“ जाॅना पिपरी चा गृह प्रवेश” (२२/०७/२०२०)
आज बुधवार, 22 July, 2020. आज प्रेषितांची प्रेषिता - संत मारीया मग्दलिया हिचा सण. आजच्या ह्या शुभ दिनी आपली जाॅना पिपरी व एलायस डिमेलो संध्याकाळी साडेपाच वाजता आपल्या नवीन घरात गृह प्रवेश करणार आहेत. आणि म्हणून त्यांच्या बरोबरच आपल्या कळसू दमेल कुटुंबिया करीता सुध्दा हा एक आनंदाचा दिवस आहे.
मी इथे एलशा ऐवजी जाॅना वहीणीला प्राधान्य देतोय कारण गेली तीन वर्षे आपण प्रत्यक्ष पहात आहोत कि ह्या बाईने आपल्या घराच्या पूर्ती साठी ध्यास घेतलेला आहे व स्व:ताला पूर्णपणे वाहून घेतलेले आहे. पायाला भिंगरी लावल्या सारखी ती जिकडे तिकडे सारखी फिरत होती. कधी पेदरबाबा कडे, कधी बॅंकेत, कधी विटा रेतीचे ट्रक अटेंड करायचे, कधी सिमेंट- लोखंडाचे ट्रक बघायचे, रेती, दगड, विटा वाहण्यासाठी लावलेल्या माणसाकडे लक्ष ध्यायचं, गवंडी, कार्पेंटर, टईल्सवाले पाॅलीशवाले ह्यांच्या कडेही लक्ष ठेवायचं, माणसांना चहा बनवून द्द्यायचा. ह्या बरोबरच एलशा अंकलच्या तब्बेतीकडे लक्ष द्द्यायचं. स्वयंपाक, मार्केटींग, कपडे धुणे, साफसफाई हि सगळी गृहिणींची कामे तर पाचवीलाच पुजलेली होती. ह्या सर्व कामाबरोबरच रोज न चुकता सकाळी एलशा अंकलला घेऊन चर्चला मिसा साठी जायची. हे सर्व काही ती एकटीच निमूटपणे करायची. डिसीजन घेणारी व पैशाचा व्यवहार सांभाळणारी सुध्दा तिच. हे सर्वकाही आम्ही आमच्या डोळ्यानी पाहात होतो. अशा कठोर परीश्रमातून तिने हा नवीन घराचा डोलारा उभा केला. व हे सर्व करीत असताना सदैव हसतमुख असायची. थकवा म्हणून तीला कधी जाणवला नाही. सर्वांशी ती गोडी गुलाबीत राहीली. राग कधी कोणाचा धरला नाही. धार्मिक वृत्ती जोपासली. सतत प्रार्थनेत राहीली. प्रसंगाी क्षमा मागायची सुद्धा तयारी असायची. ‘प्रेज दि लाॅर्ड’ हा शब्द तर अगदी ओठावरती तरळत असायचा. कोणाविषयी काही चांगले ऐकलं तर ‘प्रेज दि लाॅर्ड’ हा शब्द तिच्या ओठांतून अगदी नकळतपणे बाहेर पडे. चर्चच्या कामातही ती आघाडीवर असे. चर्चच्या निरनिराळ्या संघटनेची ती सदस्य आहे. कुटूंब सेवा समितीचीही ती सदस्य आहे. अगदी मनोभावे, निस्वार्थी पणे व सुंदर अशी तीची प्रार्थना असते म्हणून घरच्या प्रार्थने साठी तिला आम्ही बोलावीत असतो. आपले पॅरिशप्रिस्ट फा. थाॅमस डिसोाजा तर तिला प्रेमाने जाॅना ऐवजी “पिपरी” अशी हाक मारतात. तर मित्र हो अशा ह्या प्रेमळ जाॅनाने अतिशय कष्टाने व मेहनतीने सर्वांची मने जिंकून आपल्या नवीन घराचा हा वैभवसंपन्न डोलारा उभारला असून ह्या घरात ती आजच्या ह्या मंगल दिनी प्रवेश करणार आहे. उराशी बाळगलेल्या एका मोठ्या स्वप्नाची पूर्ती आज होणारं आहे. जाॅना, आम्हा कळसू दमेल कुटुबियांना तुझा रास्त अभिमान असून तुझ्या ह्या नवीन घरात तुला व तुझ्या कुटुंबियांना सुखाचे, समाधानाचे, समृद्धीचे, शांतीचे, भरभराटीचे, व निरोगी जीवन लाभावे हि इश्वर चरणी प्रार्थना. 🙏🏿
“घर असावे घरा सारखे,
नकोच नुसत्या भिंती ।
“तिथे असावा प्रेम जिव्हाळा,
नकोच नुसता नाती”
----समाप्त---/