तीन मुलगे:- १) बावतीस आलू दमेल

२) बेजमी आलू दमेल

३) पेद्रू आलू दमेल


# बावतीस आलू दमेल:- ह्यांना एक मुलगा म्हणजे शेंडूकाका. शेंडूकाकाला एक मुलगी बाजीबाय. म्हणून बाजीबायचा मुलगा एलीस रुमाव हा शेंडूबाबाचा वारस झाला. 


# बेजमी आलू दमेल. 

ह्यांना दोन मुलगे - लुसू दमेल व बस्त्याव दमेल (हे बेजमीकाका कुटुंब)

लुसू बाबाचा मुलगा बिशाबाबा.

बिशाबाबाचे मुलगे :-

तोमास, बाळू, आलेक्स व पिटर (दादा)

तसेच लुसुकाकाच्या तीन मुली :- अनुली, मेरी व गराशी. (ह्या बिशाबाबाच्या सावत्र बहीणी)


# बस्त्याव बेजमी दमेल :- ह्यांना दोन मुलगे संज्याव आणि एलीस 

-॰॰-

# पेद्रू आलू दमेल :-

पेद्रू दमेलला पाच मुलगे :- 


# १) बाबूकाका (बावतीस) पेद्रू दमेल :- ह्यांना दोन मुलगे आलेसबाबा व फराशा. आलेस बाबाचा मुलगा जॅाकीम.


# २) इतूर पेद्रू दमेल. 

ह्यांना चार मुलगे :- मॅथ्यू (मोत्या), इनूस, पेदर व झुजा. 

मॅथ्यू ह्यांना दोन मुलगे - दिलीप व चार्ल्स


# ३) झ्याव पेद्रू दमेल.

ह्यांना पाच मुलगे :- सायमन (शिमा), फिलीप, डॅाम्णिक, जेरोम व लुईस. 

लुईसला एक मुलगा - 

ॲाज्डन


# ४) मिंगू पेद्रू दमेल. 

ह्यांना तीन मुलगे:- अंतोन, अंद्रेस व पास्कोल.


# ५) कतू पेद्रू दमेल. 

ह्यांना दोन मुलगे - शिलू व रॅाबर्ट


आता ह्या संपूर्ण नयाघर घराण्याचे एकूण सतरा घरे झालेली आहेत. एलीस रुमावचे स्वत:चे एक घर रुमाव गावात झालेले आहे. 

असं म्हणतात कि ज्या कुटुंबात बुजूर्गाच्या चेहऱ्यावर हास्य असते त्या कुटुंबात सुख आणि शांती नांदत असते. ह्या कुटुंबात अजूनही आशिर्वाद द्यायला दोन बुजूर्ग आज्या हयात आहेत .

१) मनकीन बिशा दमेल (90 पुर्ण व 91 running)

2) रोजी कतू दमेल

(89 पुर्ण व 90 running)

त्यांच्या हातात सतत रोजरी व चेहऱ्यावर नेहमी हास्य पहावयास मिळते. दोघीही अजून टकाटक आहेत. त्यांना चांगले आरोग्य मिळो हि प्रार्थना.

-॰॰-

फिल्याकाका-सालुकाका कुटुंब. हे कुटुंब व नयाघरचं आलुदमेलचं कुटुंब हे एकाच कुटुंबातील होत. सालुकाका कुटुंबाची माहीती आपण भाग दोन मधे घेतलेली आहे. 

# फिल्या काका ला दोन मुलगे मायकलबाबा व नानूबाबा. 

# मायकल बाबाला दोन मुलगे :- सायमन व आल्या

# नानूबाबाला तीन मुलगे :- मोजेस, मार्शल व पायस. 

ह्या कुटुंबची आता तीन घरे झालेली आहेत.


-🙏🏿-

[भाग-5]


—॰॰—

नारोळ विभागातील उर्वरीत कुटुंबियाची माहीती :-

# झ्याव पास्कू दमेल (अत्याकाका) व लुसू पास्कू दमेल हे दोघे भाऊ.

# झ्याव (अत्याबाबा) पास्कू दमेलची बायको मर्शीबाय ही देगू दमेलची मुलगी व बाटीबाबाची बहीण. 

अत्या बाबाला तीन मुली १) सांतूबाय २)पिलीबाय ३) तेरशीबाय शिनोर. तेरशी बायचा मुलगा रॅायल.


# लुसू पास्कू दमेल.

ह्यांना तीन मुलगे :- पेद्रू काका, फराकाका व बावतीस (लाडाकाका)

# पेद्रू काकाला दोन मुलगे पास्कोल (गोंडा) व महेंद्र 

# फराकाकाचे तीन मुलगे १. मार्शल २. राजेश ३. फा. रोनी 

# लाडाकाकाचे दोन मुलगे १. नितीन २. अजित 


ह्या कुटुंबातील दुसरा घटक म्हणजे बापूजी (इतूरकाका) कुटुंब. 

बापूजीकाकाचे नाव व्हिक्टर झुज्या दमेल. 

झुज्या दमेल हे लुसू दमेल व अत्या दमेलचे चुलत बंधू. बापूजी काका हे एकूण पाच भाऊ :- १.बापूजीकाका, २)देगुकाका, ३) सुकाकाका, ४)शमाकाका व ५) फिलूकाका


बापूजी काकाचे चार मुलगे :- इनूस , चार्ली, जोज्या व जुरण.

ह्या संपूर्ण कुटुंबियाची आता आठ घरे झालेली आहेत. 


नारोळ विभागातील अजून एक कुटुंब म्हणजे तमू दमेल, झुज्या दमेल, मनवेल दमेल व मोत्या दमेल ह्यांचे.

हे कुटुंब व नयाघर कुटूंब (नारवाळ) हे एक कुटुंबियच होत.

ह्यात तमू दमेल व झुज्या दमेल हे दोघे भाऊ.


# तमू फ्रान्सिस दमेल ह्यांना चार मुलगे व एक मुलगी :-

१) अंतोन गुरूजी

२) संज्याव मास्तर

३) बावतीस (पेमा)

४) पास्कोल 

संज्याव मास्तरचा मुलगा - अमोल

५) सिस्टर मेरी. 

सिस्टर मेरी अमेरीकेतील न्युयॅार्क येथे राहात असून. त्या 

वृद्धाश्रमाची संचालिका (मदर)आहेत. आपल्या वसई भागातील बहूतेक सर्व कुटुंबियांच्या त्या संपर्कात आहेत. आपल्या गोड स्वभावामुळे त्यांनी सगळ्यांना आपलसं केलं आहे. आपल्या विभागातील लोकांना निरनिराळ्या कार्यक्रमासाठी संस्थेचा हॅाल त्या अत्यंत वाजवी दरात उपलब्ध करून देतात. कुमसार, बर्थडे, बाप्टीजम, वेडींग ॲनिवर्सरी सारखे नाना कार्यक्रम व वसईकरांचे मोठमोठाले गेटटूगेदर तेथे साजरे होत असतात. 



# झुज्या फ्रान्सिस दमेल. ह्याना दोन मुलगे. फ्रान्सिस व मायकल .

फ्रानसिसला दोन मुलगे लेस्ली व वेलस्ली

—॰॰—


# मनवेल दमेल. 

ह्यांना एक मुलगा :-अंतोन डिमेलो (नानू)


# मोत्या दमेल. 

मोत्या दमेल ह्यांना दोन मुलगे :- शिलूकाका व लिंबूकाका (आलेस). 

शिलूकाकाचा मुलगा गोंड्या. गोंड्याला दोन मुलगे- डेनिस व दिलीप


# लिंबूकाकाला तीन मुलगे- बस्त्याव, बबन (मनवेल), व पिटर.

बस्त्याव ला तीन मुलगे :- नृपन, सिम्सन व जस्टीन, 



ह्या संपूर्ण कुटुंबियांचे आता दहा घरे झालेली आहेत.


तर मित्रहो आपल्या दोनतलाव गावाची महती व माहीती माझ्या परीने सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व माहीती 100% accurate आहे असा माझा दावा नाही. बऱ्याच त्रुटी राहून गेल्या असतीलच ह्यात वाद नसावा. हे लिखान करण्यासाठी माझे बंधू मतू ह्याने माझ्याकडे पाठपुरावा केला. म्हणून त्याचे प्रथम आभार मानतो. तसेच ह्यातील बरीच माहीती मिळविण्यासाठी मला आपले इंजिनियर जॅानअण्णा ह्यांची फार मदत झालेली आहे. तसेच आपले बब्या (डॅाम्णिक) डिआब्रिओ ह्यांच्याकडूनही बरीच माहीती मला उपलब्ध झाली. बब्या कडे गावातील जुण्या माहीतीचे भंडार आहे. सायमनआप्पा (शिमा) नारोळ ह्यानी नारोळ विभागाची आपल्याला ज्ञात नसलेली बरीच माहीती मला पुरविली. साल्याबाबा शिनोर व जोसेफ (तोकड्या) शिनोर ह्याचीही मदत झालेली आहे. तोमास मिरांडा , अंतोन गुरूजी व शेज्याव बाबा माडीघर ह्यांचाही अमोल हातभार मला ह्या लिखानासाठी लाभला आहे. ह्या व्यतिरिक्त बऱ्याच जणांनी मला फोनवर माहीती पुरवली त्यात नेल्सन डिमेलो, रॅाबर्ट पिपरी, पास्कोल अंतोन गुरूजीचा, राजेश (बबन), जेम्सनदादा व लास्ट बट नॅाट लिस्ट “जॅाना राजनीखाल व ज्युली खळा” ह्या महीला या सर्वांचा मी ऋणी आहे. प्रथमता मी थोडक्यात म्हणजे केवळ एका ब्लॅाग मधे लिहायचं ठरवले होतं पण मारूतीच्या शेपटी प्रमाणे आपल्या दोनतलावची महती व माहीती वाढतच गेली. ती अजूनही वाढू नये म्हणून गावकरी लेडीजचा उल्लेख मी टाळला व हा उपद्व्याप पाच भागात आटोपला. ह्यात ज्या काही जेन्यूअन तृटी असतील तर ती माझीच अक्षमता आहे असे समजावे. 

धन्यवाद!!!


समाप्त


-🙏🏿-

//// पॅट्रीक डिमेलो ////



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013